काळभैरव , भैरोबा...... म्हणजेच शिवाचा अवतार , विलयाची देवता , मोक्षदायी पुण्यक्षेत्र काशी चा रक्षक . अघोर पंथाची मुख्य देवता . आदिमाया जगत्जननी सतीच्या ५२ शक्तीपीठांची रक्षक देवता . तामस शक्तीवर याच आधिपत्य असत . वेताळ , धूम्राक्ष , कुष्मांड सारखे अनेक पिशाच्चान्वर याच नियंत्रण असत . तामसी साधक सर्व प्रथम भैरावला प्रसन्न करून घेतात ज्यामुळे त्यांना पुढच्या साधने पिशाच्चांकडून अडथळा येऊ नये . हनुमान , दत्ता सारखा आजही लोक भूत बाधा झाल्यावर भैरवाचा धावा करतात . त्याच काळभैरवाच एक मंदिर आहे गड-हिंगलाज जवळ . महाराष्ट्र - कर्नाटक च्या सीमेवर .गड-हिंगलाज पासून बहिरेवाडी गावला निघालो की ४ किमी आपल्या या पुराण कथेतल्या कालभैरवाच एक मंदीर लागत . हे पांडवकालीन मंदिर शेंदरी नावाच्या डोंगरावर वसल आहे . याला कालभैरावाचा डोंगर असेही म्हणतात .साधारण ३०० पायऱ्या चढून आपण मंदिरात पोहोचतो . अस म्हणतात की काळ भैरव ह्या गावची आणि त्या पंचक्रोशीची रक्षक देवता आहे . ती भूत -प्रेतांचा नाश करते . ह्या डोंगरावर राहून ती चारी बाजूला लक्ष ठेऊन असते .हिला केलेला नवस हमखास पूर्ण होतो . लोक हा नवस फेडायला गड - हिंग्लज पासून दंडवत घालत येतात . दर रविवारी ह्या देवळात खूप गर्दी असते . दर अमावास्येला अनेक भाविक भक्ती भावाने देवाला नारळ अर्पण करतात . पण काही गोष्टी अश्या असतात कि ज्याच गूढ कधीच उकळत नाही . विज्ञानाने कितीही झपाटा मारून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी नाही . अशीच एक गोष्ट या मंदिरा बाबत ..... दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ह्या काळ भैरवाच्या देवळात मोठी यात्रा भरते .पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरणपोळीचे जेवण जेवून गावकरी देवळापाशी जमतात . चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक मधून आलेल्या हजारो भाविकांकडून अक्षरशः हजारो बकर्यांची कत्तल केली जाते . ह्या बकऱ्याचा नैवैद्य भैरोबाला दाखवला जात नाही . देवळाच्या बाहेर असलेल्या एका विशिष्ठ जागी कापलेल्या हजारो बकर्यांची डोकी रचून ठेवली जातात . त्या रात्री देवळाच्या गुरवासकट सर्व मंडळी देवळात न थांबता पायऱ्या उतरून खाली मुक्काम करतात . त्यावेळी मंदिराच्या आसपास कोणीसुध्धा थाबत नाही. ह्या देवळाच्या आसपास घनदाट जंगल नाही . सकाळी जेव्हा पुन्हा सर्वजण देवळापाशी पोहोचतात त्यावेळेस अक्षरशः थप्पी लाऊन ठेवलेल्या बकऱ्याच्या मुन्डक्यांतील एक कण देखील शिल्लक नसतो . रक्ताचा एक थेंब देखील जमिनीवर पडत नाही . कुठलेही जंगली श्वापद एवढे अन्न एका रात्रीत खाऊ शकणार नाही . एवढी हजारो मुंडकी एका रात्रीतच फस्त होतात . ती कोण खात , कुठे गायब होतात हे आज पर्यंत कोणालाच कळाल नाही . एकदा ३ मित्रांनी या गोष्टीचाल उलगडा करायचं ठरव ... त्या चैत्र पौर्णिमेच्या रात्री हट्टाने मंदिराजवळ थाबले होते . त्या रात्रीच ते ३ घे गायब झाले . नंतर कधी दिसलेच नाही . ते पळून जाण्याची ही शक्यता नव्हती कारण तशी काही सोयच नाही . ह्या घटने नंतर परत कोणी त्याचा उलट छडा लवाचा प्रयत्न केला नाही. अस म्हणतात की तो बोकडाचा बळी वातावरणतल्या अतृप्त पिशाच्च शक्तींना दिला जातो . तो बोकडाच्या डोक्यान चा नैवैद्य त्या पिशाच्चन साठी ठेवला जातो . त्या सगळ्या पिशाच्चांना त्या रात्री हा बळी घ्यायची परवानगी असते . तो बळी मिळाला कि वातावरणातील अतृप्त पिशाच्च शक्ती शांत होतात . असे प्रकार फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी आढळतात . कोकणात पण असाच एक विधी अनेक गावात एका ठरावीक दिवशी केला जातो . हा विधी ' चालगती ' या नावाने ओळखला जातो .
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel