सार जग आता एका तणावग्रस्त व स्फोटक अवस्थेतुन जात आहे . या तणावग्रस्त परिस्थितीची आणि त्यात घडणाऱ्या घटनांची naustradamus ने वर्तवलेली अनेक भाकिते तंतोतंत खरी ठरली आहे .हिटलरचा , नेपोलियन चा उदय व अस्त, इंदिरा गांधींची हत्या तसेच नुकत्याच घडलेल्या ११ september २००१ ला अमेरिकेवर झालेला आतंकवादी हल्ला ही भाकिते naustradamus ने ५०० वर्षे आधीच नोंदवली होती . त्यामुळे जगाचे लक्ष पुन्हा naustrademus व त्याने गूढ भाषेत वर्तवलेल्या भाकीतांकडे गेले आहे .
नुकत्याच संपलेल्या सहस्त्रकात सर्वाधिक रक्तपात झाल्याची नोंद इतिहासाने घेतली आहे .. भीषण जातीय संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगातील अनेक गरजू देश लाचार झाल्याचे जगाने पाहिले आहे . आणि म्हणूनच ही भाकिते ४ शतके पूर्व नोंदवणार्या naustradamus चा परिचय करून देणे महत्वाचे वाटते ......
आपल्या भविष्यकथनसिद्धीने जगाला हादरवून ठेवणाऱ्या या ज्योतिषाचे नाव होते . michel D naustrademus . या जन्म १४ डिसेंबर १५०३ रोजी दुपारी मीन लग्नावर फ्रान्सच्या सेंट रेमी या प्रांतात झाला . ग्रेगेरियन पंचांगाप्रमाणे २३ डिसेम्बर १५०३ . घरची परिस्थिती जेमतेम . आजोबा धान्याचे घाऊक व्यापारी . हा नऊ वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबाने धर्मांतर केल . तो ज्यू चा क्रिश्चन झाला . चार भावंडांमध्ये हा सर्वात थोरला होता . लहानपणी आजोबांनीच त्याला लेटीन , हिब्रू , ग्रीक या भाषा शिकवल्या तसेच गणित व पाश्चात्य ज्योतिष शास्त्राचे प्राथमिक धडे दिले .
पुढे १५२२ मध्ये हा वैद्यकीय शिक्षणासाठी मोन्तेपोलियर या शहरात गेला . पण ग्रंथालयात बसून हा तासंतास ज्योतिष , गूढ विद्या , किमया या संबंधीचे ग्रंथ वाचत असे . आपल्या अत: प्रेरणा तीव्र आहेत याची जाणीव त्याला होती .
Naustrademus ने जीवनात दीर्घकाळ भटकंती केली . त्याच्या उपचारांना यश येत असल्यामुळे वैद्यकीय व्यवसायातील लोकांनी त्यांच्याविरुद्ध केलेल्या कारस्थानान मुळे , आपल्या ज्योतिष शास्त्राच्या व्यासंगामुळे आलेली संकटे यामुळे त्याची ससेहोलपट चालू होती . वारंवार गाव बदलावी लागत होती. याच कालखंडात त्याची पहिली पत्नी प्लेग च्या साथीला बळी पडली . त्याच उद्विग्न मनः स्थितीत हा प्लेग ग्रस्थांची सेवा करीत होता . त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या २० वर्षात त्याला शांतता लाभली . त्यात त्याने दुसर लग्न केल . सेलोन येथे तो स्थायिक झाला . या त्याच्या दुसर्या बायकोने त्याला चांगली साथ दिली . याच वेळी त्यान आपल्या छताच मजल्यावरील भागच अभ्यासिकेत रुपांतर केल .. आणि इथेच अद्भुत भविष्याचा जन्म झाला .
१५४६ ते १५६६ हा वीस वर्षांचा काळ Naustrademus च्या जीवनातला महत्वाचा अंतिम टप्पा . याच कालखंडात त्याने जगाला शतकानु शतके हादरवून टाकणारी भाकिते नोंदवली . आपल्या घराच्या तिसर्या मजल्यावरच्या जागेत रात्री तो समाधी लागल्या सारखा बसत असे . नेमक त्याच वेळी त्याला त्याच्या अतींद्रिय शक्ती मुळे भविष्य दिसत असे . भाकिते ऐकायला येत असत .
naustrademus सेन्चुरीज मध्ये स्वतः असे सांगतो की " प्रोफेटिक स्पिरीटने मला शब्द न शब्द सांगितला आणि तो मी लिहून घेतला एवढच नव्हे तर आगामी २ हजार वर्षातील संभाव्य घटना मला दिसल्या. "
आपल्या ऋषी मुनींनी अशाच अतींद्रिय शक्तींनी ज्ञान प्राप्त झाले होते . आजही अशा घटना घडतात .
naustrademus ने अनेक पंचांग प्रसिद्ध केले एवढच नव्हे तर हवामान , पीकपाणी यांवर चर्चा केलेली असे . त्याच भविष्य अतिशय सटीक असे . त्यामुळे त्याला कीर्ती आणि पैसा दोन्ही मिळाल्या . त्यानंतर त्याला अतींद्रिय शक्तींनी आणि प्रोफेटिक स्पिरीट ने पुढील २ हजार वर्षाचं जे दर्शन घडवल . ते इतक भयावह होत की ते प्रकट कस कराव याचा त्याला पेच पडला .
हायड्रोमेन्सि नावच एक शास्त्र ज्यू , ग्रीक संशोधकांना , गूढविद्येच्या अभ्यासकांना अवगत होत . यात पाण्यात पाहून भविष्य वर्तवण्यात येत . naustrademus ला त्याविषयी आलेला पहिला अनुभव असा आला .....
रात्र वाढत होती . naustrademus तिसर्या मजल्यावरच्या खोलीत बसला होता . त्याच्या समोरच्या परातीतल पाण्यात लाटा उठत होत्या . पाण्यातील आंदोलन त्याला त्याच्या शरीरात जाणवत होती . त्याचे हात थरथरायला लागले . खोली धुक्याने भरून गेली . पाण्यातून वाफा यायला लागल्या . खोलीत चित्र विचित्र आकृत्या संचार करताहेत अस जाणवायला लागल .. आणि naustrademus ला काही ऐकू येऊ लागल .
हा प्रकार रोज रात्री सुरु झाला . त्याच्यापुढे भविष्य उलगडत गेल . तो डोळ्यांनी पाहत होता व कानांनी ऐकत होता . जे ऐकायला येईल, दिसेल ते लिहित होता . आणि पूर्ण जागृत अवस्थेत आपण जे काही पाहिलं , ऐकल , लिहील ते पाहून थरारून जात होता .
Naustrademus दररोज रात्री अभ्यासिकेत बसल्यावर Naustrademus ला विदेही अवस्था प्राप्त होत असे . त्या अवस्थेत तो कानांनी जे ऐकत होता , लिहित होता डोळ्यांनी पहात होता आणि हातांनी लिहित होता ते म्हणजेच भाकितांच्या ' सेन्चुरीज '. ज्याला आपण Naustrademus ची भाकीत म्हणून ओळखतो .
त्या विदेही परिस्थितीत त्याला अत्यंत भयानक असलेला भविष्यकाळ दिसत होता . त्यात प्लेग चा प्रादुर्भाव , महा दुष्काळ , विनाशक नरसंहार करणारी युद्धे , राज्यक्रांती , वाढलेली गुन्हेगारी , धर्म भ्रष्टता , ३ जागतिक महा युद्धे दिसत असे .
त्याची एक एक भाकिते म्हणजे एक प्रकारची कोडीच त्यातल्या काही मोजक्याच इथे उदाहरणासह सांगतो .
तो सेन्चुरीज मध्ये एका ठिकाणी लिहितो " बुद्धिमान माणसेच संहारक शस्त्रे शोधून काढतील . मृत्यूचे पक्षी आकाशात किंचाळत राहतील . भूमीसाठी पाण्यात लढाया होतील . चाकांवरून किल्लेच किल्ले पुढे सरकतील . हवेत विष पसरून जीव गुदमरून जाईल . ढगातून अग्नीकडून शहरे बेचिराख होतील . लोक जमिनी खाली आसरा घेतील "
बुद्धिमान माणसेच संहारक शस्त्रे शोधून काढतील . आपल्याला माहितच आहे कि einstain ने अनु उर्जेचा शोध लावला त्याचाच रुपांतर nuclear bomb सारख्या संहारक शस्त्रात झाल .
म्रुतुचे पक्षी आकाशात किंचाळत राहतील . इथे तो जेट विमाने , super sonic विमाने तसेच पहिल्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या विमानांना चा तो पक्षी म्हणून उल्लेख करतो . याच विमानांच्या सहाय्याने २ महा युद्धात , शीत युद्धात स्फोटक शस्त्रांचा वर्षाव करून प्रचंड हानी करण्यात आली .
आज समुद्र टाळला जमिनी खाली शहरे स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत . इराक ने bomb हल्यान पासून संरक्षण करण्यासाठी जमिनीखाली काही वसाहती बांधल्याचे उघड झालेच आहे.
त्याची भाकिते हि अनेकदा घटना घडून गेल्या नंतर कळून येत . तरी काही घटना अगोदर कळून येण्या सारख्या होत्या. पहिले व दुसरे महायुध्द, फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी त्याच्या पुस्तकांना उत आला होता .
बायबल नंतर आता पर्यंत जास्त आवृत्या निघालेलं सेन्चुरीज हे एकमेव पुस्तक .
Naustrademus ने काही सेन्चुरीज मध्ये " व्हल्गर अडव्हेर " असा शब्द वापरला . लोकांना त्याचा अर्थ दोनशे वर्षानंतर फ्रेंच राज्यक्रांती झाल्यावर समजला . त्यान वापरलेल्या ग्रेट ब्रिटन या शब्दच रहस्य शंभर वर्षानंतर समजल . अशी अनेक उदाहरण आहेत , तो एके ठिकाणी म्हणतो कि मानव जो पर्यंत खूप दुख्ख भोगणार नाही तो पर्यंत शांततेन जगायला शिकणार नाही .
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला त्याचा मृत्युदिन ही माहित होता . त्याने १७ जून १५६६ ला आपल मृत्यू पत्रक तयार केल , त्यात वाटणी तसेच आपला मृत्यू कधी येईल हे देखील नमूद केल .
२ जुलै ला त्याने देह ठेवला . त्याच्या इच्छेनुसार त्याला चर्च च्या भिंतीत उभा गाडण्यात आल . त्याचा मुलगा सीझर याने त्या थडग्यावर त्याचा अर्ध पुतळा बसवला . त्याच्या आईने पुत्ल्याखालील संगमरवरी दगडावर पुढील मजकूर खोदून घेतला .
" इथ मायकल Naustrademus ची हाडे विसावा घेत आहेत . मर्त्य लोकांमध्ये हा एकटाच प्रदीर्घ भविष्याचा अचूक वेध घेऊ शकत होता . ग्राहनक्षत्रांच्या आधारे तो अचूक भविष्य सांगू शकला . तो ६२ वर्षे , ६ महिने १७ दिवस जगला . सलोन इथे २ जुलै १५६६ रोजी मृत्यू पावला . तरी भावी पिढ्यांनी त्याची शांती ढवळू नये ."
पण २२५ वर्षांनी एक रहस्यमय, अत्यंत गूढ भाकीत समोर आल . त्याची कथा रोमांच उभे करते यात शंका नाही .
Naustrademus ने आपल्या डायरी मध्ये एक गोष्ट लिहून ठेवली होती .
त्या पानावर लिहील होत " माझ्या मृत्यू नंतर बरोबर दोनशे पंचवीस वर्षांनी नास्तिक , उग्रवादी ख्रिश्चन लोक माझे थडगे पुन्हा उकरून काढतील आणि त्यानंतर त्यांचा लगेच मृत्यू ओढवेल ."
naustrademus ला मृत्यू नंतर संतत्व प्राप्त झाले होते . त्यामुळे सर्व ठरतील राजकीय अधिकारी व राजघराण्याच्या व्यक्ती , सर्व ठरतील नागरिक त्याच्या कबरीवर फुल वाहायला येत असत ,
१७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली . या क्रांतीचे भविष्य naustrademus ने नोंदवले होते . १७९१ मध्ये naustrademus च्या विरोधकांनी काही उग्रवादी सैनिकांना धरून त्याचे थडगे उकरायला लावले .
त्यावेळी naustrademus च्या मृतदेहाच्या हातात एक पत्र सापडले . त्यात अस स्पष्ट लिहील होत की , मी १७९१ मध्ये हे थडगे उकरले जाईल . ते भविष्य वाचून ते सैनिक हादरले .त्यांना भयग्रस्त अवस्थेत उन्माद वायूचा झटका आला . त्यांनी भरपूर मद्यपान करून हसत खिन्दळत तिथ धिंगाणा घालायला सुरवात केली . अखेर हे सार अनावर झाल्याने त्यातच त्यांचा अंत झाला . दुसर्या दिवशी दर्शनाला आलेल्या काही लोकांना त्या सैनिकांचे म्रित्देह , उकरेले थडगे आणि naustrademus चा मृतदेह दिसला . लोकांनी पुन्हा saint laurence चर्च च्या कबर्स्थनत naustrademus थडग्याची पुन्हा उभारणी केली . आजही तिथे ते अस्तित्वात आहे .
याचा जीवनप्रवास जितका रहस्यमय होता तेवढीच त्याची भाकितेही रहस्यमय व आश्चर्यकारक होती . यातली जवळ जवळ सगळी भाकिते पुढे सत्यात उतरली .
यात त्याने २००० त २०२५ सालची आशचर्य कारक , बुद्धिवादाच्या पलीकडची , सत्यात उतरलेली आणि भविष्यकाळातल्या अद्भुत घटनांच्या वर्तवलेल्या भाकितांचा उद्या एक आढावा घेऊ .
क्रमश:
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.