रत्नमहालांतील खुनासंबंधी साधारण हकीकत नलिनीला कमला. कराकडून समजली, व भीतिग्रस्त होऊन ती तशीच शरयू आणि कमलाकर यांची नजर चुकवून त्या खुनाच्या बाबतींत आणखी काय काय बाहेर पडते ते समजून घेण्याकरितां रत्नमहालाकडे जाण्यास निघाली. रत्नमहालांतील खुनाची हकीकत हळूहळू दादर व माटुंगा ह्या विभागांत पसरत चालली होती व कांहीं चौकस लोक 'हे काय प्रकरण आहे ?' ते समजून घेण्याकरितां रत्नमहालाच्या आसपास जमू लागले. लोकांत जरी खुनाची बातमी पसरली होती, तरी रत्नमहालांत-बंगल्यांत अगर बागेत कोणीही पोलिसखात्यांतील माणूस दिसेना. नाही तर असे काही तरी असले म्हणजे त्या जागी पोलिसांची रेलचेल असाव याची, आणि हे समजूनच, पोलिस दिसला, की तेथे रिकामटेकडया माणसांची गर्दी उडून नसत्या चौकशीला सुरवात होणार हे माहित असल्यामुळे सर्जेरावांनी पोलिसांचा पाहारा बंगल्याबाहेर न ठेवता तो 

आंतच ठेवला होता व गजाननराव-त्या बंगल्याचे मालक येईपर्यंत त्या खुनाची विशेष वाच्यता होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्या दुर्दैवी मयत स्त्रीचे प्रेत त्यांनी बंगल्यांतील एका खोलीत ठेवून खोली बाहेर एक पोलिस पाहारा करण्यास ठेवला होता. बंगल्यांतील इतर प्रत्येक वस्तु बाबुराव पहिल्याने आंत शिरतांना होती, त्याप्रमाणेच होती. त्यांत यत्किंचितही फरक केला नव्हता; आणि सर्जेरावांनी आपली बैठक सफेत दिवाणखान्यांतच ठेवून तेथूनच ते जरूरीचे हुकुम सोडीत होते. ___“ बाबुराव " ते म्हणाले, “ जर एखादी तरुण स्त्री मला भेटायला आली तर तिला ताबडतोब आंत पाठवून द्या. इतर कोणालाही आंत सोडूं नका. " 

" पण कमलाकर आले तर ?” बाबरावाने विचारलें. 

" त्यांना अर्थातच परवानगी आहे. मी त्यांचीच वाट पाहत आहे; पण त्यांच्याशिवाय इतर कोणीही येता कामा नये." 

" आपण गजाननरावांना बोलावण्यास शिपाई पाठवला, साहेब ?" 

" त्या तरुण स्त्रीकडून मला पत्ता मिळतांच मी ताबडतोब माणूस पाठवीन. अरे ! पण ती आली वाटतं.” ऐकू येणाऱ्या बेलकडे लक्ष देत सर्जेराव म्हणाले, " होय; तीच ती. जा तिला आंत सोड. " 

थोड्या वेळाने नलिनी आंत आली. या वेळी तिची मुद्रा फिकट व घाबरल्यासारखी दिसत होती. सर्जेरावांनी तिच्या मुद्रेवरील हा विकार पाहिला; परंतु स्वतःच्या घरांत खून झाला असें ऐकतांच एखादी तरुण स्त्री घाबरून जाणे साहजिक आहे असा विचार करून त्यांनी तिकडे विशेष लक्ष दिले नाही. नलिनी जरी तरुण व अननुभवी होती, तरी तिची संयमनशक्ति दांडगी होती. आंत येताक्षणीच तिने आपले ओंठ मिटून आपल्या चेहऱ्यावर कसलेच चिन्ह न दिसण्याचा प्रयत्न केला. सर्जेरावांनी हे सर्व पाहून ठेवले, तरीही त्यांना आपल्या प्रश्नापुढे ही टिकेल किंवा नाही याचा निर्णय करता येईना. 

" तुम्ही माझ्यापासून काहीही लपवून न ठेवता मी विचारणार त्या प्रश्नांची उत्तरं सरळ द्याल ना ?" ती आंत येतांच सर्जेरावांनी तिला जरा कठोर स्वराने प्रश्न केला. __ हा प्रश्न ऐकतांच नलिनीला राग आल्यावांचून राहिला नाही. तिनें सर्जेरावांकडे रागाची नजर फेकीत म्हटले, "माझ्यासारख्याला तुम्ही असा प्रश्न विचारणं म्हणजे थोडंसं शिष्टाचाराला सोडून नाहीं का होणार ? तुम्हांला माझा संशय येतो का ? 

" ___“ छी ! छी ! तुमची गैरसमजत झाली. मला तुमचा अगर कुणा चाच संशय नाही. प्रश्न विचारण्यांत माझा कोणताच अंतस्थ हेतु नाही. पण हे प्रकरण फारच चमत्कारिक आहे." __" कमलाकरांनी सांगितलेल्या हकीकतीवरून ते बऱ्याच गंतागंतीचं 

 

असावं अशी माझी समजूत आहे. " नलिनीने उत्तर दिले. __" हे घर बंद असून मालकानं आपल्यामागे कोणी राखणारा ठेवला नाहीं हें कसं?" 

"कारण राखणदार ठेवण्याची मुळीच जरूर नव्हती.” नलिनी म्हणाली, "माझ्या बहिणीला दादरच्या ह्या विभागांत चोऱ्या,दरवडे यांपासून भय नाहीं असं वाटल्यामळं तिनं पोलिसांनाही या बंगल्यावर नजर ठेवायला सांगितलं नाही." 

" ती मंडळी इथं राहायला केव्हां येणार ? " " एका महिन्यानं. " " तुम्ही त्यांच्याबरोबर गेला नाही वाटतं ?" नलिनीने नकारार्थी आपली मान हालविली. ती म्हणाली, “माझ्या बहिणीचं व माझं पटत नसल्यामुळं मी हे घर बंद असेपर्यंत माझ्या एका मैत्रिणीच्या घरी राहिले आहे.” 

"या घराचा मालक अगर इतर कोणीही मंडळी इथं नसतांना आणि घर बंद असतांना विचा आंत शिरकाव झाला कसा हेच गढ आहे. ती इथं शनिवारी रात्री आली. कोणत्या वेळी आली,आंत येते वेळी तिच्या. बरोबर दुसरं कोणी होतं किंवा नाही यासंबंधाची बातमी आम्हांला अद्यापि मिळालेली नाही. कारण आंत येतांना तिला कोणी पाहिलं नाही. ती आली तरी कशी ?" 

"ते मला कसं बरं सांगता येणार ? ही सर्व हकीकत ऐकून तुमच्याच. प्रमाणं मीही गोंधळन गेले आहे. पण तिचं प्रेत मला पाहायला मिळेल का ? ती माझ्या ओळखीची आहे की नाही, हे तरी मला मग 

सांगतां येईल.” 

" ते आपण मागाहून पाहूं.” सर्जेराव म्हणाले, “ मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेतः त्यांची उत्तरं कृपा करून माहित आहेत तशी द्या. जर ही स्त्री तुमच्या मेहुण्याच्या परिचयाची असती तर तिला त्यांच्याप्रमाणे ह्या घरांत येणं शक्य आहे का ?" __ "केव्हाही नाही. कारण या घराच्या मुख्य दरवाजाची किल्ली फक्त माझ्या मेहुण्याजवळच असते.” 

" तशीच चावी दुसऱ्या कुणाजवळ नाही याविषयी तुमची खात्री. भाहे का ?" ___ या प्रश्नाचे उत्तर देते वेळी, आपले मनःसंयमन करता येण्यास अवसर मिळावा, व आपला चेहरा पोलिस इन्स्पेक्टरला दिसू नये या हेतूने नलिनी खिडकीबाहेर पाहत म्हणाली, " तसली किल्ली दुसऱ्या कुणाजवळ असेल असं निदान मला तरी वाटत नाही.” 

या उत्तराने सर्जेरावांचे समाधान झाल्यासारखे दिसले व त्यांनी खिशांतून एक 'नोटबुक' काढन म्हटले, " हे गजाननराव कोण ?" __ "ते माझे मेहुणे असून सावे आणि कंपनीचे दुसरे भागीदार आहेत." नालिनीने उत्तर दिले, " त्या कंपनीचा लांकडाचा व्यापार आहे." 

" असं ! मग त्यांचं नांव त्यांत कुठं नाहीं तें ?” __ " ती कंपनी बरीच जुनी असून तिचे एकंदर दोन भागीदार आहेत. माझा सख्खा भाऊ सावे दुसरे गजाननराव. जेव्हा माझे वडील वारले तेव्हां त्या कंपनीचं नांव सावे आणि कंपनी असंच होतं. कंपनी जुनी असल्यामुळं गजाननराव जरी तिचे भागीदार झाले तरी माझ्या भावानं नांवांत फरक केला नाही." 

" गजाननराव केव्हां भागीदार झाले ?" 

" तीन वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हां त्यांचं माझ्या बहिणीबरोबर लग्न झालं तेन्हां." 

मोटर सांपडली ! ३९ " भागीदारीचे पैसे गजानरावांनीच दिले का--" सर्जेराव आणखी कांही विचारणार होते; परंतु नलिनीची साश्चर्य मद्रा पाहतांच ते म्हणाले, “ माफ करा हं नलिनीबाई; पण मला सर्व काही समजलंच पाहिजे." 

" मला वाटतं ह्या धंद्यांत गजाननरावांनी पैसे घातले नसावेत. माझ्या बहिणीजवळ बरीच पुंजी असल्यामळं तिनं गजाननरावांच्या नांवानं भागीदारीसाठी माझ्या बंधूला बरेच पैसे दिले." नलिनी म्हणाली, “याहून अधिक माहिती तुम्हांला पाहिजे असल्यास ती तुम्ही गजाननराव यांना विचारा.” 

" तसाच माझा बेत आहे. तुम्ही मला त्यांचा पत्ता द्याल का ? " " दर्यामहाल, चौपाटी रोड.” सर्जेरावांनी तो पत्ता टिपून घेतला. 

" मी त्यांना बोलवण्याकरतां टेलिफोन करणार आहे." ते म्हणाले, " कारण उद्या ह्यासंबंधाने चौकशी होणार असल्यामुळं त्यांना जरूर हजर असलं पाहिजे. बरं, पण तुम्हांला एक साधारण सडपातळ व लहानशी टोकदार दाढी असलेला तरुण गृहस्थ माहित आहे का ? " 

" अंऽहं, नाहीं ! " आठवण करीत नलिनी म्हणाली, "पण कां ?" 

"तसाच एक गहस्थ काल रात्री या घरांतून बाहेर पडला व त्यानंच पोलिसाला बोलत बोलत दूर नेलं व तेवढया वेळांत दुसऱ्या इसमानं त्या बाईचा प्राण घेतला." 

" मग ह्या कामांत एकंदर दोन माणसं होती तर ? " “ आमची तरी अशी समजूत आहे." सर्जेरावांनी उत्तर दिले. 

" गजाननराव गेल्यापासून तुम्ही इकडे कधी आला होता का?" त्यांनी विचारले. 

" नाही." " पण तुम्ही सध्या राहतां ते ठिकाण या घराहुन अगदी जवळ आहे, नन्हे ?" 

" तरी पण मला इथं यायचं काहीच कारण नाही." 

" तुम्ही त्याच घरांत राहतां ?" " होय. माझ्या बहिणीबरोबर मी इथंच राहते." " मग तुमच्या रोज उपयोगांत येणाऱ्या वस्तु इथंच असतील तर !" 

नलिनीने सर्जेरावांचा प्रश्न विचारण्याचा रोख ओळखून त्यांच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत म्हटले, " जरी माझ्या सर्व जिनसा इथंच अस तात तरीही मी जणूं काय लांबच्याच प्रवासाला जात आहे असं सम जून जरूरीपुरत्या सर्व वस्तु माझ्याबरोबर नेलेल्या आहेत. इन्स्पेक्टर साहेब, जवळ जवळ दोन आठवडे मी भवान्यांच्या घरी राहिले आहे व तेवढया वेळांत या बाजूलाही फिरकले नाही." 

" तुम्ही ह्या रस्त्यावरूनसुद्धा कधी गेला नाही ?" " मी या बाजूलाच कधी आले नाही. ” । 

" मग तुम्हांला काहीच माहित नसणार." आपण केलेल्या प्रश्नां पासून काहींच निष्पन्न झाले नाही असे पाहून निराशेच्या स्वराने सर्जेराव म्हणाले. 

" खरोखरच काही माहित नाही मला. " 

सर्जेराव आपला हात हनुवटीकडे नेऊन व आपली दृष्टि जमिनी कडे वळवन विचार करू लागले. नलिनीला विचारण्यासारखें आणखी कांहींच नव्हते. रत्नमहालाचे मालक गजाननराव हे होते व त्याच घरांत ज्या अर्थी त्या अनोळखी स्त्रीचा खून झाला होता त्या अर्थी त्या घरांत तिचा शिरकाव कसा झाला हे कदाचित् त्यांनाच माहित असेल. ___“ सावे आणि कंपनीचे भागीदार होण्यापूर्वी गजाननराव काय करीत होते ?" थोडया वेळाने त्यांनी नलिनीला विचारले. __ "काही नाही. " नलिनीने उत्तर दिले, “ त्यांनी आपला सर्व वेळ हिंदुस्थानांतील निरनिराळे गांव पाहण्यांत घालवला व मग त्यांना अशा रीतीनं आयुष्य घालविण्याचा कंटाळा आला असावा असं मला वाटतं. तथाति लग्न झाल्यानंतर माझ्या बहिणीनं त्यांना कंपनीचा भागीदार होण्यास सांगितलं." 

 

" हुः !” सर्जेराव ह्या उत्तराने प्रस्तुत विषयावर काहींच प्रकाश पडत नाही असे पाहून म्हणाले. नंतर त्यांनी सर्व दिवाणखानाभर एकदा नजर फेकीत विचारले, “ ह्या दिवाणखान्याची रचना चमत्कारिक दिसते ! नलिनीबाई, ही तुमच्या बहिणीचीच कल्पना का ?" __ " नाहीं; गजाननरावांचीच ही कल्पना. हे घरही लग्नापूर्वी त्यांनीच बांधलं होतं. रमाबाईला हा दिवाणखाना मळीच आवडत नाही. परंतु गजाननरावांना मात्र याची फारच आवड आहे. हे घर व आंतील सर्व सामान गजाननरावांनी आपल्या लग्नापूर्वीच घेतलेलं आहे." 

" लग्न झाल्यानंतर राहण्यासाठी वाटतं ?" 

“ नाही; माझ्या बहिणीबरोबर लग्न होण्यापूर्वीच गजाननराव या घरांत राहत असत.” 

सर्जेरावांना हे फारच चमत्कारिक वाटले ! तथापि याहून अधिक प्रश्न त्यांनी तिला विचारले नाहीत. “ नलिनीवाई," काही वेळाने ते म्हणाले, "तम्ही माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मोकळेपणानं दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझ्याकडून जर तुम्हांला एखादा कमीअधिक प्रश्न विचारला गेला असेल तर ह्या खुनाच्या चमत्कारिकपणाकडे लक्ष देऊन त्याबद्दल मला क्षमा करा; आपण आतां तें प्रेत पाहूं.” । 

प्रेत पाहण्याची कल्पना मनांत आल्यामुळे नलिनी थोडी घाबरल्या प्रमाणे दिसू लागली. परंतु तसे करण्यास तिने आपली नाखुषी दर्श विली नाही. ती उठून मुकाटयाने सर्जेरावांच्या मागोमाग गेली; परंतु ज्या खोलीत तें प्रेत ठेविलें होतें त्या खोलीच्या दरवाजापाशी येतांच मात्र दचकून ती रागाने म्हणाली, " तुम्ही ते प्रेत माझ्या खोलीत ठेवलं आहे !" 

" अज्ञानामुळं असं घडलं खरं ! " सर्जेराव म्हणाले, "पण दुसऱ्या कुणाच्याही खोलीत ठेवलं असतं तरी त्यानंही असंच म्हटलं असतं." ___ " याउप्पर मला या खोलीत केव्हाही निजतां नये," असें पुटपुटत -सर्जेरावांनी उघडलेल्या दरवाजांतून नलिनी आंत शिरली. 

 

नलिनीला आंत सोडन आपण तिच्याबरोबर आंत न जातां सर्जेराव तिने दिलेल्या माहितीवर विचार करीत बाहेरच उभे राहिले. गजानन रावांनी घर बांधल्यानंतर काही दिवसांनी लग्न केले व ते आपल्या पत्नीसह येथे येऊन राहिले. परंतु लग्नापूर्वी स्वतःसाठीच त्यांनी एवढें मोठे घर बांधले असेल काय ? कदाचित् त्यांनी आपणासाठी पूर्वी दुसरी एखादी कुमारी ठरविलेली असून तिच्या आवडीप्रमाणे हे घर तयार केले असेल. परंतु काही तरी कारणामुळे ते लग्न मोडून त्यांचे मग नलिनीच्या बहिणीबरोबर लग्न लागले असावे. रमाबाईंना तो सफेत दिवाणखाना मुळीच आवडत नाही, असें नलिनीच्या सांगण्यावरून दिसते. अर्थातच हे लग्न होण्यापूर्वी गजाननरावांचे प्रेम दुसऱ्या कोणा वर तरी बसले असून तिच्या आवडीप्रमाणे त्यांनी हे घर बांधले असेल. परंतु तिच्याबरोबर संबंध फिसकटल्यामुळे नंतर त्यांनी हे लग्न करून रमाबाईना ह्या घरांत आणले असावें. तें कांही असो; परंतु या बंगल्याची चावी गजाननरावांकडेच असतां ती स्त्री आंत तरी आली कशी ? कदाचित् त्यांच्याच मदतीने तर ती आंत शिरली नसेल ?--- परंतु सर्जेरावांची विचारमालिका येथेच थांबली. त्यांना, आपण भल त्याच मार्गाने जात आहो असे कळून चुकले व कच्च्या पायावर आपण आपले विचारगृह उभारीत आहों, अशी त्यांची खात्री झाली. प्रत्यक्ष गजाननरावांना पाहिल्याशिवाय व ते कसल्या प्रकारचे गृहस्थ आहेत हे समजल्याशिवाय भलताच विचार करणे योग्य होणार नाही व तसे केले असतां खरा मार्ग आपणास कधीही लाभणार नाही असें त्यांना वाटले; परंतु स्वतःच्या समाधानाकरितां त्यांनी आणखी काही प्रश्न नलिनीला विचारण्याचे ठरविले. 

थोडया वेळाने नलिनी खोलीबाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर अद्या पिही तसाच फिकटपणा दिसत होता. बाहेर येताक्षणीच आपण त्या स्त्रीला ओळखत नाही असे तिने सर्जेरावांना कळविलें. 

" तुमची अगदी खात्री आहे ?” सर्जेरावांनी प्रश्न केला. 

" अगदी पूर्ण खात्री आहे. यापूर्वी मी तिला कधीच पाहिलेली नाही." नलिनीने व्यथित अंतःकरणाने उत्तर दिले, " खरोखरच ती सुंदर असून तिच्या चेहऱ्यावरून ती पंचवीस वर्षांची असावी असं दिसतं. ती इथं कां बरं आली असावी?" तिने विचारले. 

" तोच तर प्रश्न आहे !" सर्जेराव म्हणाले, “ तिचा खून तरी कुणी केला ?" __ " अशा अबलेवर आपला हात चालवायला त्याला कांहींच दया माया कशी आली नाही याचंच आश्चर्य वाटतं. याच्या मुळाशी काय असेल तें असो!" 

" तरी हे फार वेळ लपून राहणार नाही. ज्या अर्थी ह्या घराची चावी एकटया गजाननरावांपाशीच आहे, त्या अर्थी ते हिला ओळखीत असलेच पाहिजेत." 

" होय, फक्त त्यांच्याजवळच-" परंतु आपले वाक्य पुरे होऊ न देतां मध्येच नलिनीने सर्जेरावांना प्रश्न केला, “ म्हणजे या खुनाची थोडीबहुत माहिती त्यांना असावी असं तुमचं म्हणणं आहे की काय?" 

" पण ह्या बंगल्याची किल्ली जर त्यांच्या एकटयाचजवळ--'' 

" पण आतांच तुम्ही, तुमच्या हाताखालच्या एका पोलिसाला भेटलेल्या, एका टोकदार पण लहानशी दाढी राखणाऱ्या गृहस्थाजवळ तसली चावी होती असं सांगितलं." 

" तें खरं. पण-गजाननरावांना दाढी आहे का?" " मुळीच नाही." “ कदाचित त्यांनी तसा वेष घेतला असावा." 

 

" असं बोलणं म्हणजे या कृत्यांत त्यांचं अंग आहे असा आरोप तुम्ही त्यांच्यावर ठेवतां.” नलिनी म्हणाली, "या खनाविषयीं गजानन रावांना काहीएक माहिती नाही, अशी माझी पूर्ण खात्री आहे व गेल्या रात्री ते चौपाटीवर आपल्या बंगल्यांत आजारी होते. याचा तुम्हांला पुरावा पाहिजे असल्यास कालच संध्याकाळी मला माझ्या बहिणीकडून आलेलं पत्र मी तुम्हाला दाखवते. आजपासून तिच्याकडे मी राहायला जाणार होते; पण गजाननराव आजारी असल्यामुळं मी तिकडे सध्या आणखी दोन दिवस येऊ नये अशा अर्थाचं पत्र तिनं मला पाठवलं आहे.” 

 

हे ऐकून सर्जेरावांची निराशा झाली. गजाननराव जर आपल्या घरांत आजारी असल्यामुळे निजन होते तर बाबुरावाला भेटणारा गृहस्थ गजाननराव खास नव्हे, अशी त्यांची खात्री पटत चालली. 

" तुम्ही मला तें पत्र दाखवाल का?".त्यांनी विचारले. 

“ मी घरी गेल्यावर ते इकडे पाठवून देईन. " नलिनी म्हणाली, "शिवाय मी तुम्हांला अगदी खात्रीपूर्वक सागते, की गजाननरावांना जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हां असा गुन्हा त्यांच्या हातून घडणं शक्य नाही अशी तुमची खात्री झालीच पाहिजे. त्यांच्यासारखा दयाळ व चांगला माणूस मिळायचा नाही.” थोडा वेळ थांबून ती पुढे म्हणाली, "बरं, 

पण तिचा खून कशा रीतीनं केला ?" 

"गात असतांना तिच्या गळ्याच्या मागं खंजीर खुपसन !!" " गात असतांना ! म्हणजे! ती इथं गात होती की काय ? ह्या अनोळखी घरांत कां गात होती ?" 

" कां गात होती ते सांगता येणार नाही. पण ती गात असलेलं पद सौभद्र नाटकांतलं 'किति किति सांगू तुला' हे होतं." 

"हे तर रमाताईचं अत्यंत आवडतं गाणं !” आश्चर्य वाटून नलिनी म्हणाली. __ " हो खरंच ! तुमची बहीणसुद्धा चौपाटीवरच आहे ना?'' 

" अर्थातच ! गजाननराव तिकडे असतांना ती दुसरीकडे कशी बरं असेल ? तुम्ही तिच्यावर खुनाचा आरोप नाही ना ठेवीत?" 

“मी सध्या कुणावरच आरोग ठेवीत नाही." सर्जेराव म्हणाले, "कोणत्याही बाजनं ह्या खुनाच्या शोधाला आधार मिळतो की काय ते पाहत आहे." 

“ मग खरा मार्ग सोडून भलत्याच मार्गाचा अवलंब का करतां ? " " खरा मार्ग तो आणखी कोणता?" 

" ज्या शस्त्रानं तिचा खून झाला त्या शस्त्रापासून तुम्ही सुरवात का करीत नाही ?" 

"आम्ही तो सुद्धा प्रयत्न करायचं ठेवलं नाही. पण तें शस्त्रच कुठं मिळत नाहीं ! खुनी इसम आपल्यामागं ते शस्त्र ठेवून आपली मान फांसावर चढवण्याइतका मूर्ख नसतो ! ते शस्त्र आपल्याबरोबर तो घेऊन गेला. जखमेच्या आकारावरून, एका अरुंद पातीच्या खंजिरानं खन केलेला आहे असं डॉक्टरचं म्हणणं आहे." 

" खंजीरासारख्या शस्त्राने खून करण्यात येतो तर ! " 

" खून करणाऱ्याला कसलंही शस्त्र चालतं व खंजीरासारखं वस्त्र एखादी स्त्रीसुद्धा वापरू शकेल. पण वादविवाद करण्यांत काही अर्थ नाही. खुनी पुरुष आहे किंवा स्त्री आहे हे आपणाला अजून समज लेलं नाही.” 

सर्जेरावांचा अशा त-हेने बोलण्याचा आशय नलिनीला समजेना. ती विकारशून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहूं लागली. 

" तुम्हांला कसं सांगावं तेच मला कळत नाही. " सर्जेराव थोडा विचार करून म्हणाले, “आपणाला, त्या स्त्रीला ह्या बंगल्याची चावी कशी मिळाली हे जरी माहीत नाही तरी ती दोन मनुष्यांना भेटण्या करतां या घरांत आली होती अशी माझी समजूत आहे." 

" दोघांना ! " आश्चर्यचकित होऊन नलिनीने विचारले. 

" होय. त्यांपैकी एकानं बोलत बोलत बाबुरावाला दूर नेलं," सर्जे राव सांगू लागले, “ व तेवढया वेळांत दुसऱ्यानं तिचा खून केला. आपल्या समजुतीसाठी आपण असं समजूया की, ती स्त्री त्या दोन माण सांना भेटली; थोड्या वेळानं त्यांना बंगल्यासमोरील रस्त्यावर बाबुराव दिसला. अर्थात् त्याला दूर नेण्याकरतां त्यांतील एकजण बाहेर पडून  दुसरा तिथंच राहिला. पहिला इसम निधून जाण्याच्या सुमाराला ती स्त्री 'किति किति सांगं तला 'हे गाणं गाऊं लागली व थोड्याच वेळांत ती त्यांत रंगनही गेली. खनी इसमानं तिच्या मागं उभा राहून वेळ येतांच आपल्या हातांतील खंजीर तिच्या गळ्याच्या मागील बाजला खुपसला व तिचा प्राण गेला असं पाहून तोही तिथून निघून गेला." 

" पण मघाशी तुम्ही पहिला माणूस पोलिसाला दूर घेऊन जाण्या पूर्वीच गाणं चालू होतं असे सांगितलं, नव्हे ? " 

" अर्थात्, पण त्या स्त्रीनं तो पहिला इसम निघून जातांच गाणं म्हणायला सुरवात केली असावी.” ___“ त्याच्याही पूर्वी." नलिनी म्हणाली, "कारण पहिला इसम बाहेर पडण्यापूर्वीच पोलिसांना ते माणं ऐकू येत होतं व ते ऐकण्यासाठीच तर तो थांबला. तुम्ही मला मघाशीच सांगितलंत त्यावरूनच मी हे सांगते आहे. यावरून तुमच्या आतांच्या व मघांच्या सांगण्याचा मेळ जमत नाही." 

हे ऐकून सर्जेरावांच्या भिंवया आपोआप वर चढल्या. “ ही गोष्ट बरोबर जुळवणं अगदी कठीण आहे.” ते म्हणाले, “ कादंबऱ्यांतील डिटेक्टिव आजकाल मिळणं मुष्कील झालं आहे. कादंबऱ्यांतून वर्णन केलेली गुप्त पोलिसांच्या चातुर्याची कथानकं जगाच्या रणमैदानांत पाहायला मिळणं शक्य नाही. मी काय, यःकश्चित् मनुष्य ! खरा मार्ग सांपडेपर्यंत मी नानात-हेच्या कल्पना लढवणारच. गजाननरावांची भेट होईपर्यंत या बाबतीत अधिक कळणं शक्य नाही. ज्या अर्थी ही स्त्री त्यांच्या घरांत आली त्या अर्थी तिची माहिती-' __यांना यांतलं काही एक माहित नाही, " नलिनी मध्येच उता वीळपणे म्हणाली, “ त्यांना माहित असणं शक्य नाही. कारण ते चौपाटीवर आपल्या बंगल्यांत आजारी आहेत.' __ "गजाननरावांचं या बाबतीत काय म्हणणं आहे ते ऐकून घेतल्या. खेरीज माझी खात्री पटणं शक्य नाही." ते म्हणाले. 

विशेष काही विचारण्यासारखे राहिले नाही असं पाहून सर्जेरावांनी नलिनीला जाण्याची मोकळीक दिली व तिला पोचविण्याकरतां ते खालींत दरवाजापर्यंत आले. त्यांनी दरवाजा उघडताच त्याच वेळी बाहेरून आलेला कमलाकर आंत घुसून ओरडला, "माझी मोटर सांपडली : " 

" कुठं ? " सर्जेराव व नलिनी या दोघांनी एकदम प्रश्न केला. “ ठाणे स्टेशनच्या यार्डमध्ये !” हे ऐकतांच नलिनी सर्जेरावांकडे वळून म्हणाली, "इन्स्पेक्टरसाहेब, आपण हे नीट ध्यानात ठेवा. ठाणं व चौपाटी यांमधील अंतर लक्षात आणून, काल रात्री बाबुरावांना भेटलेला मनुष्य गजाननराव खास नव्हे, याची खात्री करून घ्या. कारण चौपाटीवर जाण्याकरता ते ठाण्याला मोटर नेण्याइतका मूर्खपणा करणार नाहीत." __“पण मी त्यांच्यावर अजून आरोप ठेवलेला नाहीं ! " सर्जेराव उद्गारले.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel