निफाड तालुक्यातील कार्यकुशल व विकासाभिमुख नेतृत्व:आमदार दिलीप बनकर लेखक सुभाष पवार*

आज दि.26 जुलै निफाड मतदारसंघातील कार्यकुशल व विकासाभिमुख नेतृत्व आ.दिलीप बनकर यांचा वाढदिवस यानिमित्त खास लेख
राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता

दिलीप काकांना राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता मानले जाते.राष्ट्रवादीच्या पडत्या काळातही शरद पवारांची साथ न सोडता त्यांनी खिंड लढवली व आमदार झाले.दरम्यानच्या काळात ऐन निवडणुकीच्या वेळी अनेक नेते,कार्यकर्ते पक्षबदल करत होते.परंतु काका हे राष्ट्रवादी चे सच्चे कार्यकर्ते असल्याने त्यांनी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपली खिंड लढवली व पिंपळगावच्या शिरपेचात आमदारकीचा मानाचा तुरा लावला.
काकांच्या विजयाची सुरुवात:

काकांच्या विजयाची खरी सुरुवात ग्रामपंचायतच्या विजयातून सुरू झाली होती.ग्रामपंचायतमध्ये एकहाती सत्ता प्राप्त करून विरोधकांमध्येही चांगले स्थान निर्माण केले.
आमदार दिलीप(काका)बनकर निफाड विधानसभा मतदारसंघ

ग्रामपंचायतचा पथदर्शी व पारदर्शी कारभार

काकांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचा पथदर्शी, शिस्तबद्ध कारभार सुरू आहे.ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावाच्या विकासात मोठा हातभार लावून अभिनव बदल केले.सरपंच अलकाताई बनकर,उपसरपंच संजय मोरे,सदस्य गणेश बनकर व इतर सदस्यांच्या माध्यमातून गावात वेगाने रस्ते व इतर विभिन्न विकास योजना सुरू आहेत.कामे त्वरित व झटपट करणे हा बदल त्यांच्याच कार्यकाळात घडून येत आहे.
जि. प.पंचायत समितीच्या माध्यमातून यशस्वी घोडदौड

मागील जि प निवडणुकीत सर्वत्र भाजप, सेनेचे सीट निवडुन आले असता तीन गटात राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली होती.त्यात पालखेड गट काकांनी राखला
कार्यकर्त्यांचे कुशल संघटन:

.पिंपळगावात दिलीप बनकर कला, क्रीडा मंडळ,भीमाशंकर शिक्षण संस्था, स्व.अशोकराव बनकर पतसंस्था, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या माध्यमातून काका कार्यरत आहेत.ग्रामीण भागातील राजकारण हे सहकाराच्या पायावर उभे असते. व सहकाराची वीण काकांनी भक्कमपणे बांधून कार्यकर्त्यांचे कुशल संघटन केले.गेल्या वीस वर्षांपासून पिंपळगाव बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व आहे.
आमदार दिलीप(काका)बनकर निफाड विधानसभा मतदारसंघ

पिंपळगाव मार्केट ला महाराष्ट्रात नावलौकिक काकांनी मिळवून दिला.स्वच्छ कारभार,भ्रष्टचाराचा एकही आरोप नसलेला नेता म्हणून आ. दिलीप बँकांकरांचे नाव घेतले जाते.दरवर्षी भव्य रक्तदान शिबिर, गणेशोत्सव, नवरात्री च्या मोठ्या देखाव्यांचे आयोजन व ह्या माध्यमातून धार्मिक,अध्यात्मिक उत्सव राबवणे यातून कायम जनतेच्या संपर्कात ते राहतात.जनतेशी नाळ अशा विविध माध्यमातून ते जोपासत आहेत.

सामान्य कार्यकर्त्यांची काकांबरोबर निष्ठा:

राजकारणात कार्यकर्ते जोडणे व ते टिकवणे ह्यास खूप महत्व आहे.कार्यकर्ता हा निष्ठावंत असेल तर नेत्यांना पुढील वाटचाल सुकर होते.आ. बनकर हे नेहमी सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी असतात. सामान्य कार्यकर्त्यांचा नेहमीच आदर करून विविध प्रसंगी जो मानसन्मान दिला जातो,विचारपूस केली जाते ह्या जवलीकतेच्या भूमिकेमुळे काकांसोबत जणमाणसाची निष्ठा वृद्धिंगत होत गेलेली आहे.
काकांच्या कामातून मिळते उर्मी:

दरम्यान जनमताचे अवलोकन करत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निफाड तालुका ध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली की कामे अत्यंत तळमळीतून करण्याची उर्मी ही काकांच्या कामांतूनच येत असते.
जनतेच्या मनात कायम आदराचे स्थान:

अत्यंत कार्यक्षमपणे मतदारसंघातील कामे करणे ह्यामुळे जनतेच्या मनात काकांचे अत्यंत आदराचे स्थान राहिलेले आहे.विविध प्रसंगी काका नेहमीच मदतीचा हात पुढे करतात.समाजहिताची अनेक कामे स्वखर्चातून करतात.
वैयक्तिक लक्ष घालून कामे:

गोदकाठचा प्रश्न असो,नांदूर मध्यमेश्वर, रस्ते ह्यासह विविध विकासकामे करण्याचा त्यांचा वेग व पाठपुरावा करून शासकीय योजना मतदारसंघात राबवणे ह्यासाठी ते जातीने वैयक्तिक लक्ष घालून काम करत असतात.निसाका संदर्भात त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत.हा कारखाना पुन्हा सुरू करून त्यास उर्जितावस्था आणण्याचे काम काका निश्चितच करतील याची खात्री कार्यकर्त्यांसह जनतेला आहे.
एक सर्वसामावेशक नेतृत्व:

सर्व जाती,धर्माना सोबत घेऊन सर्व समाजास नेतृत्वाची संधी काकांनी दिली आहे.मातंग समाजातील कार्यकर्ते श्री केदु शिरसाठ व संजय शिरसाठ यांनी सांगितले की सर्वांना समान न्याय देण्याची काकांची भूमिका आहे याचे उदाहरण म्हणजे मागील पंचवार्षिक मध्ये निफाड तालुका पंचायत समिती सभापती पदी नांदुर्डी येथील सौ लक्ष्मीबाई खरात यांना निफाड तालुका पंचायत समिती सभापतीपदाचा मान काकांजीमुळे मिळाला.ग्रामपंचायत मध्ये देखील समाजास प्रतिनिधित्व आहे.

जनतेच्या सहभागातून सामाजिक कार्य:

आ.बनकर यांनी स्वखर्चातून व जनतेच्या प्रत्यक्ष सहभागातून अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत व करत आहेत.कोरोना काळात लॉकडाऊन संपेपर्यंत गणेश बनकर यांनी अन्नछत्र सुरू केले होते.यास भरभक्कम 55,000 रुपयांची मदत तर केलीच पण वेळोवेळी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या त्या गोष्टी पुरवल्या. ह्या अन्नछत्राचा लाभ पिंपळगावतील सर्व भागातील गोरगरीब जनता,ज्यांचे काम बंद होते असे लोक यांच्या घरपोच अन्न पोहोच केले जायचे.शिवाय पिंपळगाव बसवंत येथून दररोज हजारो लोक परप्रांतीय पायी निघाले होते.त्यांनाही टोलनाक्यावर सोय केली होती.

बिहार,झारखंड येथील केवळ सिमाभागापर्यंत शासनाने गाड्यांची सोया नंतर शेवटी केली पण त्यात बदल करून ह्या परप्रांतीयांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली.साधारण 250 गाड्या ह्यासाठी काका स्वतः तिथे उभे राहून रवाना केल्यात.ह्या सर्वांसाठी चहा,पाणी,नाश्त्याची सोय केली. अन्नछत्र यात गावातील अनेक लोकांनी आर्थिक स्वरूपात व धान्य स्वरूपात मदत केली.

सर्वच क्षेत्रातील लोकांचा जवळीकतेने विचार करणारे नेतृत्व:

बरडे हॉस्पिटल चे संचालक डॉ मनोज बर्डे सांगतात की आ. दिलीप बनकर हे सर्वच क्षेत्रातील लोकांचा जवळीकतेने विचार करतात.लॉकडाऊन च्या काळात जेव्हा मुंबई,पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तेव्हा केवळ तीन चार दिवसांत covid सेंटर ची उभारणी केली गेली.,काकांचे काम म्हणजे quick action घेणे व त्यानुसार काम त्वरित उभे करणे ह्या स्वरूपाचे आहे.डॉ मनोज बर्डे अनुभव मांडताना सांगतात की, जेव्हा इतरत्र कुठेच ग्रामीण भागात covid centte नसताना मीच काकांशी ह्याबाबत कल्पना मांडली की पिंपळगाव हे गर्दीचे शहर असल्याने इथे कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता गावाच्या बाहेर मोठ्या इमारतीत कोविड centre उभे करण्याची आवश्यकता आहे.

त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता काकांनी सांगितले की आपली शाळा आहे ना भीमाशंकर तिथे घ्या. जोपर्यंत covid clinik मध्ये चेक अप होत होते तोपर्यंत एकही पेशंट पिंपळगावात सापडला नाही. नंतर इतर डॉक्टरांचा confidance वाढला लॉकडाउन काहीसे शिथिल झाल्यानंतर इतर जनरल clinic, हॉस्पिटल सुरू झाली त्यामुळे ह्या क्लिनिक ची आवश्यकता संपली पण विशेष म्हणजे जेव्हा हे सेन्टर बंद झाले त्यानंतर गावात कोरोनाने शिरकाव केला व पेशंटची संख्या वाढू लागली पण आ.बनकर,ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग यांच्या सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात आहे.शिवाय इतर काही सेवाभावी संस्था,सामाजिक कार्यकर्ते यांचे ही ह्या काळात योगदान राहिलेले आहे.

खरे तर आरोग्यविषयक ज्याही काही बैठका असतील निर्णय असतील त्या त्या वेळी काका मला invite करतात सल्ला घेतात,व त्यावर कार्यवाही लगेच करतात

पी पी ई किट ची जेव्हा वाणवा होती त्यावेळेस सर्व डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचारी यांना आरोग्यमंत्र्याशी संपर्क साधून ह्या गोष्टी पुरवणेअसो सर्वांना मास्क,सॅनिटायझर उपलब्ध करून देणे असो ह्या कामी अत्यंत तत्परतेने पावले उचलून काकांनी ह्या सुविधा पुरावण्याकमी विशेष योगदान दिले.

आज ह्या वाढदिवसप्रसंगी भावनगरी डॉट इन चा नाशिक जिल्हा प्रतिनिधी ह्या नात्याने आदरणीय काकांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

लेखक:सुभाष पवार,
पिंपळगाव बसवंत
9767045327

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel