आपल्या भारतीय संस्कृतीत एखाद्या माणसाचे परिपूर्णत्व बघण्यासाठी पाच निकष लावले जातात, ते पाच निकष म्हणजे पंचकोष होय. हे पंचकोष पुढील प्रमाणे :- 1. अन्नमय कोष 2. प्राणमय कोष 3. मनोमय कोष 4. विज्ञानमय कोष 5. आनंदमय कोष पंचकोषांच्या अभ्यासासाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उत्तम ठरतो. आज आपण प्रथम कोष 'अन्नमय कोष' याबद्दल माहिती घेऊयात. अन्न म्हटल कि आपल्याला पहिले खाणे आठवते, त्याच प्रमाणे हा कोष हा आपल्या शरीराशी निगडीत आहे. एखाद्या माणसाचा अन्नमय कोष परिपूर्ण आहे हे कसे ओळखावे?? तर जो माणूस शरीराने सुध्रुड (म्हणजे फक्त मस्सल्स असलेला नाही मस्सल्स असून जर तो सुस्त असेल तर त्याला सुद्रुड म्हणत नाही ) ज्याने आपले शरीर मेंटेन ठेवल आहे; ज्याचे पोट सुटलेले नाही; ज्याचे शरीर चपळ आहे; ज्याची सहनशक्ती उत्तम आहे आणि जो रोग मुक्त आहे त्याला सुद्रुड म्हटले जाते. तर अन्नमय कोषात पारंगत होण्यासाठी काय करावे ??? मुळात अन्नमय कोष हा शरीराशी निगडीत असल्याने यात दोन ग्रंथांचे महत्व आहे. एक पतंजली यांचा योगसूत्र आणि आयुर्वेद. पतंजली योगसूत्रात १. आसन २. प्राणायम ३. यम ४. नियम ५. प्रत्याहार ६. ध्यान ७. धारणा ८. समाधी यात सर्व कोष येत आहेत पण यातील यम, नियम, आसन, प्रत्याहारा हे अन्नमय कोशातील भाग आहेत (Refer patangali yogsutra on wikipedia for detail informatation) यातील सर्वांची माहिती पुढीलप्रमाणे यम :- यात गांधीजींनी सांगितलेले सत्य, अहिंसा, अस्थेय, अपरिग्रह यांचा समावेश असतो नियम :- यात आयुर्वेदातील सर्व नियमांचा समावेश आहे. आसन :- आपल्या ऋषीमुनींनी ८५००० हून जास्त आसनांचा शोध लावला आहे परंतु आपल्याला यातील १८५ माहित आहेत. तसेच यात सूर्यनमस्कार हि येतात म्हणजे शरीराला व्यायाम हवा हे यातून सांगितले जाते. प्रत्याहार:- आपल्या शरीराची सहनशक्ती वाढवणे होय. २. आयुर्वेद :- हा ग्रंथ आपण फक्त रोग परीहारासाठी रिफर करत असलो तरी आयुर्वेदात रोगाबद्दल खूप खोलवर अभ्यास आहे. १. रोग निदान २. रोगी निदान ३. रोगाची शक्ती कमी करणे ४. रोग परिहार ५. पुन्हा रोग वाढू नये (वा होऊ नये) यासाठी प्रयत्न. ह्या पाच प्रक्रिया आयुर्वेदात अभ्यासिल्या जातात. मात्र याहून महत्वाची गोष्ट आयुर्वेदात आहे ती म्हणजे काळजी (प्रिकोशन्स) कशी घ्यावी. हे आयुर्वेदाचे महत्व आहे. या दोन्ही ग्रंथांना अंगीकार्ल्यावर वा आत्मसात केल्यावर अन्नमय कोष उत्तम राहील यात शंकाच नाही. या बाबतीत मला संत रामदासांचे उदाहरण द्यावेसे वाटते कारण त्यावेळी त्यांनी याचे महत्व ओळखून ११ मारुतींची स्थापना केली. अन्नमय कोष उत्तम ठेवायचे काही नियम:- १. रोज ४५ मिनिटे व्यायाम आणि १५ मिनिटे रिल्याक्सेशन (आराम) २. निसर्गाच्या सानिध्यात अर्धा तास व्यतीत करणे. ३. तुळस आणि कडूनिम्बाचे एखादे पान रोज खाणे. ४. आठवड्यातून एकदा उपवास करणे (फक्त फलाहार आणि दूध) न जमल्यास १५ दिवसान मधून एकदा किंवा महिन्यातून एकदातरी. ५. आपली प्रकृती जाणून आहार करणे. दुसरा कोष आहे प्राणमय कोष. प्राण म्हंटला कि आपल्याला पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे श्वास. बर्रोब्बर, हा कोष आपल्या श्वासाशी निगडीत आहे. हा कोष दुसर्या क्रमांकावर असण्याचे कारण म्हणजे अन्नमय कोष उत्तम झाल्याशिवाय हा कोष परिपूर्ण होत नाही. ह्यासाठी सुद्धा पतंजली योगसूत्र हा ग्रंथ वापरला जातो. काही प्राणायामाचे प्रकार पुढील प्रमाणे:- अनुलोम प्राणायम उज्जयी प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम कुम्भका प्राणायाम विलोम प्राणायाम उद्गीथ प्राणायाम कपालभाती प्राणायाम शितली प्राणायाम शीतकारी प्राणायाम सूर्य भेदना प्राणायाम आणि चंद्र भेदना प्राणायाम सम व्रीत्ती प्राणायाम अग्निसार प्राणायाम भ्रमरी प्राणायाम अग्नी-प्रसन्ना असे म्हणतात योग्य प्राणायामाने सर्व रोग दूर होतात तर या उलट अयोग्य प्राणायामाने सर्व रोग उत्पन्न होतात. म्हणूनच प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली करावा. फायदे:- १. प्राणायामामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. २. यामुळे हुशारी व मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढतो. ३. शरीरावर ताबा ठेवता येतो. ४. संयम, शांती यात वाढ होते. ५. षड्रीपुंना ताब्यात ठेवता येते. प्राणमय कोष उत्तम करायचे काही उपाय 1. नेहमी ताठ बसावे 2. गुरूच्या मार्गदर्शना खाली प्राणायाम शिकावा. समाधी घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्राणायामाचा खूप अभ्यास असतो. हे वरील दोन्ही कोष आपल्या शरीराशी निगडीत आहेत व पुढील तीनही कोष हे मन आणि आत्म्याशी संबंधित आहेत त्याबद्दल नंतर सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आपलाच, यश ओक. स्त्रोत - http://en.m.wikipedia.org/wiki/Yoga_Sutras_of_Patanjali
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel