कधीकाळी भगवान श्रीकृष्णाला सुद्धा ज्या प्रेमानी मोहवून टाकलं , ते प्रेम आजत गायत आहे . प्रेमाला कशाचं म्हणता अगदी कशाचंही बंधन नाही . प्रेम कधी ? कसं ? कुणावर होईल ? हे सांगता येत नाही . प्रेमाची व्याख्या जितकी कराल , तितकी कमीच . प्रेम म्हणजे साक्षात परमेश्वर असं जर तुम्ही समजाल तर त्यात काहीच वाईट नाही . प्रेम नेहमी निःस्वार्थ , निरपेक्ष , निष्कपट असच असावं . मग पाहा त्याची गोडी कशी येईल तुम्हाला . पण प्रेमाला कधी वासनेचं रुप आलं तर ... तर मग ते प्रेम नव्हे . प्रेमाच्या नांवाखाली स्वतः ची गरज , स्वार्थ भागवून घेण्याचा हेतू असतो . प्रेम कधी एक तर्फी असता कामा नये . त्याचा परिणाम खूप हानिकारक ठरतो . तुम्ही जर कुणावर प्रेम केलात तर त्यानेही तुमच्यावर प्रेम केले पाहिजे . तरच ते यशस्वी ठरतं . प्रेम नेहमी विश्वासच्या धाग्यावर टिकतं . जे जितकं मजबूत असतं तितकच प्रेम ही मजबूत राहतं . "चूक" ही प्रेम कथा तुम्हाला अशाच प्रेमाच दर्शन घडविल.