तीर्थस्थळाचे नाव समोर येताच आपल्यासमोर नदी, साधू-संत, पूजा, उपासना आणि मठ-मंदिरांचे चित्र उभे राहते. तीर्थ केवळ एक धार्मिक कर्म नसून याची एक व्यावहारिक व्याख्यासुद्धा आहे. तीर्थस्थळाला असलेल्या महत्त्वामुळे आपल्या मनात नमनाचा भाव निर्माण होतो. यात्रा पूर्ण करण्यासाठी जे परिश्रम आणि नियम पाळावे लागतात त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधार होतो. आत्मविश्वास वाढतो. भारत तीर्थस्थळांच्या बाबतीत अद्भुत स्वरुपात श्रीमंत आहे. तीर्थस्थळावरून व्यक्ती घरी आल्यानंतर स्वतःमध्ये अतिरिक्त उर्जा, उत्साहाचा अनुभव करतो. हा फ्रेशनेस त्याला काम करण्यासाठी अधिक योग्य बनवतो. भारतीय तीर्थांची विशेषता म्हणजे तेथील दैवी महत्त्व, निसर्गाचा आनंद आणि पोहोचण्याचा मार्ग. या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन येथे तीर्थस्थळांचे वर्णन करण्यात येत आहे. पहिले हे जाणून घ्या, तीर्थस्थळ किती आणि कोठे आहेत. सामान्यतः चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, सप्तसुरी आणि 51 शक्तीपीठ तीर्थस्थळ मानले जातात. चारधामची स्थापना आद्यशंकराचार्य यांनी केली होती. उद्येश्य होता, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम चार दिशांमध्ये स्थित या धामांची यात्रा करून मनुष्याने भारताचे सांस्कृतिक महत्त्व जाणून घ्यावे. या व्यतिरिक्त तिरुपती बालाजी, वैष्णवदेवी, शिर्डीचे साईबाबा, सालासर हनुमान, मेहंदीपूर बालाजी, बाबा अमरनाथसहित इतर प्रमुख मंदिरांना तीर्थ स्वरुपात पूजले जाते. अथर्ववेदानुसार तीर्थ यात्रा केल्याने पुण्यलोकाची प्राप्ती होते. नदी किनारी का... तीर्थ अशा पायर्यांना म्हटले जाते, ज्या आपल्याला पाण्याकडे घेऊन जातात. याच कारणामुळे तीर्थस्थळ नद्यांच्या काठावर विकसित झाले आहेत. पाणी जीवन आहे. पाण्याचे हे महत्त्व पूर्वजांनी लक्षात घेऊन पाण्याच्या रक्षणासाठी नेहमी प्रयत्नशील राहून नदी किनारी धर्मस्थळ, मठ-मंदिरांची स्थापना केली आहे. धर्म-कर्माशी नद्या जोडण्यामागे जल संरक्षणाचा जो महान संदेश आपल्याला देण्यात आला आहे, तो आज सर्वाधिक प्रासंगिक दिसत आहे. शिव भक्तांच्या आस्थेचे विशेष केंद्र भारतात 12 ज्योतिर्लिंग स्वरुपात आहेत... 1. सोमनाथ (गुजरात) 2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश) 3. महाकालेश्वर (उज्जैन, मध्यप्रदेश) 4. ओंकारेश्वर (मप्र) 5. केदारनाथ (हिमाचल-उत्तरांचल) 6. भीमाशंकर (महाराष्ट्र) 7. विश्वनाथ (काशी, उप्र) 8. त्र्यंबकेश्वर (नाशिक-महाराष्ट्र) 9. श्री वैद्यनाथ (परळी, महाराष्ट्र) 10. नागेश्वर (हिंगोली, महाराष्ट्र) 11. घृष्णेश्वर (महाराष्ट्र) 12. रामेश्वर (तामिळनाडू) सप्तपुरी - सनातन धर्म सात नगरांना खूप पवित्र मानतो, यांनाच सप्तपुरी म्हटले जाते. अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, उज्जैन आणि द्वारका. चारधाम - बद्रीनाथ धाम कोठे आहे - उत्तर दिशेला हिमालयावर अलकनंदा नदीजवळ मूर्ती - विष्णूची शाळीग्राम शिळेपासून बनलेली चतुर्भुज मूर्ती. या मूर्तीच्या उजव्या बाजूला उद्धव तसेच डाव्या बाजूला कुबेर मूर्ती आहेत. द्वारका धाम कोठे आहे - पश्चिम दिशेला गुजरातच्या जामनगरजवळ समुद्र किनारी. मूर्ती - भगवान श्रीकृष्ण रामेश्वरम कोठे आहे - दक्षिण दिशेला तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यात समुद्राच्या मध्ये रामेश्वरम द्वीप. मूर्ती - शिवलिंग जगन्नाथपुरी कोठे आहे - पूर्व दिशेला ओडिशा राज्यात पुरीमध्ये मूर्ती - विष्णुंची निलमाधव मूर्ती यालाच जगन्नाथ म्हणतात. सुभद्रा आणि बलभद्र यांच्याही मूर्ती. 51 शक्तीपीठ - देशभरातील स्थिती देवीचे मंदिरे बंगालचे शक्तीपीठ 1. काली मंदिर - कोलकाता 2. युगाद्या- वर्धमान (बर्दमान) 3. त्रिस्त्रोता- जलपायगुड़ी 4. बहुला- केतुग्राम 5. वक्त्रेश्वर- दुब्राजपुर 6. नलहटी- नलहटी 7. नन्दीपुर- नन्दीपुर 8. अट्टहास- लाबपुर 9. किरीट- वडनगर 10. विभाष- मिदनापुर मध्यप्रदेश येथील शक्तीपीठ 12. हरसिद्धि- उज्जैन 13. शारदा मंदिर- मेहर 14. ताराचंडी मंदिर- अमरकंटक तामिळनाडू येथील शक्तीपीठ 15. शुचि- कन्याकुमारी 16. रत्नावली- अज्ञात 17. भद्रकाली मंदिर- संगमस्थळ 18. कामाक्षीदेवी- शिवकांची बिहार येथील शक्तीपीठ 19. मिथिला- अज्ञात 20. वैद्यनाथ- बी. देवघर (आता झारखंडमध्ये) 21. पटनेश्वरी देवी- पटना उत्तरप्रदेश येथील शक्तीपीठ 22. चामुण्डा माता- मथुरा 23. विशालाक्षी- मीरघाट 24. ललितादेवी मंदिर- प्रयाग राजस्थान येथील शक्तीपीठ 25. सावित्रीदेवी- पुष्कर 26. वैराट- जयपुर गुजरात येथील शक्तीपीठ 27. अम्बिका देवी मंदिर- गिरनार 11. भैरव पर्वत- गिरनार आंध्रप्रदेश येथील शक्तीपीठ 28. गोदावरी तट- गोदावरी स्टेशन 29. भ्रमराम्बा देवी- श्रीशैल महाराष्ट्र येथील शक्तीपीठ 30. करवीर- कोल्हापुर 31. भद्रकाली- नाशिक कश्मीर येथील शक्तीपीठ 32. श्रीपर्वत- लद्दाख 33. पार्वतीपीठ- अमरनाथ गुहा पंजाब येथील शक्तीपीठ 34. विश्वमुखी मंदिर- जालंधर ओडिशा येथील शक्तीपीठ 35. विरजादेवी- पुरी हिमाचल प्रदेश येथील शक्तीपीठ 36. ज्वालामुखी शक्तीपीठ - कांगडा आसाम येथील शक्तीपीठ 37. कामाख्या देवी- गुवाहाटी मेघालय येथील शक्तीपीठ 38. जयंती- शिलॉंग त्रिपुरा येथील शक्तीपीठ 39. राजराजेश्वरी त्रिपुरासुंदरी- राधाकिशोरपुर हरियाणा येथील शक्तीपीठ 40. कुरुक्षेत्र शक्तीपीठ - कुरुक्षेत्र 41. कालमाधव शक्तीपीठ - अज्ञात नेपाल येथील शक्तीपीठ 42. गण्डकी- गण्डकी 43. भगवती गुहेश्वरी- पशुपतिनाथ पाकिस्तान येथील शक्तीपीठ 44. हिंगलाजदेवी- हिंगलाज श्रीलंका येथील शक्तीपीठ 45. लंका शक्तीपीठ - अज्ञात तिब्बत येथील शक्तीपीठ 46. मानस शक्तीपीठ - मानसरोवर बांगलादेश येथील शक्तीपीठ 47. यशोर- जैशौर 48. भवानी मंदिर- चटगांव 49. करतोयातट- भवानीपुर 50. उग्रतारा देवी- बारीसाल 51 वे पंचसागर शक्तिपीठ आहे। हे कोठे स्थित आहे याची माहिती अद्याप कोणालाही नाही. साभार :- हिंदी दैनिक
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel