बरोबर एका मिनिटाने टाईम मशीन परत आली. अभिजीतच्या चेहर्यावर टेस्टींग सफल झाल्याचा आनंद होता. मात्र लगेच तो आनंद मावळला आणि त्याची जागा आश्चर्ययुक्त भितीने घेतली. टाईम मशीन तर परतली होती. पण प्रोफेसरांशिवाय. त्याने प्रोफेसरांना फोन लावला. पलीकडून एका स्त्रीचा गोड, नम्र आवाज आला,
"तुम्ही ज्या नंबरला कॉल करत आहात, तो अस्तित्वात नाही. कृपया आपला नंबर तपासून पहा."
आता मात्र अभिजीतचे इंडिकेटर लागले होते. नक्कीच काहीतरी अघटीत घडल होत. आता काय कराव? प्रोफेसरांशी कसा संपर्क साधावा? असे नाना प्रश्न त्याला सतावू लागले होते. त्याने एक नजर टाईम मशीनवर टाकली. अचानक त्याच्या डोक्यात एक आयडीया आली.
अभिजीत मशीन जवळ आला. त्याने त्या मशीनच्या स्क्रिनवर पाहील. तर त्याला धक्काच बसला. ती स्क्रिन पूर्ण ब्लँक होती. त्या स्क्रिनवर ना टाईम होता, ना लोकेशन. टाईम मशीनमध्ये अशी सुविधा होती कि एकदा टाईम आणि लोकेशन टाकल्यानंतर त्यात जोपर्यंत आपण काही बदल करत नाही. तोवर तेच टाईम आणि लोकेशन मशीनमध्ये फिड रहात. म्हणजे नुसत गो च बटन दाबल कि आपण त्याच टाईमावर, त्याच लोकेशनवर पोहोचतो. जेथे आधी गेलो होतो. अभिजीत मशीनमध्ये बसला आणि त्याने गो च बटण दाबल. टाईम मशीन पुन्हा गायब झाली होती..