भारतामधील Top 10 मंदिरे भारतातील मंदिरे प्राचीनता आणि मान्यतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही मंदिरे असे आहेत, जेथे फक्त कमाईच होत नाही तर येथे येणार्‍या भक्तांची संख्या प्रत्येक वर्षी चकित करणार्‍या आकड्यांमध्ये समोर येते. अनेक मंदिरांमध्ये लाखो-कोटीचे दान जमा होते. असे मानले जाते की, ही सर्व मंदिरे चैतन्य असून येथून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. भारतातील दहा सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या मंदिरांची माहिती... श्री पद्मनाभस्वामी मंदिर त्रिवेंद्रम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर आपली भव्यता, स्थापत्य कला आणि ग्रॅनाईटमधील स्तंभांची दीर्घ श्रृंखला यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची निर्मिती 18 व्या शतकात त्रावणकोर राज्याचा राजा मार्तंड वर्मा यांनी केली होती. आता या मंदिराचे कामकाज राजघराण्याकडे आहे. या मंदिरातील मूर्तीमध्ये भगवान विष्णू शेषनागावर शयन मुद्रेत विराजमान आहेत. तिरुअनंतपुरम हे नाव भगवान विष्णूंच्या अनंत नावाच्या नागाच्या नावावर ठेवण्यात आले असल्याचे मानले जाते. येथे भगवान विष्णूंच्या विश्राम अवस्थेला पद्मनाभ म्हटले जाते. पद्मनाभस्वामी मंदिरातील तळघरातील पाच खोल्यांमधून एक लाख कोटी रूपयांचे मौल्यवान दागिने, सोने, चांदीचे भांडे मिळाले आहेत. मीनाक्षी अम्मन मंदिर - तामिळनाडूतील मदुराई शहरात स्थित मीनाक्षी अम्मन मंदिर प्राचीन भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण मंदिरातील एक आहे. मीनाक्षी अम्मन मंदिर जगातील नव्या सात आश्चर्यांमध्ये स्थान मिळाले आहे. हे मंदिर भगवान शिव आणि मीनाक्षी देवी पार्वतीच्या रुपाला समर्पित आहे. मीनाक्षी मंदिर पार्वतीच्या सर्वात पवित्र स्थानांमधील एक आहे. मंदिरातील मुख्य गाभारा 3500 वर्षे जुना मानला जातो. तिरुपती बालाजी मंदिर - तिरुपती बालाजी मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे. हे मंदिर सात पर्वतांपासून बनलेल्या तिरुमला पर्वतावर स्थित आहे. हे पर्वत जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये द्वितीय क्रमांकावर आहेत. या मंदिरात भगवान व्यंकटेश निवास करतात. भगवान व्यंकटेश विष्णूंचा अवतार मानले जातात. हे मंदिर समुद्र सपाटीपासून 2800 फुट उंचीवर स्थित आहे. या मंदिरात दररोज जवळपास 50,000 भक्त दर्शनासाठी येतात. मंदिराची एकूण संपत्ती 50,000 कोटी रुपये आहे. श्री जगन्नाथ मंदिर - पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर भगवान जगन्नाथ (श्रीकृष्ण) यांना समर्पित आहे. हे भारतातील ओडिशा राज्यातील पुरी शहरात स्थित आहे. जगन्नाथ शब्दाचा अर्थ जगाचे स्वामी असा होतो. यांची नगरीच जगन्नाथपुरी किंवा पुरी नावाने ओळखली जाते. या मंदिराला हिंदूंच्या चारधाममधील एक धाम मानले जाते. हे वैष्णव संप्रदायाचे मंदिर आहे. जगन्नाथ मंदिर भारतातील दहा श्रीमंत मंदिरांमधील एक आहे. साईबाबा मंदिर - साईबाबा एक भारतीय गुरु, योगी आणि फकीर होते, त्यांना त्यांचे भक्त संत मानतात. त्यांचे खरे नाव, जन्मस्थळ, आई-वडील संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही. साई ओळख त्यांना भारतातील पश्चिम भागातील महाराष्ट्राच्या शिर्डी गावात पोहोचल्यानंतर मिळाली. शिर्डी साईबाबा मंदिर येथेच आहे. हे मंदिर भारतातील श्रीमंत मंदिरातील एक मानले जाते. या मंदिराकडे जवळपास 32 कोटी रुपयांचे चांदीचे दागिने आहेत. 6 लाख रुपये किमतीचे चांदीचे शिक्के आहेत. तसेच दरवर्षी 350 कोटी रुपयांचे दान जमा होते. सिद्धीविनायक मंदिर - सिद्धीविनायक गणपतीचे सर्वात लोकप्रिय रुप आहे. श्रीगणेशाची सोंड उजव्या बाजूला असेल तर ती मूर्ती सिद्धी पिठाशी संलग्न असते आणि त्यांचे मंदिर सिद्धीविनायक नावाने ओळखले जाते. सिद्धीविनायकाचा महिमा अपरंपार आहे. ते भक्तांची इच्छा लगेच पूर्ण करतात. सिद्धीविनायक मंदिर भारतातील श्रीमंत मंदिरात समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये हे मंदिर स्थित आहे. वैष्णो देवी मंदिर - भारतात हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ वैष्णो देवी मंदिर आहे. हे मंदिर त्रिकुटा पर्वतांमध्ये कटरा येथे 1700 मीटर उंचीवर स्थित आहे. मानिद्रांचे पिंड एका गुहेत स्थापित आहेत. गुहेची लांबी 30 मी. आणि उंची 15 मी. आहे. लोकप्रिय कथेनुसार देवी वैष्णोने या गुहेत लपलेल्या एका राक्षसाचा वध केला होता. मंदिरातील मुख्य आकर्षण गुहेत ठेवण्यात आलेले टीम पिंड आहेत. तिरुपती बालाजी मंदिरानंतर या मंदिरात सर्वात जास्त भक्त दर्शनासाठी येतात. येथे दरवर्षी 500 कोटी रुपयांचे दान जमा होते. सोमनाथ मंदिर - सोमनाथ हे एक महत्त्वपूर्ण हिंदू मंदिर असून हे 12 ज्योतिर्लिंगामधील पहिले ज्योतिर्लिंग आहे. गुजरातच्या सौराष्ट्र भागात वेरावल बंदरावर या मंदिर स्थित आहे. या मंदिराचे निर्माण स्वतः चंद्रदेवाने केले असल्याचे मानण्यात येते. ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख आहे. आतापर्यंत 17 वेळेस हे नष्ट करण्यात आले आणि याचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ मंदिर - कशी विश्वनाथ मंदिर 12 ज्योतिर्लिंगमधील एक आहे. हे मंदिर वाराणसी(काशी) येथे स्थित आहे. या मंदिराचे हिंदू धर्मामध्ये एक विशिष्ठ स्थान आहे. असे मानले जाते की, या मंदिराचे एकदा दर्शन आणि पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. हे मंदिरही भारतातील श्रीमंत मंदिरात गणले जाते. गुरुवयूर मंदिर - गुरुवयूर श्रीकृष्ण मंदिर केरळमध्ये स्थित आहे. हे मंदिर भगवान विष्णूंचे सर्वात पवित्र मंदिर आहे. हे मंदिर जवळपास 5000 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. गुरुवयूर मंदिर वैष्णव समुदायाचे आस्था केंद्र आहे. या मंदिरातील खजीण्यामुळे हे भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरात गणले जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel