सगळी कामे उरकून टीव्ही चालू केला. पुलवामा हल्ल्याची ची बातमी चालु होती. जशी बातमी कळली की पुलवामा हल्ला झाला आहे शरीरातील रक्त उसळायला लागल. अणि फक्त माझच नाही तर प्रत्येक भारतीयांच रक्त उसळत होत. डोक्यात फक्त एकच विचार येत होता शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाचे काय होणार?

देशाचे जवान बॉर्डर वर पहारे देतात त्यामुळेच तर आपण सुरक्षित आहोत. ते नेहमी कर्तव्यनिष्ठ असतात मग कडकडती थंड असो की रखरखते ऊन… आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स मध्ये असलेला प्रत्येक सैनिक आपले कर्तव्य न विसरता देशासाठी प्राण देण्यासाठी 24 तास सज्ज असतो म्हणुनच तर देशाला त्या प्रत्येक सैनिकांवर गर्व आहे..

पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या माझ्या बंधू जवानांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली..!

पुलवामा हल्ला - देशाचे सैनिक बस मधुन श्रीनगरला जात होते. बस नंबर - HR49F0637 मध्ये जवळजवळ 42 सैनिक श्रीनगर ला जात असताना जैश-ए-मुहम्मद. या संघटनेच्या एक नालायक आतंकवादी आदील मुहम्मद याने एका फोर व्हीलर मध्ये जवळ पास 300 Kg RDX ठेऊन बस ला जोरात टक्कर मारली. टक्कर झाल्यामुळे RDX फुटला.  त्याचा आवाज जवळजवळ 10 KM पर्यंत ऐकु आला त्यावरून हा बॉम्ब स्फोट किती भयावह होता त्याची कल्पना आपण करू शकता…

या बॉम्बस्फोट च्या आधी नालायक आतंकवादी आदील मुहम्मद याने एक चित्रफित शेअर केली आहे. ही चित्रफित पाहिल्यावर पाकिस्तान कुठल्या स्तराचा आहे आणि त्यांचे विचार किती खालच्या पातळीचे आहेत हे लक्षात येते. पाकचे नापाक इरादे. माणुसकी अजिबात नाही यांच्याकडे. जगण्यासाठी आतंकवादी संघटनांचा आधार घेतात त्यांचे पालनपोषण करतात. पूर्ण जग आतंकवादी संघटनांच्या विरोधात असताना पाकिस्तान असा एकच देश आहे की जो आतंकवादाला पाठिंबा देतो. पाकिस्तान पुलवामा हल्ल्याबद्दल पुरावे मागतो. 26 चा ताज हॉटेलमध्ये झालेला आतंकवादी हल्ला सगळ्यांच्या लक्षात आहे ना?

किती पुरावे दिले तरी पण पाकिस्तानची "अळी मिळी गुप चिळी " तोंडावर बोट आणि हाताची घडी… आता बस झाल…

ये नया भारत है… ये घुसकर भी मारेगा और घुसने पर भी मारेगा…….!

आतंकवादी संघटनेचे पालन पोषण करणाऱ्या आणि आतंकवादी संघटनेमार्फत काश्मिरी लोकांना भडकावून त्यांच्याकडून आतंकवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला म्हणावे तरी काय मतिमंद की बुद्धीभ्रष्ट? निर्णय तुमचा आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राईक झाली आठवते ना सगळ्यांना?  यामध्ये भारतीय एअर फोर्सने पाकिस्तानात घुसून आतंकवादी ठिकाणांवर हमला करून आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ही एअर स्ट्राईक मध्यरात्री 3 वाजता झाली..त्यात जवळजवळ 200 ते 300 आतंकवादी मारले गेले आहेत अशी बातमी न्यूज चॅनेल द्वारे कळली. यानंतर पाकिस्तानने जनतेच्या दबावाखाली येऊन एअर स्ट्राईक केली एअर स्ट्राईक मध्ये पाकिस्तानचे 3 युद्ध विमानांनी भारतात घुसून मिलिट्री ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला कारण विंग कमांडर अभिनंदन सारखे जवान आपल्या देशात आहेत आणि ते करोडो भारतीयांच्या सुरक्षेसाठी बॉर्डर वर सज्ज आहेत. विंग कमांडर अभिनंदन यांनी F16 या पाकिस्तानी युद्धविमानावर हल्ला करून त्याला उध्वस्त केले पण दुर्दैवाने यामध्ये अभिनंदन यांच्या युद्धविमानाला देखील हानी झाली.

'अभिनंदन' यांनी पॅराशूट सहित युद्धविमानातून उडी मारली आणि वाऱ्याच्या प्रवाहामूळे ते पाकिस्तानात गेले. अभिनंदन यांना माहिती नव्हते की ते पाकिस्तानात आले आहेत त्यांनी लोकांना विचारताच त्यांना आपण पाकिस्तानात आलो आहोत याची जाणीव झाली. पाकिस्तानात आहोत हे कळताच वीरपुत्र भारताचा सिंह 'अभिनंदन' यांनी  'भारत माता की जय' असे म्हणत पिस्तूल काढून हवेत फायर केले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी मिलिट्री द्वारा अटक केली. पाकिस्तानने अभिनंदन यांना मानसिक त्रास देऊन एक चित्रफित तयार केली. या चित्रफित मध्ये पाकिस्तान सैन्य खूप चांगले आहे अणि मी प्रभावित झालो आहे. असे खोटे व्हिडीओ इंटरनेट वर टाकून पाकिस्तान दर्शवू तरी काय करु इच्छितो देव जाणे, पण जेव्हा भारताचा वीर 'अभिनंदन' भारतात आला तेव्हा लोक इतके आनंदी होते की त्यांची सकाळी पाच वाजल्या पासून वाट बघत होते.  भारताची लढाई पाकिस्तानशी नसून तिथल्या आतंकवादी संघटनेशी आहे..

(ही माहिती इंटरनेट व काही न्यूज चॅनेल वरुन एकत्रित केली आहे.)

लेखिका: अक्षता दिवटे, बंगलोर

मोबाईल: 7483619155

ईमेल: adivate484@gmail.com

(लेखिका एका खासगी कंपनीत काम करतात)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel