फोन: 8383903641/8898426792

समाधान गूढ विचारात एकटाच एकटक फिरणाऱ्या बोटीकडे लक्ष्य वेधून हरवला, डोळ्यात विवंचना कसला तरी खोल विचार आजू बाजूचे भान विसरून जगलेल्या आयुष्याची उजळणी चालू होती.

काय चुकले काय बरोबर ते कळण्याच्या पलीकडे गेलेले त्याचे अस्थिर मन नक्की काय शोधत होते त्यालाच ठाऊक.

मनातला आवाज:

"देवा खरंच तू आहेस का?

की भाकडकल्पना फक्त समाधानासाठी, ज्यांच्यामुळे या देहाला अस्तित्व मिळाले फक्त त्यांनाच देव  मानणारा मी, आज इतका हतबल झालो आहे, कारण ते तुला देव मानतात आणि मी त्यांना, का असे घडले या वयाचे होईपर्यंत अजूनही सुखाची परिभाषा कळत नाही.

काय करावे तूच सांग की संपवून टाकावे हे आयुष्य?

एकदाचा सुटकेचा नसलेला श्वास.

पोट टिकडीने टाहो फोडत होता समाधान मनातल्या मनात.

नीरव शांतता, त्यात वाऱ्याची थंडगार झुळूक, विचारात एवढे मग्न झाले की 11 कधी वाजले हे कळलेच नाही, अचानक एक चोरटा स्पर्श झाला(वाऱ्याचा) आणि त्याची तंद्री हरवली, एवढ्या गर्दीत तो स्वतःला त्याला फक्त तोच आणि  वाऱ्याचा गोंगाट सोबतीला असे वाटू लागले, जणू तो वारा त्याला काही सांगायचं प्रयत्न करू लागला.

एक  हाक त्याच्या कानावर, वाऱ्याचा गोंगाट शांत होऊन त्याचा कानाचा मागोवा घेऊ लागले, जणू काही स्वप्न असे.

"बोल बाळा काय झाले?" का एवढा कष्टी आहेस? भेदरलेला समाधान इकडे तिकडे पाहू लागला आवाज कुठून येतोय पण आवाजा शिवाय त्याला काहीच उमगत न्हवते.

पुन्हा आवाज,"घाबरू नको मी तो आहे ज्याच्यावर तुझा विश्वास नाही, पण माझे अस्तित्व तू नाकरूही शकत नाहीस." आता कुठे समाधान भानावर येत होता, काय होतेय  काही कळणाच्या पलीकडे तो गेला होता, आपला भास असेल की काय? पण नाही त्याला कळले की नाही काही दैवी शक्ती आहे जी त्याला संबोधित करत होती, तो तिला शरण गेला आणि आपला भूतकाळ आणि जीवनाला आलेल्या मरगळीचा खुलासा करू लागला.

की कसे आपल्याला कुठेच किंमत नाही, सगळ्या कामात अडचणी, आनंद म्हणजे काय? हेच तो विसरला होता.

शेवटी पुन्हा आवाज आला,"ठीक आहे मी तुझ्या समस्या सोडुवू शकतो, मी तुला एक वरदान देतो की तुझ्या ज्या काही इच्छा असतील त्या तू बोलताक्षणी पूर्ण होतील, पण त्याने तुझे समाधान झाले पाहिजे, समाधानाचे रुपांतर हावेत नाही झाले पाहिजे, फक्त आणि फक्त निव्वळ तुझ्या मनाला समाधान मिळेल. तीच इच्छा पूर्ण होईल"

असे बोलल्यानंतर तो आवाज शांत झाला, समाधान ला तर काहीच कळत न्हवते ते एक स्वप्न होते की भास की वेड लागले त्याला? ती रात्र तशीच काढल्या नंतर समाधान सकाळी उठला रात्रीचे पुन्हा आठवू लागला? स्वप्न असेल म्हणून स्वतःची समजूत काढू लागला.पण आज एक विलक्षण बदल होता त्याच्या मध्ये आज समाधान जर जास्तच उत्साही वाटत होता.रोजच्या दिनक्रमात तो व्यग्र झाला तरी राहून राहुन त्याला रात्रिचा प्रसंग काय डोक्यातून जात न्हवता.

वरदान जे भेटले होते त्याची पडताळणी करन बघायची त्याला इच्छा होत होती,पण एक मन सांगत होते की हे सगळे स्वप्न असेल म्हणून.न राहवून त्याने एक इच्छा मनातल्या मनात त्याने दर्शवली.त्यांनी दिलेले उधार चे पैसे त्याला भेटू दे आणि त्याचा या महिन्याचा प्रश्न सुटू दे. आणि तेवड्यात त्याचा देणेकरी येऊन त्याची माफी मागुन त्याचे पैसे दिले आणि निघून गेला. याचे त्याला फार आश्चर्य वाटले, आणि तेवढाच आनंदही झाला, आजपासून त्याला समाधान मिळणारे सगळे होणार होते. त्यांनी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी समाधान मिळणार त्यास सगळ्या इच्छा त्याने प्रकट केल्या, आणि समाधानी झाला.आज दिवस भरात त्याला खूप आनंद झाला होता. संध्याकाळी त्याने एक लॉटरीचे तिकीट काढले, एक कोटी रुपयांचे, आणि ती लागू दे ही इच्छा प्रकट केली, आणि सोडतीच्या दिवसाची वाट पाहू लागला, आणि सोडतीत निकाल लागला, पण लॉटरी समाधानाला लागली न्हवती, कारण यात त्याची हाव होती जी पूर्ण होणार न्हवती.त्याला कळून चुकले की वरदान फ़क्त समाधान होई पर्यंत चे भेटले होते, खरे सुख हे समाधानात आहे, पुढे जाऊन त्यांनी आपल्या इच्छा फक्त ज्याने समाधान मिळेल त्याच व्यक्त केल्या आणि देवाच्या अस्तित्वावर त्याला विश्वास बसला. हाव पेक्षा ज्यात आहात त्यात समाधान माना आणि प्रामाणिक प्रयत्न करा, कारण समाधान हेच खरे सुख आहे आणि हे देवाचे वरदान आहे, जे सगळ्यांना लाभले आहे.

रोहन केदारे
पत्ता:  CGS कॉलनी ,सेक्टर - A/93 BLG no 05 भांडूप ईस्ट, मुंबई-42

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel