स्वार्थ या मनाचा साधणार मी कधी, 

तुला मनातलं सारं सांगणार मी कधी. 

 

उपकार न कोणाचे असे हक्क तो माझा,

माझं जे सर्वस्वी ते मिळणार मज कधी.  

 

कोड्यात मन हे माझं, पण ओढ अंतरीची. 

तुला कधी न कळली साधं या मनाची. 

 

संपणार सारेच जणू सोबतीचं माझ्या,

मग अपेक्षांची चिता जळणार ती कधी. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel