जयति जयति जगदंबे महामाये सदये ।
ओवांळूं आरती पंचप्राण हे ॥ धृ. ॥
अमृतउदधीमध्ये द्विप नवरत्न तें ।
दिव्य दमपुष्पफळिं नित्य भरिते ॥
त्यांत चिंतामणिगृह शिवा मंचकीं ।
शिवमयी नतब्रह्मांडश्रितिजें ॥ जय. ॥ १ ॥
विधिहरिहरनिगम पाहता हें परम ।
रूप तेजाळ लखलखित आहे ॥
स्वीयप्रकाशे अखिल सहस्त्रशीर्षादि किल ।
तेथुनि नेति नेतीति वदले ॥ जय. ॥ २ ॥
ब्रह्म हें एक अद्वया साकारमय ।
असुनि निर्गुण वें सगुण आहे ॥
तें कसें सगुण डोळा दिसुनि सांगावे ।
म्हणून हें नामरुपात्म पाहे ॥ जय. ॥ ३ ॥
सहस्त्र दलमंदिरी पूजुं नानापरी ।
मानसी द्रव्यसद विविधकुसुमें ॥
विचित्र परिधान चिंतामणी जडित ।
नवरत्नभुषणामयि तेज उदये ॥ जय. ॥ ४ ॥
स्थूलसूक्ष्मादिविश्वाभिमानीप्रमुख ।
सत्व रज ज्ञानक्रियादिसह ते एकवटुनि ॥
पंच्यारतिज्योति गुरु उजळुनी ।
पाहुनी हे मनी रूप शिव तें ॥ जय. ॥ ५ ॥
न पुंसना स्त्री न पुरुषाकृति असोनिया ।
दावी शक्ति स्वरूप सर्व कृत जे ॥
मंगिशात्मज सदा हास शांतापदीं ।
लावितां लक्ष लय दावि रूप जें ॥ जय. ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel