मी तन्वी रेडी , तालुका सावंतवाडी , जिल्हा सिंधुदुर्ग . हे माझ्या आईच माहेर . आजची हि कथा तिथलीच. रेडीचा गणपती तिथलं निसर्ग सौंदर्ययामुळे हे गाव प्रसिद्धच आहे. माउली हे रेडी या गावच ग्राम दैवत . हे दैवत अत्यंत जागृत आहे अशी गावकर्यांची खूप श्रद्धा आहे . नुसती श्रद्धा नाही तर अनुभव देखील .देवीच्या आवारात जागरण , गोंधळ , भजन हे नित्याचेच असतात .कौल लावणे या सारखे प्रकारही इथे होतात . आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती याच देवीची ... हा किस्सा कधी घडल हे मला नक्की नाही आठवत . गावातले लोकांना विचारव तर सगळे सांगतात खूप जुना किस्सा आहे . ३० वर्ष पूर्वीचा तरी असावा असा माझा अंदाज आहे .तीच आज या पेज वर तुमच्या सोबत शेअर करतेय . किस्सा खूप रोमांचक आणि खिळवून ठेवणारा आहे. थोड डिटेल मध्येच सांगते. चला ........कोकणात बहुतेक गावी चळ (चाळा) नावाचा एक प्रकार आहे . हा चळ (चाळा) जेव्हा असतो तेव्हा गावच्या पिशाच्चना भोग देऊन तृप्त केले जाते. फारपुर्वी पासून हि प्रथा चालू आहे . हा चळ (चाळा) घाटातून येतो अस म्हणतात . भात कापायच्या आधी हा चळ (चाळा) होतो अस ऐकून आहे . चळ (चाळा) असतो त्या रात्री रेड्याच्या रक्तात भात कालवला जातो . गावातील काही विशिष्ट लोक तो भात फेकत गावाच्या वेशीपर्यंत धावत जातात . धावताना ते काही विशिष्ट वाद्य वाजवत धावतात. चळ असेल त्या रात्री गावातील सगळे लोक लवकर झोपून जातात. घरतील कचरा बाहेर काढून ठेवतात . त्या रात्री बाहेरून गावात कोणाला येऊ देत नाही . रात्री चळ (चाळा) सुरु असताना कोणी बाहेर फिरत असेल तर त्याला हमखास पिशाच्च दिसतो . बहुतेकांना त्यांना बघितल्यावर वेड लागले आहे किंवा काही गतप्राण झाले आहेत असे अनेक किस्से आहेत . रक्तात कालवलेला भात हा त्या पिशाचांचा नैवेद्य . हा भात फेकताना कोणी मागे बघत नाही . भात हवेत फेकला जातो . हा भात खाली न पडता हवेतच पिशाच्च ग्रहण करतात . तो भात घेऊन धावणाऱ्या मागे ती पिशाच्च लागलेली असतात . गावच्या वेशी वर आल्यावर एका विशिष्ट ठिकाणी हा चळ (चाळा) थांबवतात . हा प्रकार केल्यावर पिशाच्च आपल्याला वर्षभर त्रास देत नाही असा गावकर्यांचा विश्वास आहे . त्या रात्री हि असाच चळ (चाळा) येणार होता .चळ (चाळा) हा मध्यरात्री संपन्न होतो .त्या रात्री या माउली मातेच्या मंदिरात भजन , कीर्तन चालू होत . भजनात सर्व रंगून गेले होते .भजन शांतपणे सुरु होत .अचानक मंदिरात असलेल्या लोकांना लांबून वाद्यांचा, शिंगांचा आवाज येऊ लागला ... गुबुगुबु , गुबुगुबु .... गुबुगुबु ....हा आवाज ऐकल्यावर सर्व लोकांची धांदल उडाली .गावातल्या सगळ्या लोकांची धावपळ सुरु झाली .जो तो आपल्या घराच्या दिशेने धूम ठोकत पळत सुटला . ज्यांची घरे जिथून चळ (चाळा) येतो. त्या दिशेला होती ते लोक जमेल त्यांच्या घराचा आश्रय घेऊ लागले .त्या वाद्यांच्या आवाजाने नुसती जीवांची धांदल उडाली . लोक सैर वैर जीव मुठीत धरून धावत सुटली . सगळे जमेल तिथे , जमेल त्या घरात सकाळ पर्यंत मुक्कामाला राहिले . अश्याच एका घरातून रडण्याचा जोर जोरात आवाज येऊ लागला माझी मुलगी राहिली..... ....माझी मुलगी राहिली तिथेच .....त्या आईची मुलगी या गोंधळात रस्त्यातच कुठेतरी हरवली होती. ती कोणाकडे सुखरूप आहे कि नाही हेच कळात नव्हते. गावातली लोक त्या बाई खूप समजून सांगत होती , कि कोणीतरी तिला बरोबर घेतल असेल . असेल ती सुखरूप .पण त्या भयाण रात्री जे न व्हायचं ते झाल .ते लेकरू उघड्या रस्त्यावर रडत पडून होत. या धावपळीत कोणाच तरी एक लहान मुल राहील आहे हे कोणाच्या लक्षातही नाही आल .गुबूगुबू , गुबूगुबू गुबुगुबु .... तो चळ (चाळा) आता समोरच होता . ते भातच पातेलं आणि भात उडवत लोक चालली होती . त्यात एकही थांबण शक्य नव्हत . थांबल तर मौतच . आणि चळ (चाळा) वेशीपर्यंत नाही पोहोचल तर परत वर्षभर गावात पिशाचांचा उपद्रव .त्या लोकांमागून भरपूर पोशाच्च धावत येत होती . त्या वाद्याचा आवाज आला कि झाड , विहीर , पडका वाद , जंगले , शेत , चौक , जोड -रस्ता . जिथे असतील तिकडची भूत तो भात झडप घालून ग्रहण करत होती .चला त्या रात्री सुखरूप पार पडला . पण ती लहान मुलगी त्या रात्री अचानक गायब झाली. सकाळी चार वाजल्यापासून लोकांनी तिचा शोध घ्यायला चालू केला. गावातला प्रत्येक रस्ता, पायवाट, आडवट, शेत, जंगल सगळ पिंजून काडल तरी त्या मुलीचा काही पत्ता लागला नाही. पिशाच्चानी त्या लहानीला उचलून नेलं आहे असा सर्वांचा समज झाला. अख्खं गाव शोकात बुडाल. तेवढ्यात कोणीतरी बातमी दिली कि ती लहानी माउलीच्या मंदिरात सुखरूप आहे. सगळे गावकरी मंदिराजवळ गेले. मंदिरात ती लहानी शांतपणे झोपली होती. त्या मुलीच्या आई ने घाईघाईतच तिला उचलून घेतल आणि तिचे पटापट मुके घेऊ लागली. ती एवडी अनावर झाली कि रात्री काय झालं हे विचारण्याच भानच तिला राहिलं नाही. शेवटी कोणीतरी त्या लहानीला रात्री काय झालं ते विचारलं तेव्हा तिने काय घडलं हे सांगायला सुरवात केली. ती म्हणाली,"काल रात्री मी एकटीच रस्त्यावर रडत होते. अचानक मला गुब गुबू असा आवाज ऐकायला आला. तेव्हा झाडावरून, बाजूच्या विहिरीतून भूत बाहेर आली आणि त्या ढोल मागे जात होती. इतक्यात एका भुताने माझाकडे बघितलं. तो मला पकडायला धावत येऊ लागला तेवढ्यात तेथे एक हिरवी साडी नेसलेली बाई अचानक समोर आली आणि तिने मला उचलून घेतलं. मला पदरात लपवलं. त्या बाईला बघून ती भूत लांब पळून गेली. ती बाई मला मंदिरात घेऊन आली. मी रात्रभर तिचा सोबतच होते. तिने मला झोपवलं. सकाळी उठून पहिलं तर ती बाई नव्हती." त्या मुलीला वाचवणारी ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात रेडी गावची ग्रामदैवत देवी माउलीच होती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel