आरती जनन्मोहिनीची सगुणनिष्कामदोहिनीची ॥ धृ. ॥
उदितमार्तंड सहस्त्र जैसे ।
भव्यतमूदिव्यदीप्ति विकासे ॥
शुद्ध जांबूनदकनक असे ।
अत्यलंकृतमंडित विलसे ॥ चाल ॥
कंकणहारनुपुरादी ।
हलितपदिं खनन, चलित सुरमनन, गलित रिपुजनन, ललित मैतनन कीर्तनाची ॥
गत्यनिर्वाच्य नर्तनाची ॥ आरती. ॥ १ ॥
ब्रह्मा यम इंद्र चंद्र तरणी ।
प्रभंजन अग्नि वरुण धरणी ॥
ईश नैऋत्य शुभस्मरणीं ।
उदित नीरांजनप्रकर्णी ॥ चाल ॥
मुकुटनिज रत्नदीप मनीं प्रगट समभवन झगटत मयवन, सगटकृति हवन, लगट गतिजवन सप्तदाची ।
करिति कुर्वंडि श्रीपदाची ॥ आरती. ॥ २ ॥
प्रथम शुभ वरदाकार करतो ।
द्वितीय भक्तासि अभय करितो ॥
तृतिय कर खङग तीव्र धरितो ।
वधुनि खल संतजनोद्धरिती ॥ चाल ॥
अग्रपुटि उग्रदैत्यशिर ते ॥
त्रिविन्नगुण करत, त्रिमूर्तिक वस्त, त्रिपुरकरधरत, त्रितापाअघहरत त्रिशूलांची ॥
त्रिगति सुखकरत त्रिमूलाची ॥ आरती. ॥ ३ ॥
सुरासुर दुग्ध अब्धिमथनीं ।
शेष गुण मंग्रअचल मथनी ॥
श्रीसुराऽमृत गजाश्व रमणी ।
वैद्य धनु विष तरु चंद्र मणी  चाल ॥
शंखगोरत्नभाग तैं समयीं ।
राहू सुरपटित, सुधा घटघटित, वधुनियां झटित, करित शिरच्छेदनाची ॥
चपलता राघवक्षणाची  आरती. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel