-    खुशबू नंदन

अचानक... 21 दिवसांचं lockdown जाहीर झाल आणि आम्हाला काहीस बर वाटलं, आराम करायला जे मिळणार होत.पण फक्त पहिल्या 2-3 दिवसातच आमचं आरामाच भूत उतरलं, आणि bore व्हायला लागलं.

ही वेळ खर कसोटीची होती.

आता आम्हाला ठरवायचं होत की lock down कसं कारणी लावायचं आहे कारण 21 दिवसं नंतर पण lock down ओपन व्हायचे chances दिसत नव्हते.

मग आमच्यातल्या काही लोकांना आपल्या जोपासल्या न गेलेल्या छंदांची आठवण झाली मग काय कुठे रंग, ब्रश निघाले तर कुठे विणकामाचे लोकर निघाले. काही लोकांनी उगवत्या सूर्याचा आस्वाद घेत योगा, प्राणायाम करायचं ठरवलं, तर काहींनी 12 वाजेपर्यंत अंथरुणात पडून राहण्याचा संकल्प केला. काहींनी (आपल्या generation ने ) आपल्या पालकांसोबतच्या नात्याला एक नवीन संधी देऊन नात पुनरुज्जीत (rejuvnate) करायचं ठरवलं तर काहींनी स्वतःच्या रूमची कडी लावत स्वतःला बंद करून घेतलं.

कुठे पत्ते, चौपट, बुद्धिबळ खेळलं गेलं तर कुठे एकट्याने pubg खेळलं गेलं. काही Long distance वाल्या लोकांनी "विरहाने प्रेम वाढते "ह्या उक्तीला सार्थ ठरवत प्रेम फुलवले तर काही लोकांनी लॉक डाउन असून वेळ का देत नाही म्हणून कुरबुरी काढल्या. नवदाम्पत्याना लॉक डाउन खूपच भावला (खास करून arrange marriage वाले ). काही जोडप्यानी आपल्या नात्याला नवीन उजाळी देण्याचं ठरवलं, कामामुळे बायकोला वेळ देता येत नाही अस म्हणणारे पुरुष स्वयंपाक घरात दिसू लागले, काहींनी तर चक्क पापड सुद्धा लाटले. तर काहींनी पुरुषी अहंकार जपत सोफा सांभाळला. काहींनी ज्ञान वाढवण्याची हीच ती संधी अस ओळखत खूप वाचन केलं, तर काहींनी पुस्तकाला हात देखील लावला नाही. काहींनी नवनवीन पाककला शिकून घेतल्या, तर काहींनी फक्त आस्वाद घेत वजन वाढवले.

लोक म्हणतात लॉक डाउन खूप काही शिकवून गेला. हो नक्कीच...भविष्य हे आपल्या भाग्यावर नाही तर आपल्या आजच्या कर्मावर अवलंबून आहे हे शिकवून गेला...                     

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत