जय देवी जय देवी जय आदिशक्ती ।
ओंवाळूं आरती तुज हो भगवती ॥ धृ. ॥
मूळमायारुप तुझे न कळें कवणासी ।
ब्रह्मादिक सुरवर ध्याती मानसी ॥
व्यापुनियां जग सर्व खेळा खेळसी ।
वधुनी शुंभनिशूंभा देवा वर देसी ॥ जय. ॥ १ ॥
दृष्टी व्यंकट पाहतां कांपे त्रिभुवन ।
मुख पसरुनियां ग्रासिसी दैत्यालागून ॥
दशभूजाआयुधें लखलखती जाण ॥
मर्दियेला महिषासूर चरणीं घालून ॥ जय. ॥ २ ॥
पवाडे वर्णितां खुंटली मम वाणी ।
विश्व त्वां मोहियले लावीले ध्यानीं ॥
माया तूं माउली जगताची जननी ।
विनवुनियां गोविंद ध्यान असे मनी ॥ जय. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel