जय जय दीनदयाळे शांते देई मज भेटी ।
तव चरणाची स्वामिणी मजला आवडी मोठी ॥ धृ. ॥
कवण अपराधास्तव जननी केला तूं रुसवा ।
मी तो ध्यातो ह्र्दयी तुजला अहर्निशी भावा ॥ जय. ॥ १ ॥
चिंताकूपी पडलों कोण काढिल बाहेरी ।
धावें पावे झडकरी अंबे करुणा तूं करी ॥ जय. ॥ २ ॥
माता पिता गुरु दैवत सर्वही तूंची ।
तुझ्यावांचूनि मजला कोणी नलगेची ॥ जय. ॥ ३ ॥
काय असें पाहुनी अंगीकार त्वां केला ।
आतां करणें त्याग तरी हें अघटित ब्रीदाला ॥ जय. ॥ ४ ॥
वेद शास्त्रे आणि पुराणें गर्जति अपार ।
नाम घेता हरतो किल्मिष पुरवीं अंतर ॥ जय. ॥ ५ ॥
दास शरण हा अनन्यभावें करितो विनंती ।
तुजवांचोंनी मजला न गमे निश्चय दे सुमती ॥ जय. ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel