..... अभिजीत आणि प्रोफेसर पिरॅमिड ऑफ खाफ्रे मधून बाहेर पडले होते. आता त्यांच्या समोर प्रमुख लक्ष्य होते ते डेड सी स्क्रॉल्स शोधण्याचे. आता पर्यंत घडलेल्या घटनांनी त्या दोघांनाही पुरतं हादरवून सोडले होते. दोघेही पिरॅमिड जवळच्या एका दगडावर बसून आता पर्यंतच्या घटनांचा आढावा घेत होते.  आज सकाळी त्यांनी एक टाईम मशीन तयार केली होती, तेव्हापासून त्यांना ७-८ तास लोटले असतील. आता दुपार झाली होती. द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिजा वर पिवळ धमक कडाक्याचं ऊन पसरलं होतं. सकाळपासून घडलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती‌. पण आता आठवणींत रमून काहीही फायदा नव्हता. त्यांच्या समोर नियतीने जे वाढून ठेवले होते, त्याला सामोरं जाणं त्यांना भाग होत. प्रोफेसरांना अजुनही अशक्तपणा होता. अचानक अभिजीत उठला आणि म्हणाला,

"प्रोफेसर, मी पिरॅमिड ऑफ मेनकाऊरे मध्ये जातो आहे. आता तीच आपली शेवटची आशा आहे आणि मला विश्वास आहे कि तिथेच आपला शोध नक्की संपेल."

"मी पण येतो."

असं म्हणून प्रोफेसर उठण्याचा प्रयत्न करू लागले, तसं अभिजीतने त्यांना थांबवले,

"नाही प्रोफेसर, तुम्ही इथेच बसा. तुमच्या शरीरात आता इतकी ताकद उरलेली नाही. तुम्हाला आरामाची गरज आहे."

असं म्हणून अभिजीतने आपल्या पॉकेट मध्ये हात घातला आणि त्यातून शॉक गन बाहेर काढली. ती प्रोफेसरांजवळ देत तो म्हणाला,

"ही शॉक गन जवळ ठेवा. तुमच्या सुरक्षेसाठी. मी लवकरच परत येईन."

एवढं बोलून अभिजीत तिथून निघाला.

                                 पिरॅमिड ऑफ मेनकाऊरे हे गिजा मधील तिसरं आणि इतर दोन पिरॅमिड्स पेक्षा सर्वात छोट पिरॅमिड होत, मेनकाऊरे नावाच्या एका फैरोने बांधलं होतं. हे पिरॅमिड अतिशय कमी उंचीवर बांधलं  होत. खरतर इथे डेड सी स्क्रॉल्स मिळण्याची आशा फार धुसर होती. पण एक छोटी सुई सुध्दा फार मोठं काम करू शकते. त्याच प्रमाणे कदाचित इथेच पुढचा रस्ता सापडेल. असा विचार करून तो पिरॅमिडच्या आत घुसला. आत घुसताच त्याने सर्वात आधी खिशातून ते गोल डिव्हाईस काढलं. ते ऑन केल्याबरोबर त्याच्यावर पिरॅमिडचा नकाशा दिसु लागला. त्या नकाशात या पिरॅमिड मधील सर्व चेंबर्स दिसत होते, त्याच बरोबर त्यात एक हिरवा ठिपका दिसत होता, ज्याचा अर्थ अभिजीत स्वत: होता. पण अचानक अभिजीतच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली, ज्याच कारण होतं, नकाशात दिसणारे १० लाल ठिपके. त्याचा अर्थ होता कि या पिरॅमिड मध्ये १० पहारेकरी तैनात होते. पण अजुन एका गोष्टीने अभिजीतच लक्ष वेधलं होतं आणि ती म्हणजे या पिरॅमिड मध्ये अनेक चेंबर्स असूनही  ते सगळे पहारेकरी एकाच चेंबर भोवती पहारा देत होते. याचाच अर्थ त्या एकाच चेंबर मध्ये काहीतरी महत्त्वाचं होतं. आता अभिजीतच्या आशा पल्लवित झाल्या. कदाचित इथेच ती गोष्ट असेल, ज्याचा कधीपासून ते शोध घेत होते.  अभिजीतने पॉकेट मधून लेजर गन काढली. एका हातात लेजर गन आणि दुसऱ्या हातात नकाशा धरून अभिजीत चेंबरच्या दिशेने रवाना झाला.

                                             काही वेळातच अभिजीत त्या चेंबर जवळ पोहोचला होता. त्याने एका भिंतीआडून हळूच डोकावून पाहिलं. त्या चेंबर भोवती पहारेकरी सावध होऊन पहारा देत होते. पण हे ते पिरॅमिडचे पहारेकरी नव्हते, जे त्याने पिरॅमिड ऑफ खुफू मध्ये पाहीले होते. या पहारेकऱ्यांचा पोशाख एकदम वेगळा होता. त्यांनी डोक्यावर एक हेल्मेट घातले होते, त्यांनी वेगळ्या प्रकारचे कपडे घातले होते, त्यांच्या हातात बंदुका होत्या. अभिजीतला समजायला वेळ लागला नाही कि हे कॅप्टन गिनयूचे सैनिक होते. यांचा सामना करणं आणखीन कठीण होणार होतं. पण आता अभिजीत मागे हटणार नव्हता. कारण एव्हाना त्याला कळून चुकलं होतं कि डेड सी स्क्रॉल्स इथेच असणार, म्हणूनच एवढा कडक पहारा होता. त्याने हातातली लेजर गन घट्ट पकडली आणि हळूहळू त्या चेंबरच्या दिशेने निघाला. अभिजीत काही पावलं पुढे गेलाच होता कि इतक्यात त्याला 'थांब' असा आवाज ऐकू आला. अभिजीतने मागे वळून पाहिले. एक सैनिक त्याच्यावर बंदूक रोखून उभा होता. त्या सैनिकाने हळूहळू पुढे येत विचारलं,

"कोण आहेस तु? इथे काय करतोयस?"

अभिजीतने क्षणाचाही विलंब न करता हातातील लेजर गन त्या सैनिकाच्या दिशेने रोखली आणि चाप दाबला. तत्क्षणी बंदूकीतून एक लेजर किरण निघून त्या सैनिकाच्या छातीच्या आरपार झाली होती. तो सैनिक एक किंचाळी मारून खाली कोसळला. त्याची किंचाळी ऐकून इतर सैनिक धावत तिथे येऊन पोहोचले. त्यांनी चारी बाजूंनी अभिजीतला घेरून घेतलं होतं. त्या सर्व सैनिकांच्या बंदूका अभिजीतच्या दिशेने रोखलेल्या होत्या.

"कोण आहेस तू?"

एका सैनिकाने विचारलं.

अभिजीत: मी अभिजीत, मी डेड सी स्क्रॉल्स घ्यायला आलो आहे.

डेड सी स्क्रॉल्सच नाव ऐकून त्या सैनिकांमध्ये कुजबुज सुरु झाली.

पहीला सैनिक: डेड सी स्क्रॉल्स बद्दल याला कसं माहीत पडलं? त्याला तर एकदम गुप्तपणे ठेवले गेले होते.

दुसरा सैनिक: मला तर वाटतं आपण याला इथेच मारून टाकायला हव.

तिसरा सैनिक: नाही. आपण कैद करून कॅप्टन गिनयूंना संदेश पाठवू पुढे तेच ठरवतील कि याच काय करायचं.

याला सगळ्या सैनिकांनी आपली संमती दर्शवली. दोन सैनिकांनी अभिजीतला पकडलं आणि इतर सैनिकांच्या मागे निघाले. काही क्षणातच ते एका चेंबर जवळ येऊन पोहोचले. सगळे सैनिक चेंबरच्या आत गेले. ते चेंबर इतर चेंबर्स पेक्षा बऱ्यापैकी मोठ होतं. अभिजीतने चारी बाजूंना आपली नजर फिरवली. त्या चेंबर मध्ये अनेक सायंटिफिक एक्विपमेंट होते. कोपऱ्यात एक आधुनिक कॉम्प्युटर होत. एक सैनिक त्या कॉम्प्युटर वर बसला आणि कॅप्टन गिनयूशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागला. त्या चेंबर मध्ये चारही दिशांना चार कॅमेरे लावले होते. त्यामुळे त्या चेंबर मध्ये कानाकोपऱ्यातील प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटर मध्ये दिसु शकत होती. पण अभिजीतच लक्ष ज्या गोष्टीने सर्वाधिक वेधलं ते होत, त्या चेंबर मधील एक बंद दरवाजा. अभिजीतच्या डोक्यात इथून कसं सुटायच याबद्दल विचार सुरू झाला. अचानक त्याला एक कल्पना सुचली. त्याने पूर्ण ताकदीनिशी त्याला पकडलेल्या सैनिकांना जोरात धक्का दिला. ते दोघेही बेसावध असल्यामुळे दूर जाऊन पडले. अभिजीत चपळाईने त्या चेंबरच्या बाहेर निघून गेला. हे सगळं इतकं जलद घडलं कि त्या सैनिकांना काय झालं हे समजायला काही क्षण लागले. अचानक एक सैनिक ओरडला,

"बघता काय नुसते पकडा त्याला."

असं म्हणून काही सैनिक अभिजीतला पकडण्यासाठी चेंबरच्या बाहेर यायला निघाले कि अचानक एक चमचमता गोळा त्या चेंबरच्या आत आला. ते सैनिक त्या गोळ्याला आश्चर्याने पाहत होते. इतक्यात त्या गोळ्यामध्ये कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. त्या गोळ्याच्या आसपास असलेल्या काही सैनिकांचे चिथडे उडाले होते.काही सैनिक जखमी होऊन दूर फेकले गेले होते. हा तोच बॉम्ब होता जो अभिजीतने अॅड्र्यूच्या पॉकेट मधून काढला होता. त्या स्फोटामुळे चेंबर मधील कॉम्प्युटर सिस्टीम पूर्णपणे निकामी झाली होती, तसेच तेथील कॅमेरे सुध्दा खराब झाले होते. अभिजीत हळूच आत आला. त्याने त्या चेंबर मध्ये असलेल्या बंद दरवाज्यावर नजर टाकली. एवढ्या भयंकर स्फोटाचा त्या दरवाज्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. अभिजीत त्या दरवाज्याजवळ येऊन उभा राहिला. तो त्या दरवाज्याच एकदम सुक्ष्मतेने निरिक्षण करत होता. अचानक एक जखमी सैनिक उठून उभा राहिला. त्याने बाजूला पडलेली बंदूक उचलली आणि अभिजीतच्या दिशेने नेम धरला आणि चाप दाबणार इतक्यात त्या सैनिकाला जोराचा शॉक बसला. तो सैनिक किंचाळत खाली कोसळला. त्याची किंचाळी ऐकून अभिजीतने मागे वळून पाहिले. तिथे प्रोफेसर उभे होते. त्यांच्या हातात अभिजीतने दिलेली शॉक गन होती. प्रोफेसरांनी ती शॉक गन त्या सैनिकाच्या दिशेने रोखलेली होती.

अभिजीत: प्रोफेसर, तुम्ही इथे?

प्रोफेसर: तुला जाऊन बराच वेळ झाला, म्हणून बघायला आलो.

अभिजीत: पण तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात?

प्रोफेसर: इथून मला एक मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आला होता.

अभिजीत: हो. तो स्फोट मीच केला होता.

प्रोफेसर: हं. बरं मग काही सापडलं कि नाही?

अभिजीत: अजुनही काही सापडलं नाहीये. पण या बंद दारामागे काही रहस्य लपलेली असु शकतात.

असं म्हणून अभिजीतने त्या बंद दरवाज्या कडे बोट दाखवलं. प्रोफेसर त्या बंद दरवाज्याच निरिक्षण करू लागले.

अभिजीत: एवढा भयानक स्फोट सुध्दा त्या दरवाज्याचे काहीही बिघडवू शकला नाही.

प्रोफेसर: माझ्या माहितीप्रमाणे हा दरवाजा एका धातु पासुन बनलेला आहे. एक असा धातु जो या पृथ्वीवर कुठेही मिळत नाही.

अभिजीत: याचा अर्थ हा धातू कॅप्टन गिनयूने त्याच्या ग्रहावरून आणला असेल?

प्रोफेसर: असु शकत आणि या दरवाज्याला कसं उघडायच हे सुद्धा कॅप्टन गिनयूलाच माहीती असणार.

अभिजीत: पण मग याचा अर्थ आपण हा दरवाजा कधीच नाही उघडू शकत?

प्रोफेसर: उघडू शकतो. हे बघ कितीही झालं तरी हा एक धातू आहे आणि धातूला वितळवल जाऊ शकत. जर आपण या धातूला वितळवता येईल इतकी एनर्जी गोळा करण्यात यशस्वी ठरलो तर आपलं काम होऊ शकत.

अचानक अभिजीत ओरडला,

"ओह शीट्, माझ्या डोक्यात हा विचार कसा आला नाही?"

प्रोफेसर: काय झालं? कसला विचार?

अभिजीत: अहो प्रोफेसर, सोलर पॅनल.

प्रोफेसर: सोलर पॅनल?

अभिजीत: हो. या 3 डायमेन्शनल पॉकेट मध्ये एक बाविसाव्या शतकातील सोलर पॅनल आहे. त्यात आपण सुर्याची एनर्जी स्टोअर करून केव्हाही आणि कुठेही त्या एनर्जीला रिलीज करू शकतो.

प्रोफेसर: पण त्यात या धातूला वितळवता येईल इतकी एनर्जी स्टोअर होऊ शकते?

अभिजीत: आरामात.

प्रोफेसर: अरे मग वाट कसली बघतोय. कर लवकर काम सुरू.

अभिजीत: हो.

असं म्हणून अभिजीतने पॉकेट मध्ये हात घातला आणि त्यातुन एक मोठ चौकोनी सोलर पॅनल बाहेर काढल. ते इतर सोलर पॅनल सारखंच होत. फक्त त्याच्या वरच्या बाजूला कोपऱ्यात एक स्क्रीन होती. त्या स्क्रीनच्या वरती लाल आणि हिरव्या रंगाचे दोन बटनं होते. अभिजीत ते सोलर पॅनल घेऊन चेंबर मधून बाहेर पडला. झपाझप पावले टाकत नकाशाच्या मदतीने तो त्या पिरॅमिडच्या बाहेर येऊन उभा राहिला. आकाशात सुर्य चांगलाच तळपत होता. अभिजीतने ते सोलर पॅनल खाली जमिनीवर ठेवल आणि त्याच्या वरच लाल बटन दाबले. बटन दाबताच जिथे ब्लॅंक स्क्रीन होती. तिथे अचानक लाल रंग दिसु लागला. एनर्जी स्टोअर होत होती.

                                         अर्ध्या तासाने जिथे लाल स्क्रीन होती तिथे हिरवा रंग दिसु लागला.याचा अर्थ एनर्जी स्टोअरींग पूर्ण झालं होतं. अभिजीतने ते सोलर पॅनल उचललं आणि झपाझप पावले टाकत सरळ त्या चेंबर मध्ये येऊन पोहोचला. प्रोफेसर त्याची वाटच पाहत होते. अभिजीतने ते सोलर पॅनल दरवाज्या समोर ठेवलं आणि म्हणाला,

"प्रोफेसर, आपल्याला बाहेर थांबावं लागेल कारण यातून बाहेर पडणारी एनर्जी खुपच दाहक आहे. तेव्हा आपण इथे न उभं राहीलेलच बरं."

असं म्हणून अभिजीतने सोलर पॅनल वरील हिरवं बटन दाबले आणि प्रोफेसरांसोबत तो चेंबरच्या बाहेर येऊन उभा राहिला. सोलर पॅनल मधून मोठ्या प्रमाणात एनर्जी रिलीज होत होती. काही क्षणातच संपूर्ण चेंबर प्रकाशाने भरून गेलं होतं. ती एनर्जी इतकी दाहक होती कि त्याची झळ चेंबरच्या बाहेर येत होती‌. असं वाटत होतं कि साक्षात आकाशातील सुर्य त्या चेंबर मध्ये अवतरला होता. बराच वेळानंतर चेंबर मधील प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला होता. काही वेळातच तो प्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला. अभिजीत आणि प्रोफेसर आत आले. सोलर पॅनल पुर्ववत झाल होत. त्याची हिरवी स्क्रीन पुन्हा ब्लॅंक झाली होती. अभिजीतने त्या बंद दरवाज्यावर नजर टाकली आणि आनंदाने जल्लोष केला. त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला होता. तो दरवाजा पुर्णपणे वितळून आत जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला होता. अभिजीतने ते सोलर पॅनल पॉकेट मध्ये टाकलं आणि आत प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ प्रोफेसरांनीही आत प्रवेश केला. ते एक गुप्त चेंबर होतं. समोरच एक भलीमोठी पेटी त्यांना दिसली. ती पेटी सोडली तर बाकी त्या चेंबर मध्ये काहीच नव्हते. अभिजीत पेटी जवळ आला. ती पेटी लोखंडाची होती. तिला लोखंडाच कुलूप होतं. पण त्या कुलूपाची चावी त्यांच्या समोरच पेटीच्या वरती ठेवली होती. अभिजीतने प्रोफेसरांकडे एक नजर टाकली. प्रोफेसरांनी त्याला नजरेने खूण केली. अभिजीतने पेटी वरील चावी उचलून कुलूपात घुसवली. कुलूप उघडले गेले होते. अभिजीतने पेटीची कडी काढली. त्याने पेटीच झाकण उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते झाकण इतकं जड होत, कि एकट्या कडून उघडलं जात नव्हत. प्रोफेसर मदतीसाठी पुढे झाले. दोघांनाही आपल्या पूर्ण ताकदीने जोर लावला. अखेरीस झाकण उघडले गेले आणि मोठा आवाज करत मागे कलंडले. त्या पेटीत तीन-चार चर्मपत्रांच्या गुंडाळ्या होत्या. सोबतच एक छोटी पेटी सुध्दा होती. अभिजीतने एक गुंडाळी उचलली आणि तिला उघडली. समोरच मोठ्या अक्षरात लिहिलेले होते,

                             'डेड सी स्क्रॉल्स'

                                                                  क्रमशः


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel