लोक मास्क लावून का फिरत आहेत तेच कळत नाहीये.
नवीन कोरोना वायरसचा मॉरटॅलिटी रेट आजच्या घडीला फक्त १% आहे. म्हणजे शंभर जण कोरोना पॉझिटिव्ह असतील तर त्यातील एकाचा मृत्यू होऊ शकतो. २०१७ मध्ये आलेल्या SARS आणि MERS पेक्षा (हे दोन्हीपण कोरोना वायरस होते) हा रेट खूप कमी आहे. अघोरी मिडियामुळे नको असलेली माहिती पसरविली जात आहे.
कोरोनाच्या 'इपिडेमिक' पेक्षा लोकांचा 'इन्फोडेमिक' जास्त वेगाने हानीकारक आहे.
जगभरात या आजाराने झालेल्या मृत्युमध्ये एकाही दहा वर्षांच्या खालील मुलाचा समावेश नाही. एवढंच नाही तर मृत पावलेल्या लोकांपैकी जवळपास लोक हे साधारणपणे पन्नाशी, साठी ओलांडलेले किंवा आधीच श्वसनाचे आजारी आहेत ज्यांना लागन झाली. याचा अर्थ काय होतो....तर...ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्याला साधारण इन्फेक्शन होत नाही आणि जरी झाले तरी उपचार योग्य घेऊन ठणठणीत बरे होता येते.
ज्या वुहानमध्ये दीड महिन्यापूर्वी मृत्यदर 17% होता तिथे तो आज 4% आहे... म्हणजे याच्यावर नियंत्रण मिळवणे तेवढे जास्त कठीण नाही.
कोरोना आपल्या देशात आलेला आहे... सत्तरहून जास्त लोक पॉझिटिव्ह आहेत... अजून एकही मृत्यू नाही...हे सत्य आहे! पण त्यासाठी अख्खा देश पॅनिक होणं हे विचीत्र मानसिकतेचं लक्षण आहे. अगदी 'हाकमारी' च्या गोष्टीसारखं!
सर्वात जास्त वाईट आणि वाचित्रही वाटतं ते मास्क तोंडाला लावून फिरणाऱ्या लोकांचं. हॉस्पिटल मध्ये मास्क लावणे हे ठीक आहे किंबहुना कम्पल्सरी आहे पण इतर ठिकाणी खरंच मास्क ची गरज नाही. बंधु आणि भगिनींनो तुम्हाला मास्कची दररोजची सवय आहे का? ...नाही! आपण स्वत:ला आठवून पहा किंवा इतरांचे निरीक्षण करा... त्या मास्कला कितीवेळेस स्पर्श करतोय? बोलतेवेळी, काही काम करतेवेळी कळत नकळत तो मास्क खाली वरी होतोय. नॉर्मल असताना आपण जितक्या वेळेस तोंडाला स्पर्श करत नाही त्याहुन कितीतरी अधिक वेळा मास्क लावल्यावर करतो. प्रत्येकवेळी मास्कला स्पर्श करतेवेळी आपण काही हात धूत नाही. त्या हातावर वायरस नसेल कशावरून? म्हणजे नसलेले वायरस आपण स्वत:च नाकातोंडापर्यंत नेऊन सोडतोय.
मास्क लावण्याचा उद्देश हा नाही की, दुसऱ्यामुळे आपल्याला होणारे इन्फेक्शन थांबावे तर मुख्य उद्देश हा आहे की, आपल्यामुळे कोणाला इन्फेक्शन होऊ नये! जर स्वत:ला खरंच काही ताप, खोकला, श्वसनास त्रास असेल तर मास्क लावणं १०० टक्के गरजेचं आहे.
जे लोक आज कोरोनाच्या भितीमुळे घाबरून गेले आहेत ते रोज कितीतरी TB पेशंटच्या संपर्कात येत असतील. श्र्वासावाटे होणारे किंवा स्पर्शातून होणारे शेकडो आजार आणि शेकडो बाधित व्यक्ती आपल्या संपर्कात रोज येत असतात.
दररोज आपण हजारो वायरस आणि बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो. बस, ऑटो, लोकल, सार्वजनिक स्वच्छतागृह, हॉटेल... पाणी...हवा...माती... कोरोनाच्या कितीतरी भयंकर विषाणू आपण भारतीय लोक नकळत रोज फेस करतो. आपली Immunity खूप मजबूत आहे. जेंव्हा २०१७ मध्ये SARS जगातील २० देशात धुमाकूळ घालत होता तेंव्हा भारतात त्यामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. आपली लोकसंख्या आणि जगण्याची पद्धत एवढी भयंकर आहे की, अख्खा देश इन्फेक्ट व्हायला एक आठवडा पुरेसा आहे पण असं होत नाही कारण आपली इम्युनिटी खूप मजबूत आहे.
जे इन्फेक्टेड आहेत त्यांच्यावर उपचार होतील... निश्र्चितच ते बरे होतील. अजून लस उपलब्ध नाही पण लक्षणांवर उपचार करून नियंत्रण मिळवणे जास्त अवघड नाही.
घरातून कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी भरपूर जेवण करून घेणं कधीही उत्तम...हात धुत राहा...आणि उगी चार पाच पट किंमत देऊन मास्क घेऊ नका... त्याचा फारसा काही उपयोग नाही! ते पाहायलाही चांगलं दिसत नाही.
डॉ. प्रकाश कोयाडे
(YCM Hospital Pune)