दुर्गे अघसंकट दुर्गे ।
हरि हे कुळस्वामिणी दुर्गे कधि हो मज पावसि मानसरंगे ॥
जय जय भवभंगे दुर्गे ॥ धृ. ॥
उदधील हरीसि तरंगे ।
दिससी जगभास तरंगे ।
स्वरूपीं तूंचि अहंकृतसंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दु. ॥ १ ॥
रचिसी ब्रह्मांड नि:संगे ।
करुणा न करिसी तूं अंगे ॥
त्रिगुणी गुणसाम्यलिलारस अंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दु. ॥ २ ॥
करिसी उत्पत्तिस्थितिभंगे ।
दुर्गे लय हा सत्य विसंगे ॥
तुझिया आनंद पादाब्जसुरंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दु. ॥ ३ ॥
ब्रह्मींब्रह्मार्पण पिंगे ।
फुगडी घालिसि सन्संगे ॥
वंदी हनुमंत पदब्जसुरंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दु. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel