*आत्मविश्वास*

अमेरिकेतील घटना आहे. एका तरुणाला व्यापारात खूप मोठे नुकसान झेलावे लागले.
त्याच्यावर कर्जाचा खूप मोठा बोजा झाला. कर्जापायी त्याला संपूर्ण जमीन, संपत्ती गहाण ठेवावी लागली. मित्रांनीही तोंड फिरवले.
तो खूप हताश झाला होता‌‌ कुठूनच काही मार्ग सुचत नव्हता. आशेचा एकही किरण दिसत नव्हता.
एक दिवस तो एका बागेत आपल्या परिस्थिती वर विचार करत बसला होता. तेवढ्यात तेथे एक वयस्क व्यक्ती आली.
कपडे आणि चेहऱ्यावरून ते खूप श्रीमंत वाटत होते. त्या व्यक्तीने चिंतेचे कारण विचारले तर याने आपली सर्व कहानी त्याला सांगितली.
तो व्यक्ती म्हणाला- "चिंता करु नको. माझं नाव जॉन डी. रॉकफेलर आहे. मी तुला ओळखत नाही, पण तु मला एक सच्चा आणि ईमानदार माणूस वाटतो, म्हणून मी तुला दहा लाख डॉलर चे कर्ज द्यायला तयार आहे.”
मग खिशातून चेकबुक काढून त्यांनी रक्कम लिहीली आणि या व्यक्तीस देत म्हणाले, “तरुणा, आजपासून ठीक एक वर्षाने याच ठिकाणी भेटू या. तेव्हा मी दिलेले कर्ज तू चुकते कर.” इतके बोलून तो निघून गेला.
तरूण अगदी स्तब्ध झाला. रॉकफेलर तेव्हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील एक होते.
तरुणाला तर विश्र्वासच बसत नव्हता की त्याची जवळजवळ सर्वच समस्या दूर झाली होती. त्याच्या पायांना जसे काही पंख लागले. घरी पोहोचून तो आपल्या कर्जाचा हिशोब लावू लागला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दहा लाख डॉलर ही खुप मोठी रक्कम होती, आणि आज ही आहे.
अचानक त्याच्या मनात विचार आला. त्याने विचार केला, एका अनोळखी व्यक्ति ने माझ्यावर विश्वास ठेवला, पण मी स्वतःवर विश्वास करत नाही आहे.
हा व विचार येताच त्याने चेक को संभाळून ठेवून दिला. त्याने निश्चय केला की आधी तो आपल्या परीने पुर्ण प्रयत्न करेल, भरपूर मेहनत करेल आणि या परिस्थितीतून बाहेर निघेल. त्यानंतरही काहीच उपाय राहिला नाही तर मग तो त्या चेक चा वापर करेल.
त्या दिवसानंतर तरूणाने स्वतःला अगदी झोकून दिले. फक्त एकच ध्येय्य ठेवले, काही करून सारे कर्ज उतरवून आपली प्रतिष्ठा परत मिळवणे.
त्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. व्यवसाय भरभराटीला लागला, कर्ज उतरु लागले. वर्षभरानंतर तर तो चांगल्या स्थितीत आला.

ठरलेल्या दिवशी अगदी वेळेवर तो बागेत पोहोचला.

तो चेक घेऊन रॉकफेलर ची वाट बघत होता तेवढ्यात त्याला ते दुरून येताना दिसले. जेव्हा ते जवळ पोहोचले, तरूणाने त्यांना मोठ्या आदराने नमस्कार केला.
त्यांच्या पुढ्यात चेक धरून त्याने काही बोलण्यासाठी तोंड उघडलेच होते की एक नर्स पळत आली आणि तिने झपाटा मारून त्या वृद्धाला पकडले. युवक आश्र्चर्यचकित झाला.
नर्स म्हणाली, “हा वेडा सारखा वेड्यांच्या दवाखाण्यातून पळून जातो आणि लोकांना 'मी जॉन डी. रॉकफेलर आहे' असे सांगून चेक वाटत फिरतो.”
आता तो तरुण आधिपेक्षा जास्त हैरान झाला. ज्या चेक च्या भरवशावर त्याने आपला पूर्ण बुडालेला व्यवसाय पुन्हा उभा केला, तो खोटा होता?
पण ही गोष्ट जरुर शाबीत झाली की खरा विजय दृढ निश्र्चय, हिम्मत आणि प्रयत्नांनीच होतो.
आपण सर्वांनी जर स्वतःवर गाढ विश्वास ठेवला तर नक्कीच कसल्याही बिकट परिस्थितिचा आपण सामना करू शकतो.
🙏🙏🙏🙏🙏#285327343
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel