नं.1. घरातील कोणी तरी एकच व्यक्ती ठरवा जी 21 दिवसात गरज असेल तेव्हाच बाहेर जाईल.
नं.2 प्रत्येक वेळी बाहेर जाण्यासाठी फुल हाताचा एकच ड्रेस वापरने. आल्यानंतर तो घुवुन सूकवणे .बाकीच्या कपड्यात मिक्स करू नये.
नं. 3 बाहेर जाण्यासाठी एकच पर्स वापरणे. त्यामधीलच नोटा, काॅईन्स आणि कार्ड्स वापरावे. हे सर्व दुसर्या पर्स मध्ये मिक्स करू नये.
नं.4 . शाॅपिंग बॅग पण प्रत्येक वेळी एकच वापरावी.
नं.5 . शक्यतो पाई चालत जावे. कार किंवा बाईकची आवश्यकता असेल तर एकच वाहन 21 दिवस वापरावे. कार, बाईक किंवा सायकल. ऑटो, बस , ट्रेन शक्यतो टाळावे.
नं.6 . सारखे बाहेर जाऊ नये. एकदाच सर्व काही घेऊन येणे.
नं.7 असेल त्याठिकाणी खरेदी करणे टाळा . खरेदी करताना योग्य अंतर ठेवा .
नं.8 मोबाईल शक्यतो नेऊ नये. नेलाच तर आल्यावर सॅनिटायझर ने पुसुन घ्यावा. तसेच आपले हात पाय चेहरा स्वच्छ धुवुन कपडे लगेच बदलावे. हे कपडे स्वतंत्र धुवावे. दुसर्या कपड्यात मिक्स करू नये. बाहेर जाण्यासाठी वापरलेले कपडे, शाॅपिंग बॅग, पर्स, गाडीची चावी एका बॅग मध्ये ठेवणे.
नं.9, जिन्याचा वापर करताना आपले हात आजूबाजूला लावू नका . तुमच्या आधी कोणी तरी त्याठिकाणी हात लावलेले असतील .
नं.10 आपल्या सोसायटीतील सर्वांचे कोरोना पासून संरक्षण आपल्या सर्वानाच करायचे आहे .त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणे टाळा .
नं.11. आपल्या घरातील लहान मुले आजारी व्यक्ती व 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्या .
हा मेसेज सर्व सोसायटी च्या ग्रुप मध्ये पाठवा .कदाचित नागरिक जागरूक होतील
लक्षात ठेवा आपण कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी , आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी, सोसायटीसाठी आणि आपल्या देशासाठी एवढे तर करुच शकतो ना? काळजी घ्या.