आयुष्याची भटकंती
माझी फार फार झाली
कधी पेटली रे होळी
कधी लाभली दिवाळी //१//
आयुष्याची भटकंती
कधी लाभले जहर
कधी लाभले अमृत
सम मानले मी दोन्ही //२//
अपमान नि उपेक्षा
कधी दुर्दशाही झाली
कधी सत्कार सन्मान
कधी श्रीफळ नि शाली //३//
अंधाराला प्रकाशाला
साठवून घेतले मी
आले सारे जे वाट्याला
प्यालो अमृत म्हणोनी //४//
आयुष्याची भटकंती
सदा गोड रे मानावी
आणि टाकीत पाऊले
वाट चालत रहावी //५//
पत्ता: संजय राधाकृष्ण उपासनी
[ लेखकाचा पत्ता : ३, महालक्ष्मी, श्री गणेशप्रसाद अपार्टमेंट, वरदविनायक नगर, विजय ममता सिनेमाचे मागे, नाशिक- ४२२०११; मोबाईल – ९८२२४५२२४७ ]
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.