ायचे ना?...ही म्हाळसा मला महिन्याला हात खर्चाला दोनशे रुपये देते त्यातले बहुतांश पैसे ती मिसळ खाऊन जाते...आणि त्यात लॉक डाऊन सुरू झाल्यावर तर तिनं ते ही दोनशेही बंद करून टाकले...म्हणे आता तुम्हाला कशाला पैसे पाहिजे?...आता मला सांगा याला काय अर्थ आहे?...आता मागच्या आठवड्यापासून माझं ऑफिस सुरू झालं, मग हात खर्चाला पैसे पाहिजे ना रावं...मग आले ते असेच उडत उडत...असो

माझी एक चोरी मात्र पकडली गेली होती आणि मग डोक्याला फार मोठा शीण झाला होता...कार्टी खूप लहान असतानाची गोष्ट...कदाचित पाच सहा वर्षांची असेल...तिची एक सवय होती म्हणजे अजूनही आहे, तिला कोणी चॉकलेट दिले की ते ती लगेच न खाता जपून ठेवायची...बाहेर कोणीही चॉकलेट दिले की ते ती आईकडे द्यायची आणि घरी आलं की ते तिच्याकडून मागून घ्यायची...तिनं एक मोठा चपटा डबा केला होता त्यात हे सर्व चॉकलेट साचवून ठेवायची...चॉकलेटची बँकच होती ती...तिच्या त्या डब्यात कायम कधीही पन्नास साठ प्रकारची वेगवेगळी चॉकलेट आरामात असायची...माझी त्या बँकेवर नजर होतीच...आता जेवण झाल्यावर मला काहीतरी गोड लागतंच आणि एखाद्या दिवशी समजा म्हाळसाने जेवणात काही गोड केलं नसेल तर मी चुपचाप या पोरीच्या चॉकलेट बँकेवर दरोडा टाकायचो... त्या डब्यातील दोन तीन चॉकलेट लंपास करून गट्टम करायचो...पण सालं एक दिवस पोरीने मी त्या तिच्या डब्यातील चॉकलेटवर डल्ला मारताना पाहिलं आणि जे मोठ्यानं भोकाड पसरलं की विचारू नका...याबाबतीत ती अगदी आपल्या आईवर गेलीय...अर्थात म्हाळसालाही हा प्रकार माहीत नव्हता...पोरगी रडत भोकाड पसरत तिच्या कुशीत शिरली आणि माझ्या नशिबाचा सत्यानाश झाला...बायकोच्या तोंडापुढे फक्त भुणभुण नावाची सुरसुरी धरायचा अवकाश की शब्दांचे भुईनळे थयथया नाचायला लागतात...आणि झालंही तसंच...पोरीने रडगाण्याची सुरसुरी लावली आणि हजार शब्दांची लड वाजवत म्हाळसाबाई धडामधूम सुरू झाल्या...' एवढे मोठे झाले, लहान पोरीचं चॉकलेट ढापता?...काहीच कस वाटतं नाही तुम्हाला?...शोभत का या वयात असं काही करायला, खुशाल माझ्या पोरीचे चॉकलेट चोरून खाता...वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला...' आता माझी चोरी पकडली गेली म्हणून निमूटपणे ऐकून घेतलं, दुसरं काय करणार होतो...

आताशा मी पोरीच्या ड्रॉव्हर मधून तिचे काही रंगेबेरंगी पेन पेन्सिल ढापतोय...असलं एक एक पेन भारी असतं की विचारू नका...कोठून कोठून शोधून आणते कोणास ठाऊक?...मला ते रेडिमेड घरात मिळतंय ना त्यात आपण खुश ...

एकदा लहानपणी शाळेत असताना पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी शाळेतून वडिलांच्या टेबलावरून रंगीत खडू घरी घेऊन आलो होतो...वडिलांचा फळा रंगवून झाल्यावर उरलेले तुकडे मी त्यांच्या नकळत खिशात घालून घरी आणले होते...त्यावेळी रंगीत खडू फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशीच दिसायचे...घरी आल्यावर मी ते लपून ठेवले पण एक दिवस वडिलांच्या ते दृष्टीस पडले आणि नंतर मग जी काही त्यांनी माझी उत्तरपूजा केली की विचारू नका...नशीब ही म्हाळशी त्यावेळी तिथं नव्हती नाहीतर त्याच किती मोठ भांडवल तिनं केलं असतं...पण त्यावेळेपासून एक गोष्ट नक्की डोक्यात पक्की बसली की काहीही झालं तरी दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही...ही बाब मनावर इतकी बिंबवली गेली की आजपर्यंत कधी दुसऱ्या कोणाच्या कोणत्याही गोष्टीचा मोह झाला नाही मग ती गोष्ट लहान असो वा मोठी...

आता नाही म्हणायला कॉलेजात असताना वडिलांच्या खिशातून ढापलेल्या पैशाची आणि कॉलेजातील काही काही कारणं सांगून वडिलांकडून उकळलेल्या पैशाची एक खंत, एक सल अजूनही मनात कायम आहे...ती भळभळती जखम आजही प्रत्येक रुपया खर्च करताना मनाला बोच देते...परमेश्वर करो आणि ही जखम कधीही भरून न येवो...

कुलकर्ण्यांचा " चौर्य शिरोमणी " प्रशांत#285327362
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel