ओंवाळूं ओंवाळूं आरती कालिका अंबा ।कालिका अंबा ।
मागें पुढे पाहूं जातां अवघी जगदंबा ॥ धृ. ॥
आदि मध्य अवसानी व्यापक होसी ।अंबे व्यापक होसी ।
अणु रेणु जीव तुझा तया न त्यागिसी ।ओवाळूं ॥ १ ॥
भास हो आभास जीचा सौरस सारा ।अंबे सौरस सारा ॥
सारसार निवडूं जातां न दिसें थारा ॥ ओंवाळू ॥ २ ॥
कळातीत कळानिधींपर्वती ठाण ।अंबे पर्वतीं ठाण ॥
भक्त शिवाजीसी दिधलें पूर्ण वरदान ॥ ओंवाळूं ॥ ३ ॥
चिच्छक्ते चिन्मात्रे चित्तचैतन्य बाळे ।अंबा चैतन्य बाळे ॥
विठ्ठलसुतात्मजासी दावीं पूर्ण सोहाळे ॥ ओंवाळूं ॥ ४ ॥
जगदंब ! जगदंब ! उदयोऽस्तु !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel