टाईम मशीन एका ठिकाणी प्रकट झाली. अभिजीत मशीनमधून खाली उतरला. त्याने आजुबाजुला पाहिल. तो एका घनदाट जंगलात उभा होता. पण हे ते जंगल नव्हत, जिथे त्यांची लॅब होती ज्याच लोकेशन मशिनमध्ये सेट केले होत. ही जागा थोडी जुन्या काळातील वाटत होती. कदाचित टाईम मशीन काही वर्ष भूतकाळात सरकली असेल. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याच्या काळजात धस्स झालं! टाईम मशीनचा रिटर्नींग टाईम एकाच मिनिटाचा होता. त्याने मागे वळून टाईम मशीनच्या स्क्रिनवर बघितलं. टाईम मशीन तिच्या मूळ स्थानावर परत जायला केवळ १० सेकंद बाकी होते. अभिजीतने चपळाईने मशीनच ऑफ बटन दाबले आणि सुटकेचा निःश्वास सोडला. आता जोवर टाईम मशीनला पुन्हा ऑन करत नाही तोवर ती कुठेही जाणार नव्हती.
अभिजीत समोर आव्हान प्रोफेसरांना शोधण्याचं. हे कोणत ठिकाण आहे माहीत नव्हतं, प्रोफेसर कोणत्या दिशेला असतील तेही माहीत नव्हत, बरं भूतकाळात मोबाईल नसल्याने त्यांचा फोन लागण तर शक्यच नव्हतं. तो शोधत शोधत निघाला. मध्ये मध्ये तो त्यांना हाका मारत होता. काही अंतर चालत गेल्यावर त्याच्या पायाखाली काहीतरी टोचले. त्याने खाली पाहील. ते प्रोफेसरांच घड्याळ होत. आता अभिजीतच्या आशा पल्लवित झाल्या. नक्कीच प्रोफेसर ह्या रस्त्याने गेले असतील असा विचार करून तो निघाला....