"देहभान" नाटकाबद्दल
लेखिका: कु. वैष्णवी कारंजकर, सातारा
(Mass communication and journalism,
आकाशवाणी पुणे, युवावावी कार्यक्रम संचालक)

अभिराम भडकमकर यांस,

नुकतंच तुमचं 'देहभान' हे नाटक वाचनात आलं.

आवडलं, नाही आवडलं असं काही उत्तर सध्या तरी मी देऊ शकत नाही पण या नाटकाने विचार करायला मात्र नक्कीच भाग पाडलं आहे.

नाटकाच्या नावापासूनच सुरू करते- 'देहभान'
 
तत्व, निष्ठा, कर्तव्य यांच्यासोबत देहाच्या गरजा, त्याविषयीचे भान किंबहुना तत्व, निष्ठा, कर्तव्य ही देहाच्या बाबतीतही लागू होतात याचं भान ठेवणे.

सुरुवातीला वाटलं "आधुनिक" विषय आहे म्हटल्यावर मुक्त शरीरसंबंध, नायक- नायिकेच्या तोंडी बोल्ड संवाद, प्रसंगी कमरेखालचे उल्लेख, शिव्या असणार! पण हे नाटक याहीपलीकडे जाऊन आपल्याशी संवाद साधतं.

या नाटकातली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे यात नायक नायिका असं कोणी नाही. नाटकातील प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत, आयुष्यपटात नायक आहे. प्रत्येकाचं एक वेगळं विश्व आहे आणि त्या विश्वातून बाहेर पडून ते एक नवीन विश्वाचा शोध घेऊ पाहतंय.

विषयाबद्दल बोलायचं म्हणजे आपल्या भावनांशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे आणि ते खूप कमी लोकांना जमतं!! यासाठी एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करता यायला हवा. भारतीय समाज 'माणूस' म्हणवणाऱ्या प्रत्येकाला हा अवकाश देण्यात कुठेतरी कमी पडतोय का? हा प्रश्न मला पडतो.

शरीरसंबंध ही शरीराची गरज नाही तर केवळ वंश वाढवण्याची प्रक्रिया आहे हे नकळत आपल्या मनावर बिंबवलं जात आहे. आपल्या आधीच्या पिढ्यांवरही त्यांच्या नकळत हेच संस्कार झाले. त्यामुळे आपण मोकळेपणाने शरीरसंबंधांना स्वीकारू शकत नाही. ते अभिव्यक्तीचं एक माध्यम आहे ही गोष्ट आपल्याला मान्य करवत नाही!!

इंग्रजीत या एकाच क्रियेला Sex आणि Love Making असे दोन वेगळे शब्द आहेत.

प्रेमापोटी एकमेकांना आपलंसं करणं, देहभान राखून प्रेम करणं म्हणजे Love Making.

जोपर्यंत या दोन्हीमधला फरक कळत नाही आणि तो आपण स्वीकारत नाही तोपर्यंत हे नाटक कोणत्याही काळास सुसंगतच असेल, मग तो काळ 1950चा असो, 2002चा असो किंवा 2019 चा!

© कु. वैष्णवी कारंजकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel