( शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने लिहिलेला ओंकारेश्वर ज्योतीर्लिंगावरील लेख.)
ओंकारेश्वर ....
नर्मदेचा किनारा म्हणजे तीर्थक्षेत्रांची मांदियाळी!सुर-असुर , ऋषी-मुनीं , साधु-संतांच्या साधनेने तप्त झालेली हि सिद्धभूमी! जिच्या पावलोपावली तीर्थ आहेत! जिथला प्रत्येक कंकर हा शंकर आहे! अशा या महापवित्र नर्मदाखंडातील ओंकारेश्वर क्षेत्र म्हणजे सर्व तीर्थक्षेत्रांचा मुकुटमणीच!
नर्मदा ........ जगातील एकमेव नदी जिची परिक्रमा केली जाते आणि जगातील एकमेव ज्योतिर्लिंग जे दोन लिंगाने युक्त आहे ते ......... ओंकार-ममलेश्वर ! ज्याचे महात्म्य एवढे मोठे आहे की , सर्व तीर्थांचे दर्शन घेतले आणि ओंकारेश्वराचे दर्शन घेतले नाही तर घेतलेले दर्शन अधुरे ठरते ...... ! त्यामुळे ओंकारेश्वर हे केवळ नर्मदा परिक्रमेतील एक पवित्र स्थान इतकेच त्यांचे महत्त्व नसून त्यापेक्षाही मोठा असा लौकिक आहे ओंकारेश्वराचा!
ओंकारेश्वर हे तीन पुऱ्यांनी बनलेले आहे . शिवपुरी , विष्णूपुरी आणि ब्रम्हपुरी ! "त्रिपुरी" नगरीच म्हणाना ! शिवपुरीला ओंकारेश्वर वास करतात . तर विष्णूपुरीला विष्णू आणि ब्रम्हपुरीला ब्रम्हाजी आहेत! नर्मदा किनाऱ्यावर शिवतीर्थ अनेक आहेत , विष्णुचाही काही ठिकाणी वास आहे आणि ब्रम्हाजी देखील मोजक्या ठिकाणी आहेत. पण या तिन्ही देवतांचे वास्तव्य असलेले ओंकारेश्वर हे एकमेव ठिकाण आहे! ब्रह्मपुरीतील "ब्रम्हेश्वराची" एक सुंदर कथा आहे..........
कथा आहे सृष्टीच्या आदी कल्पातील ! तर सत्ययुगातील स्वायुंभव मनुच्या कल्पात असुर देवांचा पराभव करतात. असुरांच्या भितीने सर्व देव ओंकारेश्वर येथे नर्मदा किनारी आश्रय घेतात! शिवाची आराधना करू लागतात. देवतांच्या आराधनेने शिवजी प्रसन्न होतात आणि ब्रम्हाजींना असुरांचा संहार करण्याची आज्ञा करतात. पण असुरांच्या भितीने ब्रम्हाजींची देखील सर्व विद्या विस्मरणात गेलेली असते. तेव्हा शिवजींच्या आशीर्वादाने ब्रम्हदेवाला विस्मरणात गेलेली आपली विद्या पुन्हा प्राप्त होते. ब्रम्हाजी वेदमंत्रांच्या सहाय्याने असुरांचा संहार करतात! कृतार्थ ब्रम्हाजी शिवजींच्या लिंगाची स्थापना करून विधीवत पूजा करतात. ते लिंग "ब्रम्हेश्वर" म्हणून प्रसिद्ध पावते!
अशा या ओंकारेश्वर येथे ज्या बेटावर शिवजी आहेत त्या बेटाचं नाव आहे मांधाता .......... ओंकार-मांधाता म्हणतात त्याला ! ॐ च्या आकाराचा पर्वत ! त्रिगुण- त्रिभुवन आणि त्रिदेवतांचे स्वरुप असलेला पर्वत ! रहस्यमय पण तरीही ऊर्जात्मक आध्यात्मिक पर्वत! असा हा पर्वत ज्या राजा मांधाताच्या नावाने प्रसिद्ध झाला त्याची कहाणीही फार रोचक आहे .......
इक्ष्वाकु वंशातील ( प्रभू श्रीरामचंद्रांचा वंश ) राजा युवानाश्वाची विंध्याचल पर्वतीय क्षेत्रावर सत्ता होती. अत्यंत शूर, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष असा हा राजा असतो. पण संतती नसल्यामुळें तो नाराज असतो. एके दिवशी राजा चवनऋषीं कडून पुत्र कामेष्टी यज्ञाचे आयोजन करतो.त्यासाठी तो आपल्या राण्यांसह चवनऋषींच्या आश्रमात जातो.यज्ञ सुरू होतो. त्यावेळी इंद्रमंत्राने अभिमंत्रित केलेले जल एका कलशात भरलेले असते.यज्ञ संपन्न होत येतो. हे जल रात्रभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी युवानाश्व राजाच्या पट्टराणीला द्यायचं असतं! रात्री सगळे गाढ झोपलेले असतात. रात्री राजाला तहान लागते. सर्व ऋषी-मुनी झोपलेले असतात. राजा पाण्याच्या शोधात यज्ञ शाळेत पोहचतो. समोर असलेले कुंभातील जल प्राशन करतो. ते जल पुत्र प्राप्ती करीता अभिमंत्रित केलेले जल असते! पण राजा मात्र या गोष्टी पासून अनभिज्ञ असतो!
हि गोष्ट सकाळी जेव्हा चवनऋषींच्या लक्षात येते तेव्हा ते राजाला म्हणतात, " राजन, ईश्र्वराच्या इच्छेच्या पुढे जाता येत नाही. तुला गर्भ धारणा होईल!"
ऋषींच्या म्हणण्यानुसार युवानाश्व राजाला गर्भ धारणा होते ! पुढे योग्य वेळी अश्र्विनी कुमार छोटी शस्त्रक्रिया करून राजाची प्रसूती करतात! आणि एका गोजिरवाण्या बाळाचा जन्म होतो! त्या बाळाचे नाव ठेवले जाते मांधाता!
पुढे जेव्हा मांधाता राजा बनतो तेव्हा हा शिवभक्त मांधाता नर्मदेच्या या बेटावर राजसूय यज्ञ करतो. एक नाही ...... दोन नाही ..... तर तब्बल शंभर राजसूय यज्ञ करतो! शिव प्राप्तीसाठी नर्मदेतील बेटावर ओंकार साधना करतो. आणि त्याचवेळी नर्मदेच्या पैलतीरावरून ( दक्षिण तटावरून ) नित्यनेमाने हजारो पार्थिव शिवलिंग नर्मदेला अर्पण करीत असतो .......!
मांधाताच्या अशा समर्पित सेवेने शिवजी प्रसन्न होतात आणि नर्मदेच्या बेटावर ओंकारेश्वर म्हणून नित्य वास करण्याचे मांधाता राजाला कबूल करतात. इतकेच नव्हे तर ज्या पैल तीरावरून पार्थिव शिवलिंग नर्मदेला वाहिली जायची तेथे शिवजी "इदं मम् स्वरुपं" असे म्हणून तेथे ममलेश्वर स्वरुपात प्रगट होतात! अशा प्रकारे ओंकार- ममलेश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती होते!
या बेटावरील ओंकारेश्वर मंदिर हे पाच मजली आहे. तेथे पहिल्या मजल्यावर ओंकारेश्वर, दुसऱ्य#285327417

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.