कोरोनामुळे घरी राहायला मिळेल या विचाराने क्लासमधील खूप आनंदात होते. भारताच्या सध्याच्या विस्कटलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन वाढलंय याचं दुःख सगळ्यांनाच झालं. पण इतके दिवस घरी राहून सगळ्याप्रमाणे मलाही कंटाळा आलाय. नुसतं कंटाळा करून चालणार नाही काहीतरी करायला हवं म्हणून मी एक विषय लिहायला घेतला. या लॉकडाऊनने पुन्हा एकदा संधी दिली, ते माझा छंद जोपासण्याचा, आपल्या मनातील भावना शब्दांच्या रुपात कागदावर उतरवण्याचा. मी सध्या इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे त्यामुळे माझंच नाहीतर माझ्या मित्र-मैत्रिणीचं, माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थ्यांचं शेवटचे क्षण जगण्याचे स्वप्न डोळ्यातच राहून गेले. एक आपल्या कॉलेजची आठवण म्हणून मी हे पुस्तक लिहिण्याचं ठरवलं. स्वप्नातले शेवटचे क्षण जगायला नाही मिळाले म्हणून खंत वाटते पण दोन-तीन वर्षातच कॉलेजने आम्हाला खूप काही शिकवलं, खरी कॉलेज जीवन जगले याची आठवण आताच नाहीतर आयुष्यभर येईल हे तितकेच खरे...!!