मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिरात श्रावण महिन्यांत भक्तांची मोठी गर्दी होते. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरुन पडले असावे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिरात श्रावण महिन्यांत भक्तांची मोठी गर्दी होते. राज्यातील विविध भागांतून या ठिकाणी असलेल्या स्वयंभू शिव लिंगाचे दर्शन घेण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी श्रावणात भक्तांची रिघ लागलेली होती. अशीच गर्दी श्रावणातील प्रत्येक सोमवारीही होत असल्याचे भाविकांनी सांगितले. शिवमंदिराचा इतिहास हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी उगम पावणा-या ‘वालधुनी’ नदीने उल्हासनगर व अंबरनाथ शहरांना विभागले आह़े याच नदीच्या तीरावर इसवीसन पूर्व शके ९८२ च्या दरम्यान शीलाहार राजा चित्तराजा यांनी हे शिवमंदिर बांधल़े या मंदिराची पुनर्बाधणी चित्तराजाचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्वाणीने शके १०६० मध्ये केली़ हे शिवमिंदर हेमांडपंथी पद्धतीने बांधलेले असून कोकण प्रांतात आढळणा-या काळ्या दगडांत ते कोरण्यात आले आह़े या मंदिराच्या बाह्य व आंतरभागांवर देवादिकांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर आकर्षक वाटत़े या शिवमंदिरातील गाभा-यांत स्वयंभू शिवलिंग आह़े या गाभा-यांत जाण्यासाठी २० पाय-या खाली उतरावे लागत़े या शिवलिंगाला ‘अंबरेश्वर’ म्हणूनही ओळखले जात़े याच मंदिराच्या नावावरून शहराला अंबरनाथ हे नाव पडले आह़े या मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरत़े महाशिवरात्रीच्या काळात दर्शनासाठी भल्या मोठय़ा रांगा लागतात़ ठाणे, रायगड, पुणे भागातून लाखो भाविक स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी गर्दी करतात़ ही जत्रा तीन दिवस चालत़े अख्यायिका पांडवांनी एक मोठा दगड कोरून एका रात्रीत हे मंदिर बांधले असल्याची अख्यायिका आहे. या मंदिर परिसरातील एका गुंफेतून मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर पांडव या ठिकाणाहून निघून गेले. हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर". शिल्प शास्त्रप्रमाणो अंबरनाथचे शिवमंदिर हे सप्तांग भूमीज पध्दतीत मोडते. या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. एकावर एक असे सात भूमी(शिल्प रांगा) रचण्यात आले होते. मात्र कालांतराने गाभा:यावरील शिखर नष्ट झाल्यामुळे तीनच भूमी (शिल्प रांगा) शिल्लक आहेत. नष्ट झालेल्या भूमीचे अवशेष मंदिराच्या परिसरात सापडतात. या मंदिराचा गाभारा 13 -13 फूट चौरस आहे. या मंदिराच्या बाहेरील शिल्पांवर देवतांचे शिल्प कोरण्यात आले आहे. या मंदिरावर गरुडासन विष्णू, त्रिपुरावध मुर्ती, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची शोडशवर्षीय (सोळा वर्षाची)पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, लिंडोद्मव मुर्ती, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, मरकडेय कथेची मुर्ती, गणोश नृत्य मुर्ती, नृसिंह अवताराची मुर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. मात्र त्यातील अनेक मुर्ती आज भग्ण अवस्थेत आहेत. काहींची झीज झाली आहेत. त्यांची देखरेख करण्याची गरज आहे. त्यांची योग्य निगा पुरातत्व खात्याने केल्यास हे मंदिर भावी पिडीसाठीही अभ्यासाचा विषय ठरेल. या मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारेआहेत. प्रमुख प्रवेशद्वाराशी असलेली नंदीची पाषाणमूर्ती प्रथमत: आपलं लक्ष वेधून घेते. या मंदिराचे सर्व शिल्पकाम जसे आखीव-रेखीव आहे तसेच ते उभारताना भूमितीसह वास्तुशास्त्राचा निश्चितच विचार केल्याचे जागोजागी जाणवते. हेमाडपंताच्या काळाआधीपासून जी ‘भूपिज’ शैलीची मंदिर उभारली गेली या शैलीतील हे पहिले मंदिर म्हणून गणले जाते. मंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून तिथपर्यंत जाण्यासाठी आठ फुटी खोलीच्या दगडी पायऱ्यांवरून जावे लागते. लोखंडी कठडा घालून त्याचे आगमन-निर्गमनासाठी दोन भाग करण्यात आले आहेत. येथील प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आहे. या गाभाऱ्याच्या चौफेर भिंती भक्कम असून त्याची उंची २१ मीटर आहे. गाभारा आणि मंदिराला जोडणारे जे दालन आहे. त्यातून आपण मंडपाकडे येतो याला दक्षिण पश्चिमोत्तर अशी तीन मजबूत प्रवेशद्वारे आहेत. मंडपावरील चार खांबावरील शिल्प-नक्षीकाम खूपच आकर्षक आहे, तर मंडपावरचे छतावरील नक्षीकाम देखणे आहे. लोनाड मंदिरातील छताप्रमाणेच अनेक वर्तुळांची गुंफण करून अप्रतिम शिल्पकलेतून सौंदर्य वाढवले आहे. मूळच्या सुमारे १८ खांबांच्या भव्य मंडपात प्रवेश केल्यावर सध्या त्यातील चारच खांब स्पष्टपणे दिसताहेत. उर्वरित खांबाचे अस्तित्व फारसे जाणवत नाही. वेरूळच्या विश्वविख्यात शिल्पाकृतीप्रमाणे जराही जागा न सोडता प्रत्येक खांब नक्षीकामांनी सुशोभित करून मंदिराचे सौंदर्य खुलवण्यात येथील अज्ञात कलाकार यशस्वी झालेत. सभामंडपाचे छत आणि कळसाचा भाग यामधील भाग पोकळ आहे. हा सभामंडप आणि गाभाऱ्याची बाह्य बाजू अनेक कोनांनी सुशोभित करताना भूमितीशास्त्राचा उपयोग केल्याचे जाणवते. त्यामुळेच मंदिरात दिवसभरात छाया -प्रकाशाचा खेळ अनुभवता येतो. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक देव-देवतांच्या शिल्पांचे दर्शन घडते. हजारो वर्षांची नैसर्गिक स्थित्यंतरे आणि मानवनिर्मित प्रदूषणांनी यातील काही शिल्पांचे अस्पष्ट दर्शन घडते. या शिवमंदिराला अनेक हत्तींच्या कोरीव कामाची पाश्र्वभूमी आहे. जणू काही अनेक हत्तींच्या पाठीवरच या मंदिराचा डोलारा आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपणासह बाह्य़ांगावरील अनोखी शिल्पाकृती आपलं लक्ष वेधून घेतात. यात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती, त्रिशूलधारी शिवमूर्ती, लक्ष्मीमाता यांचे दर्शन घडते. विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या कलाकृतीतून शिल्पकारांना मानवी जीवनाला आवश्यक असा संदेश द्यायचा आहे, असाच जणू त्यापाठीमागे गर्भित अर्थ आहे. हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आढळते. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ. स. १०६० चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशदारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत. मंडपाचे छत व कळस यामझे पोकळी आहे.कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे. मंदिराच्या उत्तरद्वारानजीक एक छोटेखानी कक्ष आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. हे बांधकाम मूळच्या मंदिरानंतरचे असावे. मंदिरासहीत साऱ्या परिसराचे दगडी बांधकाम असल्याने स्वच्छतेसह वातावरणात गारवाही आहे. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे. शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. त्यात उत्पत्ती, स्थिती, आणि लय या शिवाच्या तीनही भावांचे दर्शन घडविणारी त्रिमूर्ती आहे. तर एका शिल्पात शिवपार्वती विवाह सोहळ्याचे दर्शनही घडते. याशिवाय आरसाधारी तरुण स्त्री, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, महिशासूर मर्दिनी, गणपती यांच्या मूर्ती शिल्पकाराने रेखीवपणे निर्माण केल्या आहेत. या साऱ्या मूर्तीतून त्यांच्या सहजपणामुळे त्या सजीव वाटतात. आणि या मूर्तीशी संबंधित त्या काळची वस्त्र, आभूषणे आणि वेशभूषेचीही कल्पना येते. मंदिराच्या बाहेरील बाजूवर आपल्या दृष्टीक्षेपात येईल अशी एक पट्टी कोरलेली आहे. त्या लहानशा जागेतून अनेक शृंगारिक शिल्पाकृती आपल्या नजरेत भरतात. सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पाय-या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे. आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे. अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या प्रदेशावर शिलाहारांची राजसत्ता होती. त्याकाळी बांधले गेले. आपल्या प्रदीर्घ राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची शिवमंदिरं बांधली. त्यातील हे अंबरनाथचे एकमेव शिवमंदिर आजही आपलं असित्व टिकवून आहे. येथील असामान्य कलाकृतीच्या पाषाणमूर्तीतून त्यांचे भावप्रकट करताना त्यातून तत्त्वज्ञान-संदेश देण्याची किमया वाखाणण्यासारखी आहे. या शिल्पातून मानवी जीवनाला पूरक असा जो संदेश दिला आहे. त्यातून भारतभूमीचे तत्त्वज्ञान आणि संस्कृती सांगण्याचाच जणू प्रयत्न आहे.. कोणतीही लिखित भाषा तथा शब्दाविना हे मंदिरशिल्प खूप काही सांगून जाते. अंबरनाथच्या या प्राचिन शिवमंदिराचा समावेश युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडानी कोरलेलं असून, मंदिराची जमिन ही वाघाच्या कातडीपासून कोरलेलं आहे. अंबरनाथ हा तालुका शिवमंदिरामुळे प्रसिध्द झाला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel