उठा पांडुरंगा आतां दर्शन घा सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ।। 1 ।।
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा । सोडा शेजे सुख आतां बंघु घा मुखकमळा ।। 2 ।।
रंगमंडपी महाद्घारीं झालीसे दाटी । मन उतावीळ रुप पहावया दृष्टी ।। 3 ।।
राही रखुमाबाई तुम्हां येऊं घा दया । शेजे हालवुनी जागें करा देवराया ।। 4 ।।
गरुड हनुमंत उभे पाहती वाट । स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट ।। 5 ।।
झालें मुक्तद्घार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा ।। 6 ।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.