काय काय जाळायचं आणि काय काय फेकायचं???

अंगाला लावायच्या साबणीपासून ते चारचाकी गाड्या, विमाने, युद्धसामग्री सगळंच इतर देशाचं आहे.

Unilever (हिंदुस्थान लिव्हर) हि ब्रिटिश डच कंपनी.

Reckitt Benckiser हि ब्रिटिश कंपनी.

Oppo, Vivo, Realme, Oneplus, Redmi, Mi, Huawei, Lenovo, TCL, ZTE, हे ब्रँड चीनचे

2022 नंतर भारताच्या खडेयुक्त रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक चारचाकी गाडीत चार्जिंगची बॅटरी असणार ती चीनची

Samsung, LG, Haier, JBL हे ब्रँड साऊथ कोरियाचे

Sony, Hitachi, Sharp, Akai, Toshiba, Kyocera, Sansui, Panasonic, Suzuki, Honda हे ब्रँड जपानचे

Philips हा ब्रँड नेदरलँड चा

Acer, HTC हे ब्रँड तैवान चे

Apple, Dell, Google, FB, WA, Microsoft, LinkedIn, Amazon, Walmart (Flipcart, Mintra, Jabong, Phone pe, ekart), Johnson & Johnson, Procter & Gamble, McDonald, Pizza Hut, PepsiCo हे सगळे ब्रँड अमेरिकेचे

भारतात किंवा भारताबाहेर व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्यांमध्येदेखील विदेशी कंपन्यांचे शेअर्स आहेत.

मग,

15 Aug 1947 पासून आज 2020 पर्यंत भारताने काय केले?
शैक्षणिक भ्रष्टाचार?, जातीय भ्रष्टाचार?, सामाजिक, राजकीय, आर्थिक भ्रष्टाचार? वंशवाद?

1950 मध्ये भारताची लोकसंख्या साधारणतः 40 कोटी होती. आज ती 138 कोटी आहे.

May 2020 पर्यंत वर सांगितलेल्या विकसित देशांची लोकसंख्या बघुयात.

ब्रिटन: 6 कोटी 78 लाख
नेदरलँड: 1 कोटी 71 लाख
चीन: 143 कोटी 93 लाख *
साऊथ कोरिया: 5 कोटी 12 लाख
जपान: 12 कोटी 64 लाख
तैवान: 2 कोटी 38 लाख
अमेरिका: 33 कोटी 10 लाख.

जर आपल्याला वाटत असेल भारताची जमिन देखील मोठी आहे. तर माफ करा अमेरिकेची जमीन हि भारताच्या जमिनीपेक्षा तिप्पट मोठी आहे.
ऑस्ट्रेलियाची जमीन ही भारताच्या जमिनीपेक्षा 2.5 पटीने मोठी आहे, परंतु ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या हि केवळ 2 कोटी 55 लाख आहे. आणि 2050 पर्यंत ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या हि केवळ 3.25 कोटी होणार आहे.

भारताचा जन्मदर आणि मृत्युदर पाहता 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या हि 164 कोटी पर्यंत वाढणार आहे. देशाची जमीन मात्र तेवढीच राहील.

आता या सर्व आकडेवारीवरून आपल्याला अंदाज लावता येईल की भविष्यात भारतीयांना केवळ भारताबाहेर नव्हे तर भारतातच किती मोठी कॉम्पिटिशन असणार आहे ते???

2050 पर्यंत येणाऱ्या या धोक्यासाठी एकच उपाय आहे...

जाती-धर्माचे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण तातडीने बंद करावे लागेल.
भारतातील 6748 जातीचं अस्तित्व नष्ट करुन आंतरजातीय विवाहांना प्रोहस्थान द्यावे लागेल. भारतात बोलण्यासाठी विविधतेत एकता आहे, परंतू आचरणात मात्र एकतेत विविधता आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही.
समता, बंधुता प्रस्थापित करून आर्थिक विषमता दूर करावी लागेल.
सर्वात महत्वाचे "आस्थेच्या" नावाखाली चालवलेले धार्मिक धंदे बंद करून One Nation One Education या अंतर्गत विज्ञान, रिसर्च, टेकनॉलॉजिला बळकट करावे लागेल.#285327363
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel