सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण महाभारतील युद्घ आजपासून साधारण 5000 वर्षापूर्वी हरियाणातील करुक्षेत्रामध्ये लढले गेले होते अशी मान्यता आहे. लढण्यात आलेले हे युद्घ कौटुंबीय युद्घ होते परंतु यामुळे पूर्ण भारत दोन भागांमध्ये विखूरले गेले होते. कौरव आणि पाण्डवांप्रति आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी या युद्धामध्ये भारतातील सर्व छोटे-मोठे योद्घा रण भूमित उतरले होते. एका बाजूला कौरवांची विशाल सेना होती तर दूस-या बाजूला भगवान श्री कृष्णाच्या छत्रछायेमध्ये पाण्डवांची सेना होती जी कौरवांच्या सेनेच्या तुलनेत खुपच कमी होती. असे असताना देखील पाण्डव सेना कौरवांवर भारी पडली पडली होती. यावेळी कौरवांतर्फे एक चाल खेळण्यात आली ती अशी की, पाण्डवांची सर्वात मोठी ताकद आहे अर्जुन. त्यामुळे कसेही करून अर्जुनाला युद्घ भूमीमधून बाहेर केले पाहिजे आणि मग युधिष्ठिराला बंदी बनवले पाहिजे. जर असे झाले असते तर कौरवांचा या युद्धामध्ये विजय निश्चित होता. कौरव अर्जुनाला युद्घ भूमीतून बाहेर काढण्याच्या योजनेमध्ये यशस्वी झाले आणि दुसरीकडे युधिष्ठिराला बंदी बनवण्यासाठी चक्रव्यूहाची रचना तयार केली. पण, अर्जुनाचा पुत्र अभिमन्युने हे चक्रव्यूह तोडण्यास सुरूवात केली आणि सहा दरवाजे तोडत-तोडत तो शेवटच्या दरवाज्यापर्यंत पोहोचला. शेवटच्या दरवाज्यावर पोहोचल्यावर तेथे एकट्या अबिमन्युला कौरवांच्या सेनेने घेरले व दुर्योधनाचे जीजा आणि सिंधु प्रदेशचे राजा जयद्रथ यांनी मागून अभिमन्युवर वार केले. यानंतर सर्व योद्धांनी मिळून अभिमन्युची हत्या केली. ज्यावेळी ही बातमी अर्जुनाला समजली त्यावेळी त्याने ही प्रतीज्ञा घेतली की दुस-या दिवशीच्या युद्धात संध्याकाळ होईपर्यंत जयद्रथाचा वध करू शकलो नाही तर आत्मदाह करून घेईल. त्यावेळी परिस्थिति देखील अशी काही निर्माण झाली आणि अर्जुन निराश होऊन आत्मदाह करण्यासाठी निघाले. अर्जुनाने घेतलेल्या प्रतीज्ञाची गोष्ट जयद्रथाला समजल्यावर तो घाबरून कापायला लागला. आणि त्याने दुस-या दिवशी युद्घ भूमीत येण्यास नकार दिला. परंतु, दुर्योधन आणि इतर कौरवांनी समजावले की, आज पूर्न सेना तुमची रक्षा करण्यासाठी उभी राहिल आणि अर्जुनाला तुमच्यापर्यंत पोहचू देणार नाही. ही गोष्ट ऐकून जयद्रथ युद्घ क्षेत्रात आला आणि महाभारताच्या युद्धाला प्रारंभ झाला. अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले की, माझा रथ जयद्रथाच्या दिशेला घेऊन चला. त्या प्रमाणे अर्जुनाचा रथ जयद्रथाच्या दिशेने मार्गस्थ झाला पण कौरव योद्घा अर्जुनाला पुढे जाऊ देत नव्हते. सूर्य आपल्या गतीने चालत होता आणि अर्जुनाच्या चिंतेमध्ये वाढ होत होती. श्री कृष्णाला ही गोष्ट समजली की, अशा परिस्थितीत जयद्रथाचा वध होणे असंभव आहे. त्यामुळे श्रीकृष्णाने त्याच्या मायेने सूर्याला झाकून टाकले तसे सर्वांना वाटले की, संध्याकाळ झाली आहे आणि त्या आनंदात कौरव सेना नाचू लागली की आता अर्जुन आत्मदाह करणार आणि महाभारतामध्ये आपला विजय निश्चित होणार. सूर्य मावळल्याने अर्जुनाने त्याचे गांडीव धनुष्य खाली ठेऊन दिले आणि आत्मदाह करण्यासाठी निघाले. पण, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की, योद्घाने निराश होण्याऐवजी नेहमी आपले हत्यार धरून ठेवले पाहिजे. हे सर्व सुरू असताना दूसरीकडे उत्साहित जयद्रथ अर्जुनाकडे आला आणि त्यास आत्मदाह करण्यासाठी सांगू लागला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याची माया संपवली आणि आकाशात पुन्हा सूर्य चमकू लागला. कौरव योद्घा सूर्याला पाहून घाबरले आणि जयद्रथ पळू लागले. त्यावेळी श्री कृष्नाने अर्जुनाला सांगितले उचल तुझा गांडीव आणि कर घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण. अर्जुनाने जसे गांडीवावर बाण लावला तसे श्री कृष्ण म्हणाला की, जयद्रथाला त्याच्या वडिलांकडून वृद्धक्षत्र यांच्याकडून वरदान प्राप्त आहे की, जयद्रथाचे डोके भूमिवर पाडणा-या व्यक्तीच्या डोक्याचे तुकडे-तुकडे होतील. त्यामुळे बाण अशा पद्धतीने चालवा की येथून लांब तपस्येला बसलेल्या त्याच्या वडिलांपाशी जयद्रथाचे डोके जाऊन पडेल. हे ऐकून अर्जुनाने दिव्य बाण सोडला आणि जयद्रथाचे डोके धडापासून कापले जाऊन लांब तपस्येला बसलेल्या त्याच्या वडिलांच्या मांडीत जाऊन पडले. ज्यावेळी जयद्रथाच्या वडिलांनी त्याच्या मुलाचे डोके आपल्या मांडित पाहून घाबरले आणि त्यांच्या मांडीतून त्याचे डोके भूमिवर पडले आणि दोघांच्या डोक्याचे तुकडे-तुकडे झाले आणि जयद्रथ परलोकात गेला. अशा पद्धतीने अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


खुनी मांजर
झोंबडी पूल
वाड्याचे रहस्य
भूतकथा भाग १
सापळा
खुनी कोण ?- भाग तिसरा
मारीआजी Mari Aaji
हॅलोविन Halloween
भयकथांची मुण्डमाला
भय इथले संपत नाही…
मॄत्योर्माअमॄतं गमय