जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा । परिसावी विनंती माझी सदगुरुनाथा ।। 1 ।।
असो नसो भाव आलों तूझिया ठाया । कृपादृष्टीं पाहें मजकडे सदगुरुराया ।। 2 ।।
अखंडित असावें ऐसें वाटतें पायी । सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं ।। 3 ।।
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी । नामें भवपाश हातीं आपुल्या तोड़ी ।। 4 ।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.