दरात पोहोचताच खलाशांनी जहाजावरून उड्या टाकल्या आणि ते हाँगकाँग आणि आजूबाजूच्या परिसरात लपून बसले. सेकंड ऑफीसर क्राईस्ट हॅन्सन आणि पाच स्कँडीनॅव्हीयन खलाशी तेवढे जहाजावर शिल्लक राहीले होते.
क्राईस्ट हॅन्सन हा अत्यंत धाडसी स्वभावाचा माणूस होता. त्याचा भुता-खेतांवर अजिबात विश्वास नव्हता. त्याने जहाजाचं कप्तानपद स्वीकारलं. अनेक नवीन खलाशांची नेमणूक केली आणि लोकरीने जहाज भरून ऑस्ट्रेलियातील सिडनी बंदरात जाण्यासाठी नांगर उचलला. जहाजावरील नवीन खलाशांपैकी एकालाही जहाजाचा 'इतिहास' माहीत नव्हता.
सुदैवाने सिडनीच्या दिशेने प्रवास बर्यापैकी सुरळीत झाला. त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही.
सिडनी बंदरापासून एक दिवसांवर असताना क्राईस्ट हॅन्सनने डोक्यात गोळी झाडून घेतली!
इंजिनरुम मध्ये काम करणार्या हॅरी नेल्सनने फर्स्ट मेटच्या सहाय्याने जहाज सिडनीला आणलं. जहाज धक्क्याला लागण्यापूर्वीच नेल्सन वगळता सर्वांनी जहाजावरुन धूम ठोकली.
रशियन सरकारने हॅरी नेल्सनच्या सहाय्याने भुता-खेतांवर विश्वास न ठेवणार्या कॅप्टनचा शोध घेण्यास सुरवात केली. लवकरच त्यांना योग्य असा माणूस मिळाला. परंतु आतापर्यंत जहाजाचं इतकं 'नाव' झालं होतं, की इतर खलाशी आणि कर्मचारीवर्ग मिळेपर्यंत चार महिने गेले. जहाजाने सिडनी बंदर सोडलं आणि अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोची वाट धरली.
सुरवातीचा आठवडाभर जहाजाचा प्रवास व्यवस्थित सुरु होता. परंतु पुन्हा पहिल्याप्रमाणेच असंबध्द गोंधळ सुरु झाला. पूर्वीप्रमाणेच डेकवरील खलाशांचा स्वत:वरील ताबा उडाला. परिस्थिती मूळपदावर आल्यावरही दोन खलाशी इतके प्रक्षुब्ध झाले होते, की त्यांना जहाजाच्या तळातील एका केबिनमध्ये बंदीस्तं करून ठेवण्याची वेळ आली! सकाळी दोघंही मृतावस्थेत आढळून आले!
दुसर्या दिवशी भुता-खेतांवर अजिबात विश्वास न ठेवणार्या कॅप्टनने रिव्हॉल्व्हरची नळी स्वत:च्या तोंडात खुपसून चाप ओढला!
स्वतःवर थोडाफार ताबा असलेल्या खलाशांच्या मदतीने हॅरी नेल्सनने जहाज मागे फिरवून व्लाडीव्होस्टॉकला आणलं.
या वेळी मात्रं हॅरी नेल्सनसंह सर्वांनी जहाज सोडून काढता पाय घेतला. कितीही मोठ्या रकमेचं आमिष खलाशांना जहाजावर परतण्यास प्रवृत्त करू शकलं नाही. जहाजावरील कोणत्याही सामानाचा छोटासा तुकडाही त्यांना नको होता! पुढे पुढे तर जहाजावर पहारा ठेवण्यासही कोणी माणूस मिळेना. उत्कृष्ट स्थितीतील हे जहाज पुढे कित्येक महिने व्लाडीव्होस्टॉक बंदरात तसंच पडून राहीलं.
सागरावरील खलाशांना या शक्तीचा नायनाट करण्याचा एकच उपाय ठाऊक होता.
आग!
१९०७ च्या हिवाळ्यात एका रात्री हे जहाज पेटवून देण्यात आलं! अनेक छोट्या छोट्या बोटींतून जहाजाभोवती कोंडाळं करुन व्होडकाचे घुटके घेत खलाशांनी जहाजाच्या अंत साजरा केला! काही जण आनंदाने गाणे-बजावण्यात मश्गूल झाले होते.
जहाज जळून पाण्याखाली जाण्यापूर्वी अंगावर काटा उभा रहावा अशी एक कर्णभेदक किंकाळी सर्वांना ऐकू आली!
जहाजावर कोणत्या अज्ञात शक्तीचं वास्तव्यं होतं हे मात्रं कधीही, कोणालाही समजून आलं नाही.#285327354

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.