कर्नल सी के हॉवर्ड हिमालयावर सर करायला गेले होते . २१ हजार फुटाच्या उंचीवर त्यांना महाकाय पावलांचे ठसे आढळले . त्यांच्यासोबत असलेले पोर्टर्स त्यांना म्हणाले " हे पावले मेंचकांगमी ची आहेत. " त्यानंतर कर्नल ने त्या मेंचकांगमी चा भरपूर शोध घेतला . पण तो प्राणी त्यांना काही केल्या भेटला नाही . हा मेंचकांगमी म्हणजे दुसरा कोणी नसून येटीच............ हिममानव.... अशा प्रकारे हिममानवाच्या अस्तित्वाची निशाणी प्रथमच जगासमोर आली . या हिममानवाला हिमालयात अनेक नाव आहेत . बँग , बँगा याक्री , बन ह्वानस , ह्वोन मानस ,,,,,,, भूतान मध्ये त्याला येटी म्हणतात . १९६६ साली भूतान सरकार ने येटी च्या स्मरणार्थ पोस्त स्टेम्प सुद्धा काढला आहे . भुतान चा तर हा राष्ट्रीय प्राणी आहे . हिमालय तसेच रशियन कौकेशास , मंगोलिया , तिबेट , चीन , ब्रिटीश कोलंबिया , केलिफोर्निया ह्या प्रदेशात देखील याचा मागमूस आहे . रशियन इतिहासकार प्रो . बोरिस पोर्शेनेव्ह आणि मान्गोलीयाचे प्रो. जे . आर . रीन्चेन यांनी या येटी चा शोध घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत . प्रो . बोरिस पोर्शेनेव्ह यांची शिष्य प्रो.. जीन कोफ मन हिने तर काफेशस पर्वत रांगेमध्ये ह्या हिम मानवाचा आज अनेक वर्षे शोध चालू ठेवला आहे . आज पर्यंत त्यांनी अनेक पुरावे गोळा केले आहेत . तिथल्या काही माल्यान्मधून आणि बगिच्यान्मधून ह्या हिम मानवाने चोरलेले - पळवलेले फळफळावळ, ह्या बाईच्या पथकाला उंच उंच अशा गवतामध्ये लपवून ठेवलेले आढळून आले . त्यांच्या निष्कर्षानुसार ' हे हिममानव एकांत प्रिय असतात , आपल्याला कुणी बघू नये म्हणून अंधाराचा फायदा घेऊन ते विहार करतात . केनडाच्या जंगलामध्येही अशा प्रकारचे पुरावे काही संशोधकाच्या हाती आलेले आहेत . केनडामध्ये त्याला sasruatch तर अमेरिकेत त्याला biefoot म्हणून ओळखतात . गोबी वाळवंटात आणि मंगोलियात प्रो . बोरिस पोर्शेनेव्ह यांना इतिहासपूर्व काळातील जनावरांसारख्या आलमास नावाचा प्राणी पळताना आढळलेला होता . अर्धवट माणूस अर्धवट जनावर असा काहीसा तो प्राणी होता . येटी च्या तीन जाती असाव्यात असा तर्क आहे . १) मोठा थोरला येटी - हा प्राणी भूक लागली नसेल तेव्हा शाकाहारीच असतो . २) दुसरा हा त्याच्यापेक्षा लहान . पण हा प्राणी हल्लेखोर प्रवृतीचा असतो . ३) रक्शीबोम्पो - हा सर्वात लहान पण खूप खट्याळ . हा शेतातील पिकांवर हल्ला करतो . माणसाची चाहूल लागल्यावर धूम ठोकतो . यालाच हिम मानव म्हणतात . प्रत्यक्ष दर्शी असे सांगतात की हि मानव वानारासारखा आणि दोन पायाचा आहे . त्याच्या अंगावर काळ्या करड्या पिंगट - ताम्ब्रात अशा रंगाचे अगदी भरपूर केस असतात . परंतु त्याला शेपटी मात्र नाही . त्याचा चेहरा मात्र केस रहित असतो . चिंचोळे डोळे . त्याच्या जवळून जाताना त्याच्या अंगाचा घाणेरडा असा वास येतो . ह्याच्या पावलांचे सुस्पष्ट असे फोटो एरिक शिफ्तार्ण यांनी १९५१ सालीच घेतलेले आहे . बावीस हजार फुटाच्या उंचावर हिमालयात मेंग्लुग ग्लेसियार्मध्ये हे पावलांचे ठसे आढळून आले .. त्याचे मोजमाप केले तेव्हा ते माप १२ X ६ इंच एवढे मोठे भरले . १९२५ साली ए. एम तोम्बासी यांनी सिक्कीम मध्ये एक येटी पहिला होता अशी नोंद आहे . नेपाळच्या दक्षिणेला अन्नपूर्णा या हिम शिखरावर चढाई करायला गेलेल्या एका पथकाने उपप्रमुख डॉन ह्विकंस यांनी एका पाऊलवाटेचे बरेच फोटो घेतले . प्रश्न असा होतो कि हिमालयाच्या त्या एवढ्या उंचीवर तसली पायवात आलीच कशी ?? ते स्वतः आणि दग्लन हेस्टन असे दोघे तेथे जाईपर्यंत दुसरा कुणीही तेथे गेलेला नव्हता . मग ही पाउलवाट तयार तशी कशी झाली ? त्यांनी दुर्बीण लाऊन पाहिले तेव्हा त्यांना दोन पायांचा एक काळसर प्राणी धूम ठोकताना दिसून आला .आर्ध्या तासाने तो प्राणी त्या तिथल्या झाडीमध्ये दिसेनासा झाला होता . या स्थानाला नेपाळमध्ये प्लेस ऑफ ग्रेट एप असे म्हणतात . शोध दैवी शक्तींचा - In The Search of God's photo.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel