भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ।। 1 ।।
ओंवाळूं आरती माइया पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ।। ध्रु0 ।।
काय महिमा वर्णूं आतां सांगणे किती । कोटी ब्रहमहत्या मुख पाहतां जाती ।। 2 ।।
राई रखुमाबाई उभ्या दोघी दो बाहीं । मयूरपिच्छ चामरें ढाळिति ठायींचे ठायीं ।। 3 ।।
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा । विचेवरी उभा दिसे लावण्यगाभा ।। 4 ।। ओवाळूं 0 ।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.