नाही तर का?
एखादा व्हायरस स्वतःच्या हाताने तयार करून जैविक हत्यार बनवण्याइतक तंत्रज्ञान अजून विकसित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, २००३ ला आलेला SARS आणि २००८ ला आलेला MERS हे दोघेही कोरोनाच्याचमुळे आले होते. आता आलेला Covid-19 हा पण कोरोनाचा एक प्रकार आहे. ज्याप्रमाणे माणसांमध्ये वर्ण असतात त्याप्रमाणे व्हायरस मध्ये सुद्धा स्ट्रेन असतात. याला आधी n-Cov 2019 म्हणलं जात होत म्हणजेच कोरोनाचाच २०१९ साली सापडलेला नवा स्ट्रेन.
आहे तर का?
यावर लिहिताना सापडलेली एक माहिती, JNU मध्ये असणारे जेनेटिक इंजिनीरिंगचे प्रोफेसर आनंद रंगनाथन यांनी ३१/०१/ २०२० रोजी केलेली ट्वीट. त्या ट्विटमध्ये त्यांनी अस सांगितलं होत कि, कोरोना व्हायरसमध्ये सापडलेले चार प्रोटीन हे HIV/AIDS मधून Insert केलेले आहेत. Insertion हा देखील एका Mutation चाच प्रकार आहे. HIV आणि कोरोना यांची रचना पाहिली तर खूप प्रमाणत सारखीच दिसते. आणि ज्या रुग्णांमध्ये सुधारणा झाली त्यांना HIV च औषध आणि फ्लू च औषध एकत्र बर केल्याचं थायलंड येथील वैज्ञानिकानीं सांगितलं होत. चार प्रोटीन सारखे असल्याची माहिती हि Bioinformatics च्या मदतीने कळते. व्हायरसच वर्गीकरण करताना HIV हा Retrovirus मध्ये येतो तर कोरोना Rhabdovirus येतो. मग वर्गीकरणात वेगळे असलेले व्हायरस सारखेच प्रोटीन बनवतात ते पण एक सोडून चार. त्यात मुख्य म्हणजे दोघांचेही जेनेटिक मटेरियल RNA च आहे.
यात दुसरी आणि लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे १ डिसेंबरला पहिला कोरोना रुग्ण चीनमध्ये आढळला आणि व्हायरस आल्याची बातमी संपूर्ण जगाला १७ जानेवारीच्या दिवशी कळली. याच ४७ दिवसात चीनने स्वतःसोबत जवळपास ६ देशात संक्रमण पोहोचवले होते. आता फक्त सहाच देश उरले असतील जेथे कोरोना पसरला नाही.
आणि जवळपास सर्वांचेच म्हणणे असे आहे कि, कोरोना एक जैविक हत्यार आहे.