आताची चाळीशी पंचेचाळीशीत असलेल्या पिढीने आजी आजोबांच्या सहवासातील समृद्ध बालपण बऱ्यापैकी अनुभवलं आहे आई वडिलांबरोबर आजी आजोबांच्या संस्कारानी त्यांना घडवलं आहे त्यामुळंच आजच्या पिढीला काही सांगताना आमची आजी म्हणायची अस आपसूकच येत.....

आमची आजीही अशीच आम्ही तिला इन्नी म्हणायचो इन्नी म्हणजे वहिनीचा अपभ्रंश तर अशी ही आमची आजी किती साध्या साध्या गोष्टींमधून ती छान शिकवण द्यायची. ...

तरुण वयात आलेल्या आम्ही मुलामुलींनी कामात आळस केला ,चालढकल केली की म्हणायची लोखंड पिळायच वय तुमचं* आळस काय कामाचा किंवा म्हणायची जणू पंधरावा महिना लागलाय असं करताय तेव्हा हसू यायचं रागही यायचा पण सगळी काम मात्र पटापट उरकली जायची

कोणतीही सवय कितीदा सांगूनही जात नाही असं वाटलं तर म्हणायची पाचावं ते पन्नासाव म्हणजे आताच चांगल्या सवयी लागल्या तर त्या मोठेपणी हि राहतील अस...आपोआपच चांगल्या सवयी लागल्या

एखादं काम झाल्यावर समजा चुकून सगळा पसारा तिथंच राहिला तर म्हणायची आमच्या मुलीचं काम कसं जिथल्या तिथे. ..आपोआपच जिथंल्या तिथं वस्तू ठेवायची सवय लागली

आणि म्हणायची पडेल ते काम करायला हवं त्यामुळं हे माझं ते तुझं अशी कामाची विभागणी

न करता समोर आलेलं काम करून मोकळं व्हायचीही सवय लागली

कधी तिच्या बोलण्यावर लगेच आपण उत्तर दिलं काही म्हटलं तर म्हणायची ठिकरीवर थेंब पडू देत नाहीत अगदी त्यामुळं विचार करूनच बोलण्याची सवय लागली.

एखादया स्वभाव आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर भिन्न स्वभाव असणाऱ्या व्यक्तीची जोडी असेल तर म्हणायची "सोन्याबरोबर चिंधीलाही जपलं पाहिजे"...असं सांगून सर्वांबरोबर जुळवून घ्यायची शिकवण दिली.

अशा खरतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी.... लहानपणीचे संस्कारच स्वभाव घडवतात त्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींचं वागणं बोलणं खूप महत्त्वाचं ठरतं आंणि ज्यावेळी आपण त्या वयात त्या भूमिकेत जातो तेव्हा हे सगळं आठवतं लहानपणी त्या गोष्टींचे किंवा त्यांच्या वागण्या बोलण्याचे सगळेच अर्थ  कळतात असं नाही पण कुठेतरी मनावर ते बिंबल जातं आणि आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण लागतं.

लेखिका: श्रेया गोलिवडेकर, सातारा                                                         

ईमेल: shreyagoliwadekar10319@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel