priyadarshanikapure@gmail.com
(लेखिकेचे टोपण नाव: मैथिली अतुल)


•    एखाद्याबरोबरचा फोटो इथे पोस्ट करताना, त्यात आपण सोबतच्या व्यक्तीपेक्षा जास्त सुंदर दिसत असू ही शक्यता जास्तीत जास्त पडताळली जाते नै?
•    ह्या हॉरर सिरियल्स नंतर नंतर कॉमेडी शो मध्ये परावर्तित होतात नै?  कोण घाबरायलाच तयार नसतं.
•    सोसायटीचे व्हाट्सपग्रुप हे फक्त कुणी गाडी चुकीच्या पार्कींग मध्ये लावलीय आणि कुणाचा कचरा कुणाच्या दारासमोर किंवा जिन्यात पडलाय ह्या कारणांवरून भांडण्यासाठी असतात नै?
•    एखादा स्क्रीन शॉट टाकला किंवा पाठवला तर तो काय आहे हे बघण्यापेक्षा त्यावर किती वाजलेत, सिम किती आहेत? बॅटरी किती आहे? आणि बाकीच्या सगळ्या नोटिफिकेशन बघणारे किती चौकस असतात नै?
•    तुम्ही एखाद्यावर जेवढं प्रेम कराल त्याच्या दुप्पट किंवा निदान जेवढं करू तेवढं तरी मिळेल की नाही शंका आहे, पण तुम्ही एखाद्याचा जितका द्वेष कराल त्याच्या दहापट द्वेष मात्र तुम्हाला रिटर्न मध्ये मिळेल ह्याची खात्री असते, नै?
•    फेसबुकवरच्या स्टेटसला, पोस्टला फोटोंना लाईक , लव्ह, हाहा देऊन इतकी सवय झालीय की , वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचताना पण उगाचच तिथेच रिऍक्ट व्हायची इच्छा होते, नै?
•    जिथे जिथे कामवाल्या मावशी कामाला जातात, त्या त्या लोकांशी आपापसात काहीच बोलणं होऊ नये म्हणून त्या योग्य ती काळजी घेत असतात नै?
•    कुणीतरी म्हटलंय : व्यसन हे व्यसनच असतं. त्यात चांगलं व्यसन आणि वाईट व्यसन असा भेद नसतो. तसं फ्लर्टींग हे फ्लर्टींगच असतं,  त्यात हेल्दी आणि अनहेल्दी हा प्रकार नसतो, नै?
•    सगळ्या टूथपेस्टला कोलगेट म्हणणारे तेच लोक असतात जे कुठल्याही नुडल्सला मॅगी आणि वॉशिंग पावडरला निरमा म्हणत असतात , नै?
•    ऐकावे वेधशाळेचे.. करावे मनाचे!
•    नेहमी सौ. चा अर्थ सौभाग्यवती नसतो, पै. चा अर्थ पैलवान नसतो हे समजायला आयुष्यातली बालपणीची दहा बारा वर्षे जावी लागली. लहानपणी सौ. दुरदर्शन असं बघून दुरदर्शन ला सौभाग्यवती का म्हणत असतील असा प्रश्न माझ्या बाप्पांना(आजोबांना) विचारला तर त्यांनी पाठीत जोरदार फटका दिलेला आठवलं, वरती कुंबलायला पाहिजे काठीने अशी धमकी सुद्धा.
•    ते हम्म माहिती होतं, hmm पण माहिती आहे, पण अलीकडे कमेंटमध्ये नुसतं "हं" करायचं काय फॅड आलंय फेसबुककर जाणे!!
•    रामायणापेक्षा महाभारत आणि त्यातली व्यक्तिमत्त्व नेहमीच भुरळ घालत आलीयेत... मग तो कृष्ण असो, द्रौपदी असो, दुर्योधन असो वा अश्वथ्यामा , त्यांच्याबद्दल वाटणारं कुतुहल संपत नाही.
•    कुठल्या हिरो हिरोईन मध्ये कोण वयाने लहान आहे, कोण मोठं आहे? दोघांच्या वयात किती अंतर आहे?, त्यांचं हे कित्व लग्न नि कितवं अफेअर? ह्या सगळ्यांच्या चौकशा आणि माहिती खुद्द त्या लोकांपेक्षा मिडिया आणि आम्हालाच जास्त असते, बाकी त्या सेलिब्रिटीना त्याचा काडीमात्र फरक पडत नाही आपण मात्र त्यांनी काय करायला हवं काय नको ह्याच्या बाता मारत बसतो , नै?
•    लोकांना हवं तसं वागायचं आपण बंद केलं की त्यांना आपल्यात असलेले आणि नसलेलेसुद्धा वाईट गुण दिसायला आपोआप सुरवात होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel