पाणी गळ्यापर्यंत आले आहे..

का घराबाहेर पडू नये, याचे सुंदर विश्लेषण.

आपल्यामुळे घरातल्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.

बरेच दिवस झाले कोरोनाच्या बातम्या, विनोद वाचतोय. सध्या इटलीमध्ये एका दिवसाला 800 लोक मरत आहेत. संपूर्ण देश lockdown अवस्थेत आहे. प्रेतावर अंत्यविधी करण्यासाठी मिलिटरी बोलवावी लागत आहे. आपला मुलगा मुलगी पत्नी पती आई वडील कुठे अ‍ॅडमिट आहेत? ते जिवंत आहेत की मेले? हे सुध्दा कळू नये इतकी अनागोंदी आहे तिथे. आपण इटलीच्या फक्त 15-20 दिवस मागे आहोत आणि आपला आलेख पाहता त्याच, कदाचित त्यापेक्षा गंभीर दिशेने वाटचाल करत आहोत. इटलीमध्ये 25 फेब्रुवारीला आपल्या इतक्या म्हणजे 300 positive केसेस सापडल्या होत्या,त्या 21 मार्च पर्यंत 54,000 इतक्या झाल्या.   इटलीची लोकसंख्या आपल्यापेक्षा 20 पट कमी आहे. त्यांची आरोग्यसुविधा आपल्यापेक्षा सक्षम आहे, लोकसंख्येच्या मानाने आपल्यापेक्षा जास्त डॉक्टर्स, दवाखाने आहेत त्यांच्याकडे. त्यांचे सोशल interaction आपल्यापेक्षा कमीच असते. मग विचार करा, आपण सध्या जो हलगर्जीपणा दाखवतोय त्यामुळे भारतात किती भीषण परिस्थिती होऊ शकते..?

कोरोना एवढा घातक ठरण्याचे कारण काय?

1. Modus Operandi: या विषाणूची कार्यपद्धती इतरांपेक्षा खूप जास्त संसर्गजन्य आहे. (उदा. मास्क वापरला तरी डोळ्यातून देखील संसर्ग होतो. कित्येक पृष्ठभागावर, जिन्याचे रेलिंग, दाराची कडी, लिफ्ट बटन सारख्या नेहमीच्या वापराच्या जागांवर हा विषाणू 48 ते 72 तासापर्यंत (तब्बल 2-3 दिवस) जिवंत राहतो.)

2. Incubation period: लागण झाल्यानंतर काहीजणांना 7 ते 14 दिवसापर्यंत लक्षणे दिसत नाहीत. तोपर्यंत लागण झालेल्या व्यक्तीने अनेकांना संसर्ग दिलेला असतो. (प्रत्यक्षात 60 रोगी positive निघत असतिल तर त्यांना या विषाणूची लागण 14 दिवस आधी झाली असते. त्यामुळे आपण स्टेज 2 मध्ये आहोत असे वाटत असताना आपण प्रत्यक्षात स्टेज 3 मध्ये असतो. म्हणजे किमान 50-100 पट जास्त जणांना लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही या 14 दिवसांमध्ये. म्हणजे हा विषाणू आपल्या शहरामध्ये/गावामध्ये पोहोचला आहे, अस समजून सावध राहणे जास्त योग्य आहे. इटली, इराण, स्पेन यांनी फक्त लॅब मध्ये positive report आलेत तितकेच रुग्ण आहेत असे समजण्याची जी चूक केलीये, तीच चूक आपण का करायची?)

3. सामाजिक जागरूकतेचा, जागरूकता करूनही शिस्तीचा अभाव. (इटलीमध्ये प्रशासनाने सूचना करूनही सुट्टी असल्याने तिथले नागरिकांनी बाहेर पडणे, पार्टी करणे, एकत्र येणे थांबविले नाही.)

4. उपचारासाठी कुठलीही लस किंवा  उपचार उपलब्ध नाहिये, प्रायोगिक तत्त्वावर HIV सारख्या इतर रोगांची औषधे वापरत आहेत. पण ते कितपत परिणामकारक आहेत, कोणी सांगू शकत नाही. अंदाजानुसार एक दीड वर्ष लस उपलब्ध होणार नाहिये.

भारतामध्ये होत असलेली चिंताजनक वाढ पाहता, इटलीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी काय करायचे?

कुठल्याही परिणामांचा विचार न करता 21-28 दिवसांसाठी देश संपूर्ण lockdown करणे, हाच यावर एकमेव आणि प्रभावी उपाय दिसतो. कारण Social Distancing चे आवाहन, विनंती करून भारतात कोणी ऐकत नाही, ऐकणार नाही. (चीनने कर्फ्यू लागु करूनच याचे संक्रमण थांबवून दाखविले. आज चीनमध्ये एकपण नवीन संक्रमण झाले नव्हते.)

एक दिवस 'जनता कर्फ्यू' लागु करून फारसा फरक पडणार नाही.

21-28 दिवसच का? कारण या 28 दिवसांमध्ये ज्यांना लागण झाली आहे त्यांच्यात लक्षणे दिसणे, आणि त्यांच्यावर उपचार होणे शक्य आहे. आणि तोपर्यंत Social distancing, lockdown असल्याने नवीन संक्रमण, लागण होणार नाही.

*आणि विशेष म्हणजे आपल्याकडे हा उपाय आज किंवा उद्या लागु करावाच लागेल. मात्र जितका उशिरा लागु केला तितके जास्त नुकसान झाले असेल.
जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा तर प्रत्येकाला किमान एक महिन्यासाठी घरी बसावेच लागेल. मात्र, त्यावेळी अनेकांना, आपल्या कुटुंबीयांना लागण झालेली असू शकते.  निरोगी राहून घरातील व्यक्ती सोबत गप्पा मारणे, टीव्ही, मोबाईल पाहणे हे घरातील एक किंवा अधिकजण करोनाग्रस्त असताना असहाय्य बसण्यापेक्षा कधीही खूप चांगले आहे.

या स्थितीला अाम्ही तरुण, धडधाकट आहोत, माझी immunity चांगली आहे, व्हायचे ते होईल, म्हणुन बाहेर पडत असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या कुटुंबातील ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, जे वडिलधारे आहेत, त्यांचा जीव धोक्यात घालून बाहेर पडताय. कारण घरी आल्यानंतर तुम्हाला झालेली लागण ही त्यांना होण्याची शक्यता खूपच जास्त आहे.

म्हणून 'घरीच थांबा.. Home Quarantine, Self imposed curfew चे पालन करा, प्रशासन सांगते आहे त्या सूचना पाळा'...

कोरोनावर आपण इतके दिवस झाले विनोद, गाणे करत असलो, तरी आपण समजतो त्यापेक्षा हे संकट खूप मोठे आहे. फक्त हे संकट हळू हळू येत असल्याने आपण काहीसे गाफील आहोत, आपल्याला फक्त "घराबाहेर पडाल तर मराल आणि कुटुंबीयांना पण माराल" अशीच भाषा कळते ना! इटली, स्पेन बाबतचे updates ज्याने फॉलो केले आहेत, त्याला हे लक्षात येईल. तेथील घडामोडीसंदर्भात नक्की वाचा.  आपल्याला तिसऱ्या स्टेज ला जायचे नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to कोरोना व्हायरसचा सामना कसा कराल?


कोरोना व्हायरसचा सामना कसा कराल?

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि काही उपाययोजना