मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई(उमाबाई)हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भासले यांची मुख्य राणी उम्मवा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.