आजची कथा हि दैवी किंवा देवताबद्द्ल नसुन एक रहस्यमय घडलेली गुढ घटना आहे
रशियाच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली एक लांबलचक पर्वतराजी आहे.
उरल!
उरल नदीच्या खोर्यापासून आणि कझाकस्तानच्या वायव्य प्रांतापासून ते पार आर्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेली उरल पर्वतरांग सुमारे १६०० मैल पसरलेली आहे. आर्क्टीक, सब-आर्क्टीक, उत्तर, मध्य आणि दक्षिण असे उरल पर्वताचे पाच भाग पडतात. उरल पर्वतरांग ही आशिया आणि युरोप यांना विभागणारी नैसर्गीक सीमारेषा मानली जाते. भारतीय उपखंडात जे स्थान हिमालय पर्वताचं, तेच रशियात उरल पर्वतराजीचं!
उरल पर्वतात गिर्यारोहणाच्या अनेक मोहीमा नियमीतपणे आखल्या जातात. अनेक रशियन गिर्यारोहक हिमालयातील शिखरांवर मोहीमेची पूर्वतयारी म्हणून उरल पर्वतात सराव करत असतात. थंडीच्या प्रदेशात भरपूर बर्फवृष्टी होत असल्याने स्कीईंगसाठीही अनेक जण या पर्वतावर येत असतात.
ये़त्केरीनबर्ग हे स्वर्डलोव्स्क ओब्लास्ट प्रांतातील हे प्रमुख शहर. पूर्वी स्वर्डलोव्स्क या नावानेच हे शहर ओळखलं जात असे. या शहरापासूनच काही अंतरावर उरल पर्वतराजीचाच भाग असलेला ऑटोर्टेन पर्वत पसरलेला आहे. बर्फाच्छादीत उतारांमुळे हा भाग स्कीईंग करणार्यांसाठी मोठंच आकर्षण ठरलेला आहे.
१९५९ मध्ये स्वर्डलोव्स्क इथल्या उरल युनिव्हर्सिटीतील दहा जणांच्या एका तुकडीने ऑटोर्टेन पर्वतावर स्कीईंगची मोहीम आखली. या मोहीमेत एकूण दहा जणांचा समावेश होता. मोहीमेचा प्रमुख इगोर ड्यॅट्लॉव्ह हा एक स्कीईंग इन्स्ट्रक्टर होता. ही स्कीईंगची मोहीम त्यानेच आखलेली होती. निकोलाय थिबक्स-ब्रिंगनोल्स आणि रस्टेम स्लोबोडीन हे त्याचे सहकारी होते. युरी क्रिव्होनीस्चेंको, युरी दोरोशेन्को, अलेक्झांडर कोल्व्हॅटोव्ह, सेम्यॉन झोलोत्रिऑव, युरी युदीन यांचाही मोहीमेत समावेश होता. हे सर्व उरल उनिव्हर्सीटीतील विद्द्यार्थी होते. यांच्याव्यतिरीक्त झेनेडा कोल्मोग्रोवा आणि ल्युड्मिला डुबिनिया या दोघी विद्द्यार्थिनीही या मोहीमेत सहभागी झाल्या होत्या. हे सर्वजण अनुभवी गिर्यारोहक आणि स्कीईंग करणारे होते. उरल पर्वतातील अधिक कठीण मोहीमेची पूर्वतयारी म्हणून ड्यॅटलॉव्हने ही मोहीम आखली होती!
स्वर्डलोव्स्क इथून सर्व तयारीनीशी दहाजणांनी रेल्वेने इव्हडेल गाठलं. इथून एका ट्रकमध्ये सर्व सामान चढवून ते विझाई या पायथ्याच्या शेवटच्या गावात पोहोचले. विझाई इथून २७ जानेवारीला त्यांनी डोंगराच्या दिशेने पायपीट सुरू केली. परंतु दुसर्याच दिवशी त्यांच्यापैकी युरी युदीन याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली! आपल्या सहकार्यांना शुभेच्छा देऊन युदीन परत फिरला.
पुढे काय होणार होतं याची थोडी तरी कल्पना युदीनला होती का?
मोहीमेवर निघण्यापूर्वी विझाई इथे परतल्यावर आपल्या स्कीईंग संस्थेला तार करण्याचं ड्यॅटलॉव्हने ठरवलं होतं. त्याच्या अनुमानानुसार साधारण १२ फेब्रुवारीपर्यंत ते विझाईला परतले असते. अर्थात पर्वतावरील लहरी हवामानाचा विचार करता ही तारीख चार-पाच दिवसांनी पुढे जाण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. युदीन परत फिरण्यापूर्वी ड्यॅट्लॉव्हने ही शक्यता त्याच्यापाशी बोलून दाखवली होती.
२८ जानेवारीला सर्वजण ऑटोर्टेन पर्वताजवळ पोहोचले. ३१ जानेवारीला ते पर्वतावरील एका सखल पठारी जागेत पोहोचले. इथे पोहोचल्यावर त्यांनी पर्वतावरील कठीण चढाईच्या तयारीला सुरवात केली. पुढील वाट एका खिंडीतून जात होती. आपल्याजवळी जास्तीची सर्व सामग्री आणि परतीच्या वाटेवर लागणारे अन्नपदार्थ त्यांनी एका सुरक्षीत ठि़काणी लपवून ठेवले.
१ फ्रेब्रुवारीला खिंडीतील चढाई सुरु झाली. दिवसभराची चढाई करुन खिंड ओलांडून पलीकडे मुक्काम करायची त्यांची योजना होती, पण....
उरलमधील लहरी हवामान त्यांनी गृहीत धरलं नव्हतं!
हवामान झपाट्याने बिघडलं होतं. त्यातच वार्याचा जोर वाढू लागला. बर्फवृष्टीही सुरु झाली. एकूण दृष्यमानता खूपच कमी झाली..
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.