शिवचरित्र - लेख ५
[प्रारंभी ५,७ ओळी, फार्शी मजकूर]
श.१४९३ माघ शु. १०
इ. १५७२ जाने. २४
सरसमत व कारकुनानी देसमुखानी व अदीकारीयान व खोतानी व रयानि मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊळ बिदानद सु॥ इसने सबैन व तिसा मैया आपाजी माहाद प्रभु देसाई व कुलकरणी सो मामले मजकुरी बंदगी हजरती आर्दास इरसाल केली जे मजमुन लिहिले जे आपली इसाबती लाजीमा विलायेती मजकुरी होती ती दिवाणी जमा जाली आहे आपणास लाजीमा मुशाहिरा नाहि येण्हे करि [तां] चाकरी करितां आपणासी खावयासि नाहि तरी विलायेती मजकुरी आपणासि गाउ खंड दिल्हेया आपण कवीहाळ होउनु देसकतीचे काम करुन चाकरी करनि मालुम जाहाले आपाजी महाद प्रभु मजकुरास गावखड खेरीज इनामती व खारिया दरगावाप्रमाणे दर हरसाल देत जाइजे तकरार न कीजे दर हरसाल खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लेहोनु घेइजे असल नफर मजकुरास दीजे ब॥ खु॥ तेरीख ८ माहे रमजान या असलिमखान [फा.मोर्तब]