*गुरु पौर्णिमा*
🍁🍁
गुरुपौर्णिमा म्हणजे परंपरेने गुरुच्या प्रति असलेल्या सच्च्या आदराचे समाजासमोर केवळ प्रदर्शन नाही. तर *गुरुने ज्ञानाचा दिलेला वारसा समाजापर्यंत बदलासह पोहचवण्याचा दिवस* म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरू,शिक्षक, आचार्य आपल्याला ज्ञान पथावर नेतो.शिष्याने आपण दिलेल्या शिदोरीत किती भर घातली आहे आणि घातलेली भर उत्तम,मध्यम,कशा प्रकारची अाहे याचा उहापोह या दिवशी करून,गुरुच्या समोर मांडण्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस असतो,म्हणून गुरू पूजन करणे ही परंपरा आहे.
परंपरेने पितरां मध्ये गुरुचा समावेश केला आहे.त्यामुळे ज्ञान हे मालकी हक्काने,किंवा वडिलार्जित संपत्ती म्हणून मिळवता येत नाही.*ती धरोहर आहे ,जी ऋण रुपात पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायची आहे*
या ऋणाची परतफेड कधीच होत नाही.मग काय करायचे? ज्या विद्यापीठात अापण शिकलो त्या विद्यापीठाला *स्वकष्टार्जित* *धन धान्य,आणि विज्ञानाने समृद्ध करायचे* गुरु ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करायचा.गुरुकुलातील नवीन आलेल्या विद्यार्थ्याना याची जाणीव रहावी व त्यांच्या समोर उदाहरण प्रस्थापित व्हावे म्हणून गुरुपूजनाचे प्रयोजन असते.
कलाप्रांतात ही गुरूपौर्णिमा होत असते. तसेच ती सर्वसामान्यांच्या आयुष्याचा भाग असते.
गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा या दिवशी गुरू पूजन होते.म्हणजेच केवळ आपले गुरू असलेली व्यक्ती नाही तर *ते पीठ असते* म्हणून गुरूच्या तीन पीढ्या म्हणजे
परम गुरू
परात्परगुरू
परमेष्ठगुरू
तीनही व्यक्तींचा त्यात समावेश असतो. त्यांचे एकत्रित पूजन करायचे असते. ज्ञानशाखेला विद्यार्थ्यांना अभिमुख करणारा,
* प्राथमिक स्तरावर शिक्षक*
*माध्यमिक स्तरावर उपाध्याय*
*उच्च स्तरावर आचार्य*
त्याही नंतरच्या स्तरावर गुरू
जेथून शिकलेल्या ज्ञानाची खंडन मंडनात्मक प्रक्रिया सुरू होते. या वेळी मार्गदर्शक असतो तो गुरू
थोडक्यात विद्यार्थ्याची गाडी परंपरेच्या रुळावरून चालताना विद्यार्थ्याची स्वायत्तता जपणे आणि शास्त्राधार देऊन नवविचारांचा पुरस्कार करणे,व समाजाकडून तो स्वीकार करवून घेणे हे गुरूचे काम असते.
जेव्हा गुरू शिष्याला दुसरीकडे म्हणजे दुस-या विद्वानाकडे जाण्यास सांगतो तेव्हा *गुरू जवळचे ज्ञान किंवा त्यांची क्षमता क्षीण झालेली नसते* तर परंपरेच्या प्रवाहात नवीन ओघ मान्य करवण्याची ती पहिली पायरी असते.
जेथे खंडन मंडन प्रक्रियेचा आरंभ होतो.नंतर उहापोह करून संवादाची प्रक्रिया समाजाभिमुख होते.त्यानंतर शिष्य विद्वान म्हणून मान्यता पावतो आणि नवीन परंपरा ज्ञानशाखेत प्रविष्ट होऊन समाजमान्य होते.
याप्रक्रीयेत जो साथसंगत करतो तो गुरू.म्हणून गुरु हा श्रेष्ठ ठरतो.
यामधून *गुरू-शिष्य-समाज* तिघेही ज्ञानशाखेशी जोडले जातात म्हणून गुरूऋण उतरविण्याचे साठी गुरूपौर्णिमा साजरी होते असते. माता-पितरांसाठी कुलवृद्धी करून,तर गुरुजनांसाठी ज्ञानवृद्धी करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा मार्ग गुरु पौर्णिमा खुला करते.
जगत्गुरु व्यास महर्षिंचा आज जन्मदिन असतो.असे म्हणतात
*व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्*
म्हणजे ज्ञानशाखेतील एकही असा विषय नाही जो व्यासांनी हातळला नाही.म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असे म्हणतात.व्यासमहर्षी हे गुरुंचेही गुरू आहेत.म्हणून आज गुरुपूजन करून,महर्षीव्यासांना श्रद्धासुमने अर्पित करून गुरू-शिष्यांचं परंपरेचा सन्मान करतात.
शिक्षकदिन त्याची पहिली पायरी आहे.
🍁🍁#285327370
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel