navneetsoar@gmail.com
9421974648

 
अरे संसार संसार,  त्याचे जाणूनी घ्या रे सार,  
करणे कठीण आहे पार ||
 
दोन जीवांचा असतो संसार,  जोपर्यंत वाढत नाही पसारा,  
तोपर्यंत असतो एकमेकांना आसरा ||
 
एकदा का आला दोघात तिसरा,  पत्नी म्हणते माझी सेवा थोडी विसरा
दोघांच्या प्रेमात सुरू होतो घसारा ||
 
मग हळूहळू सुरू होते शाब्दिक द्वंद्व,  क्षणो क्षणी वाटते का यावे असे निर्बंध
निर्बंध वाटतात तिसऱ्या मुळे शिस्तबद्ध ||
 
संसार जसा फुलतो कळीची होतात फुले,  म्हणतात ना मुले म्हणजे देवाघरची फुले
मुलांमुळेच संसार हा खुले ||
 
त्यांच्या पंखांनी ते जेव्हा उडू लागतात,  तेव्हा आनंदाच्या कळ्या फुलू लागतात ||
त्यांच्या जाण्याने मन होते विषण्ण,  त्याला काही करू शकत नाही आपण ||
कठीण संसार असला तरी होतो पार,  अरे संसार संसार जाणुनी त्याचे सार ||
संसारही एक रांगोळी आहे.  नक्षी कोणती ते ठरवायचे आहे ||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel