अहमदाबादहून ४५० कि. मी.वर वेरावल. तेथून ५ कि. मी. वर सोमनाथ आहे. याच रस्त्याने पुढे जाताना प्रभासपट्टनम्‌ हे गाव लागते. त्याठिकाणी श्रीकृष्णानी प्राणत्याग केला होता. हे ठिकाण सरस्वती नदीच्या काठावर आहे. द्वादश ज्योतिर्लिंग स्थान जगप्रसिद्ध सोमनाथाचे मंदिर या ठिकाणीच आहे. मूळ मंदिराच्या जवळच सरदार पटेल यांनी नवीन मंदिर बांधलेले आहे. जवळच असलेल्या एका तळघरामध्ये मूळ लिंग जतन करून ठेवले आहे. मूळ मंदिर १६ वेळा आक्रमणात नष्ट केले गेले आणि पुन्हा बांधले गेले. सोमनाथ येथील शिव मंदिर एक महत्वपूर्ण मंदिर असून १२ ज्योतिर्लिंगा पैकी १ महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे . सोमनाथ म्हणजे, चंद्र देवाचा रक्षणकर्ता. हे भगवान शिव चे मुख्य निवास स्थान मानले जाते. गुजरात राज्यातील सौराष्ट्र जिल्ह्यातील वेरावळ बंदर या ठिकाणी स्थापित असून या मंदिराचा इतिहास असा सांगतो कि, हे मंदिर चंद्र देवाने स्थापन केले आहे. याचा उल्लेख ऋग्वेद मध्ये केला आहे. सर्व ज्योतिर्लिंगातून सोमनाथ येथील मंदिराचे महत्वपूर्ण स्थान आहे. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा : १. सोमनाथ (गुजराथ - वेरावळ) २. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य) ३. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन) ४. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर) ५.वैजनाथ (महाराष्ट्र - परळी) ६. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर) ७. रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर) ८. नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ) ९. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी) १०. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर) ११. केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) १२. घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद) जुनागढ संस्थान खालसा करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आदेश दिला. १२ नोव्हेंबर १९४७ रोजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते जीर्णोद्धार संपन्न झाला. ’ सोमनाथ’ हे पहिले ज्योतिर्लिंग. गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रांतात प्रभास पाटण येथे हे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे.सौराष्ट्र या नववरुन त्यास सोरटी सोमनाथ हे नाव मिळाले. एके काळी भारतातील सर्वांत मोठे, अत्यंत पवित्र व फ़ार श्रीमंत देवस्थान अशी याची प्रसिध्दी होती. सोमवती अमावस्या व ग्रहण या वेळी येथे मोठी यात्रा भरते. सोमनाथ लिंग कसे निर्माण झाले याविषयी कथा... फ़ार प्राचीन काळी दक्ष नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला सत्तावीस मुली होत्या.त्या सर्व मुलींचे चंद्राशी लग्न झाले.त्या सत्तावीस जणीत जी रोहीणी होती ती चंद्राला फ़ार आवडत असे.ती त्याची लाडकी होती.चंद्र फ़क्त रोहीणीवरच प्रेम करीत असे. यामुळे इतर बायका दुःखी झाल्या.चंद्र त्यांच्याशी बोलतसुध्दा नसे.दक्ष राजाला हे समजले. तो दुःखी झाला.तो चंद्राला म्हणाला ,"चंद्रा, तू थोर कुळात जन्मास आला आहेस. तेव्हा तू तुझ्या सर्व बायकांवर सारखेच प्रेम कर." दक्ष राजाने असे सांगितले खरे,पण चंद्राने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही.तो आपला फ़क्त रोहीणीवरच प्रेम करु लागला.आपल्या उपदेशाचा काहीच उपयोग झाला नाही हे पाहून दक्षाला चंद्राचा राग आला.त्याने चंद्राला शाप दिला, " तू माझे ऎकले नाहीस म्हणून तुला क्षय होईल." दक्षाने शाप देताच चंद्राला क्षयरोग झाला. त्याचे तेज हळूहळू कमी होऊ लागले. सगळे देव घाबरले. आता यावर उपाय काय करायचा हे विचारण्यासाठी सर्वजण ब्रम्हदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले," समुद्रकाठी शंकराची आराधना करा. तेथे शिवलिंगाची स्थापना करा, म्हणजे शंकर प्रसन्न होईल व चंद्राचा रोग जाईल." सर्व देवांना खूप दिवस तप केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. चंद्राचा क्षयरोग गेला.त्याला त्याचे तेज मिळाले. जेथे चंद्राने शिवलिंग स्थापन केले होते तेथे त्याने मंदिर बांधण्याचे ठरविले. ब्रम्हदेवाने त्याला मदत केली. चंद्राने स्थापन केलेल्या ठिकाणी ब्रम्हदेवाने जमीन उकरली. तेथे एक स्वयंभू शिवलिंग दिसले. ते मध व दर्भ यांनी झाकलेले होते. ब्रम्हदेवाने त्यावर एक शिला बसविली व त्यावर एक मोठे शिवलिंग बसविले. चंद्राने त्याची पूजा केली. हेच सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमाचा म्हणजे चंद्राचा क्षयरोग ज्याने नाहीसा केला ते शिवलिंग म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंग. श्री सोमनाथाचे हे देवस्थान भारतातील अत्यंत संपन्न आणि वैभवशाली असल्याने मुसलमान राज्यकर्त्यांनी अनेक वेळा स्वा-या केल्या अन् देवस्थानाची लूट तसेच नासधूस केली. मुसलमानी आक्रमणांमध्ये अनेकदा श्री सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांपैकी बहुतेक आक्रमणे गझनीच्या महंमदाच्या इ.स. १२९८ मधील आक्रमणापर्यंतच्या कालखंडातील आहेत. तेथील अगणित संपत्ती शत्रूने लुटली होती. शत्रूने अनेकदा स्वा-यी करून उद्ध्वस्त केलेले हे मंदिर नंतर बांधण्यात आले. इ.स. ७२२ मध्ये सिंधचा सुभेदार जुनायर याने आक्रमण करून येथील संपत्ती लुटली. इ.स. १०२५ मध्ये चुंबकाच्या चमत्कृतीपूर्ण कौशल्यामुळे अधांतरी असलेली श्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महंमदाने फोडून मूर्तीचा विध्वंस करून सुमारे १८ कोटींची लूट केली. इ.स. १२९७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने अलाफखानकरवी या देवस्थानाचा विध्वंस केला. इ.स. १३९० मध्ये मुजफरशहा याने, इ.स. १४७९ मध्ये महंमद बेगडा याने, इ.स. १५०३ मध्ये दुसरा मुजफफरशहा याने आणि नंतर धर्मवेड्या औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये सर्वत्र नासधूस करून अनेकांची कत्तल केली आणि अलोट संपत्ती लुटून नेली. १९ व्या शतकात झालेल्या भयानक भूकंपामुळेही मंदिराची अतोनात हानी झाली. जरी धर्मद्रोह्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, तरी भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता नष्ट झाली नाही. मुसलमान देशद्रोह्यांनी केलेल्या विध्वंसामुळे ज्योतिर्लिंगाचे अतोनात नुकसान झाले होते. इ.स. १७८३ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी श्री सोमनाथाचे नवीन मंदिर बांधले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel