चक्र :-मेरुरज्ज मध्ये प्राणाच्या प्रवाहासाठी सूक्ष्म नाडी आहे जिला सुषुम्ना म्हणतात. हिच्यात अनेक केंद्रे आहेत. जिला चक्र किंवा पद्म म्हटले जाते. अशा कित्येक नद्यांचे एकाच ठिकाणी मिलानामुळे चक्र किंवा केंद्राचे निर्माण होते. कुंडलिनी जेव्हा चक्र भेदून जाते तेव्हा त्या शक्तीचा संचार वाढतो. मानल कि कमाल पुष्प प्रफ्फुलित झाले तर चक्राची ती गुप्त शक्ती प्रकट होते.
याचे फायदे :- कुंडलिनी योग क्रिया हि अशी योग क्रिया आहे. ज्यात व्यक्ती आपल्यात लपलेली कुंडलिनी शक्ती जागृत करून दिव्यशक्तीला प्राप्त करू शकते. कुंडलिनी बरोबर ७ चक्रांचे जागृती झाली तर मानवाला शांती आणि सिद्धीचे ज्ञान होते.तो भूत आणि भविष्य पाहू शकतो. ती शरीरातून बाहेर पडून कोठेही फिरू शकते. तो आपल्या सकारात्मक शक्तीद्वारे कोणतेही दुख वेदना लांब पळवण्याची क्षमता येते. सिद्धीची कोणतीच सीमा नसते.
कुंडलिनी जागृतीचे नियम :-
१. सगळ्यात पहिले स्वताला शुद्ध आणि पवित्र करा. शुद्धता आणि पवित्रता हि आहार आणि व्यवहाराने येते. आहार अर्थातच सात्विक आणि सुपाच्चाय भोजन तसेच उपवास आणि व्यवहार अर्थात आपल्या आचरण शुद्ध ठेवत सत्य बोलणे आणि सगळ्यांशी विनम्रतापूर्वक वागणे.
२. स्वताच्या दिनचर्येत सुधारणा करत लवकर उठणे आणि लवकर झोपणे. सकाळी आणि संध्याकाळी संध्यावंदन करत नियमितपणे प्राणायाम, ध्यान आणि धारणा याचा अभ्यास करणे.
३. कुंडलिनी जागृतीसाठी कुंडलिनी प्राणायाम अत्यंत प्रभावशाली सिद्ध होते. आपल्या मन आणि बुद्धीला नियंत्रित ठेवत कुंडलिनी योगाचा नियमित अभ्यास केला तर ६ ते १२ महिन्यात कुंडलिनी जागृत होण्यास सुरुवात होते. पण हे सगळे योग्य गुरूच्या सानिध्यातच होऊ शकते.
४. सयंम आणि नियम जर पाळले आणि नियमित ध्यान केले तर हळू-हळू कुंडलिनी जागृत होतात आणि जेव्हा ते जागर्त होते तर ती व्यक्ती पहिल्यासारखी नाही राहत. ती एक दिव्यपुरुष होते.
कुंडलिनी एक दिव्यशक्ती आहे. जी सापाप्रमाणे साडेतीन फेरे घेऊन शरीराच्या खालच्या भागात मूलाधार चाक्र्वर स्थिर होते. जो पर्यंत ती अशाच पद्धतीने खाली असते तोपर्यंत ती व्यक्ती संसारीक विषयांच्या मागे पाळतो. पण जेव्हा ती जागृत होते तेव्हा असे वाटते कि काहीतरी सर्पाकृती तरंग जी फिरत फिरत वर येत आहे. हा मोठा दिव्य अनुभव आहे.
आपल्या शरीरात ७ चक्र आहेत. कुंडलिनीचे एक टोक मूलाधार चक्रवर आणि दुसरे टोक मणक्याच्या हाडाभोवती गुंडाळलेला असतो जेव्हा वर येण्यासाठी तो गती घेतो. तेव्हा त्याचा उद्देश सातव्या चक्राकडे म्हणजे सहस्रार चक्रापर्यंत पोहचण्याचा असतो,पण त्या व्यक्ती ने ध्यान आणि संयम जर सोडून दिला तर ते मध्ये येणाऱ्या कोणत्याही चक्रावर थांबते.
जेव्हा कुंडलिनी जागृत होऊ लागते तर पहिले व्यक्तीला मूलाधार चक्रात स्पंदनाचा अनुभव होतो. आणि ती कुंडलिनी जोरात वर जाते आणि कोणत्याही एका चक्रावर जाऊन थांबते. त्यानंतर परत जोरात वर जाते. ती ज्या चक्रावर जाऊन थामाबते त्या चक्रातील आणि त्याच्या खालच्या चक्रातील नकारात्मक उर्जेचा कायमचा नायनाट करते आणि चक्राला स्वस्थ आणि स्वच्छ करते.
कुंडलिनीच्या जागृतीनंतर त्या व्यक्तीचा संसारिक विषयांमध्ये रस राहत नाही. आणि त्याची ओढ आध्यात्म आणि रहस्य यांच्याकडे होते. कुनाडली जागृतीने मानसिक आणि शारीरिक उर्जा वाढली जाते. आणि ती व्यक्ती स्वत: मध्ये शक्ती आणि सिद्धीचा अनुभव करते.
कुंडलिनी जागृतीचे प्रारंभिक अनुभव :- जेव्हा कुंडलिनी जागृत होऊ लागते तेव्हा ती व्यक्तीला देवी देवतांचे दर्शन होते. ॐ या हूं हूं ची गर्जना ऐकू येते. डोळ्यांसमोर पहीले काळा मग पिवळा आणि शेवटी निळा रंग दिसू लागतो.
त्यला स्वताचे शरीर हें भरलेल्या फुग्यासारखे हलके वाटू लागते.तो चींदू सारख एकाच जागेवर वर-खाली होऊ लागतो. त्याच्या गळ्याचा भाग उंच उचलल्या सारखा वाटतो. त्याला शेंडी बांधायच्या जागेवर अर्थात सहस्रार चक्रावर मुंग्या चालल्यासारखे वाटते आणि असे वाटते कि अस काही आहे जे वर जाऊ पहते आहे. मानाक्यामध्ये कंपने जाणवू लागतात. अशा प्रकारचे प्रारंभिक अनुभव असतात.
अजून माहिती हवी असल्यास
" प्राणायम रहस्य " स्वामी रामदेव यांचे पुस्तक वाचावे.............
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.