अनादि आदि माया ब्राह्मण पंचारति करतो ।
पंचप्राण पंचकतत्वें पंचकदेहासह तो ॥ धृ. ॥
कामक्रोधादीक वैरीं धूप जाळितो ।
जंवजंव धूप जळे तंवतंव सुवास निघतो ॥अ. ॥ १ ॥
त्रिविधताप त्रिकाळदीप सन्मुख लावितों ।
शोक भय चिंता दैन्य स्वरूपी मावळतो ॥ अ. ॥ २ ॥
उपहारातें भक्ती भावादिक ठेवीतो ।
दया क्षमा शांती नमुनि नैवद्या देतो ॥ अ. ॥ ३ ॥
अमृतपान सत्रावी आणि प्रेम अर्पीतो अष्टांगे नमुनि ।
मानस पूजा उल्हासें करितो ॥ अ. ॥ ४ ॥
आनंदाने सच्चिदानंद परब्रह्म पाहतों ।
सगुणस्वरूपी शांतादुर्गा कुलदैवत ध्यातो ॥ अ. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel